Trekking safety news and other concerns from various channels july 2017

_____दोन घटना या वर्षीच्या मान्सून भटकंतीची सुरुवात करुन गेल्या.
पेब(विकटगड)चा किल्ला या घटनेतील दोघे जण वाचले.

दुसरी घटना माणगाव रायगड देवकुंडात दोघे जण वाहून गेले.
त्यांचे मृतदेह सापडले.
मृतांपैकी एक दिल्लीचा तर एक वाराणसीचा
खर तर या परप्रांतियांना येथील काही माहित नाही.सह्याद्री माहित नाही.कुण्या एका ट्रेक ऑर्गनायझर च्या भूलथापांना व अमिषांना बळी पडत ते ही जातात मग,एन्यॉय करायला व आयुष्याचा एन्जॉय होऊन बसतो.
काल परवा एका भटक्याने हरीहर गडावर झालेल्या त्याच्या सोबतचे काही क्षण त्याने शेअर केले.ट्रेक ऑर्गनायझरचा मुर्खपणा,कोणतेही प्रथमोपचाराचे साहित्य नाहि.त्या ठिकाणची पुर्ण माहिती नाही.पायाचे हाड तुटले त्याचे एक्स रे पाठविले होते.
______माझ्यासारख्या नवख्यांना तर हे तथाकथीत बाजार मांडणारे
फाट्यावर मारतच असतात.पण जुन्या जाणत्यांनाही मोजत नाहित.
मी कुठलाही इव्हेंट सोशल मिडीयावर पाहिला की त्या नंबरवर पहिला फोन करतो.उगाच आपल वेड्यासारख त्याला सर सर म्हणायच..
सर जागा मिळेल का…?
सर मी या आधि कधी किल्ला पाहिला नाहि.तो म्हणतो तुम्ही फक्त फी भरा बाकी पाहतो.(म्हणजे, सदर सदस्यांने कुठलाही किल्ला पाहिला नाहि.त्याला अनुभव नाही.तरी हे पैसे कमावण्यासाठी घेतात.या चला आम्ही ढकलून देतो तुम्हाला)
मग,तो त्याची गुंडवायची(हा शब्द छान वाटतो) सराईत पद्धत चालू करतो.
मग,त्यात तो गडकोट का महत्वाचे हे सांगत सुटतो.
त्याचा इति(उप)हास सांगतो.
मग,त्यांच्या संस्थेचे ट्रेक व त्यातून गडांची साफसफाई(?) कशी करतात त अस काही सांगतो की,एकवेळ वाटत
“आयला कधीही प्रसिद्धीचा लवलेशही न बाळगता दुर्गसंवर्धन संस्था उगाचच संवर्धन संवर्धन खेळत असतात.खरे संवर्धन तर हे करतात व या संवर्धन करणार्या संस्था कचरा करत फीरतात.”
मग,मी विचारतो सर दुर्गसंवर्धन म्हणजे काय हो..?
तो-गडावर असणारा कचरा(बिस्लेरीच्या बाटल्या,वेफर्स व फास्टफुडचे कागद,दारुच्या बाटल्या) उचलने साफसफाई करणे.
मी-पण,सर मी हे का करु मी तर तुम्हाला पैसे दिलेत मी का कचरा उचलू…?(मुद्दाम)
तो-अहो,किल्ले म्हणजे आपला वारसा आहे.तो आपणच जपायला हवा.कचरा आपणच उचलला पाहिजे ना.(खर तर यांच्यामुळेच कचरा होतो.)
मी-पण,सर कचरा तर फिरायला जाणारेच करतात.ज्यांना तुम्ही पैसे घेऊन नेता.
(तो काहिसा रागावून)
तो-तुम्ही अस कस बोलता.एकदा आमच्या सोबत या पैसे भरुन मग कळेल तुम्हाला ट्रेक काय असतो ते.आम्ही स्वच्छता कशी करतो ते.
(मग,मुद्दा पैशावर येतो)
मी-सर ट्रेकची फी काही कमी होणार नाही का..?
तो-नाही नाही अहो खूप खर्च होतो.त्यात सर्वांची रिस्क व काळजी घ्यावी लागते(घंटा).हेच पैसे कमी पडतात पण महाराजांचे किल्ले आम्हाला सर्वांना दाखवायचे म्हणून भागवतो आम्ही इतक्यात.तुम्ही पैसे भरा व सामिल करा.दोनच जागा शिल्लक आहेत.
मी-पण,सर मी त्या किल्ल्यावर गेलो होतो.पण,मला इतके पैसे लागले नाही.तुम्ही जास्त घेताय.अस का.?
तो-अहो तुम्हाला यायच असेल तर या मला नका शिकवू.तुमच्यासारखे फक्त चांगल्या कामात आडकाठी करतात.आम्ही इतक्या कष्टाने किल्ले दाखवतो लोकांना व तुम्ही आम्हालाच प्रश्न विचारत आहात.
मी-हाड….हाड..हाड….
तो-काय बोलले तुम्ही.?
मी-बाहेर कुत्र होत.
तो-मी खूप किल्ले पाहिले.अनेक ट्रेक ऑर्गनाईझ केले.
(मग,शेवटी त्याचे पितळ उघडे पडले की तो शिव्यांवर येतो.मी ही येथेच्छ शिव्या हासाडतो.फोन कट…)
(अस सर्रास दोन तीन वर्षापासून होत आहे.अनेकांना समजावण्याचा प्रयत्न केला.संभाव्य धोके सांगण्याचा प्रयत्न केला.काय काळजी घ्या ते ही सांगण्याचा प्रयत्न केला पण हे
आम्हाला फाट्यावर मारतात.काही घटना घडली व यांना फोन करावा की मग यांची तोंडे पाहण्यासारखी होतात.तोच शिव्या देणारा मग भाऊ,दादा बोलतो.पण,तो पर्यंत कुणाचा ना कुणाचा तरी जीव गेलेला असतो.)

इव्हेंटच्या दुसर्या दिवशी त्याच्या वालवर,पेजवर सेल्फी,कमी कपडे,कोपर्यात कुठेतरी मिठया मारत असलेले फोटो अपलोड होतात व त्याच सोबत न्युज चानलला बातमी असते.इतके वाहून गेले.तितके पडले.मात्र यांच्या पेजवर तस काही नसते.कारण,इमेज खराब होईल ना.

असो,सांगायच इतकच की तो सह्याद्री आहे.तुमच्या सारख्यांना गाडूनच तो उभा आहे.त्याच्याशी वाकड की मग थेट सरणारवर लाकडं.

(टिप-कुणी वयक्तीत घेऊ नये.सर्रास संस्था काही सारख्या नाहित यात काहि चांगल्याही आहेत.
घेतल्यास खाली फोन नंबर दिलेला आहे.)
-नवनाथ आहेर
(9922973101)
https://www.facebook.com/tumchasathi.kaypan.9/posts/957914204348575

शिवदुर्ग मित्र, लोणावळा
July 10 at 2:31pm ·
दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात पेव फुटणा-या सह्याद्रीतल्या कमर्शियल इव्हेंट्स बरोबर डोंगरात होणा-या अपघातांचं प्रमाणही वाढू लागलं आहे. बेशिस्त आणि बेताल ट्रेकर्स व क्षमतेपेक्षा अधिक संख्येने धोकादायक जागांवर ट्रेक्स आयोजित करणारे संयोजक यांच्यामुळे हे अपघात घडताना दिसून आले आहेत. अनेकदा या अपघातांदरम्यान जबर जखमी होणे, कायमचं अपंगत्व येणे, रस्ता चुकून भरकटल्यावर अनेक दिवस ट्रेकर्सचा शोध न लागणे याचबरोबर कड्यावरून पडून मृत्यू होणे हे अत्यंत धोकादायक प्रकार निदर्शनास आले आहेत व त्यातून ट्रेकिंग या साहसी खेळाच्या विश्वासार्हतेवरच शंका घेतली जात आहे.

काल (दि 9 जुलै 2017) देवकुंड धबधबा आणि पेब किल्ला या ठिकाणांवर घडलेल्या अपघातांना समोर ठेवून महाराष्ट्रातील शिवदुर्ग मित्र – लोणावळा, यशवंती हायकर्स – खोपोली, निसर्गमित्र – पनवेल,पिंपरी चिंचवड माऊंटेनियरिंग असोसिएशन,गिरिप्रेमी पुणे व वैनतेय गिर्यारोहण संस्था – नाशिक या बचावकार्य अर्थात रेस्क्यू ऑपरेशन्स करणा-या संस्थांनी एका बैठकीदरम्यान निर्णय घेतला असून त्याअंतर्गत यापुढे डोंगरातील अपघातात संयोजकांची अर्थात ट्रेक लिडर्सची चूक आहे हे लक्षात आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असून त्या संस्थेवर व लिडर्सवर कायदेशीर खटला दाखल करण्यात येणार आहे.
संस्थेच्या निष्काळजीपणामुळे तसेच
अपु-या प्रशिक्षण व अनुभवामुळे हे अपघात घडत असून सहभागी ट्रेकर्सच्या जीवावर हे ट्रेक्स बेतत आहेत. आपण ट्रेक्स घेऊन जात असलेल्या ठिकाणाची काठिण्यपातळी,आपण जात असलेला ऋतू त्या ठिकाणासाठी योग्य आहे का, इतकी मोठी ग्रुपसंख्या तिथे नेण्यास योग्य आहे का या गोष्टींची खातरजमा न करता फक्त पैसे कमावण्यासाठी ट्रेक्स आयोजित करणा-या धंदेवाईक ग्रुप्सवर ताबा ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या अंतर्गत होणा-या कारवाईला सर्वस्वी त्या ग्रुपचे लिडर्स जबाबदार असतील. अपघाताचा प्रकार अधिक गंभीर असल्यास त्या संस्थेची नोंदणी अर्थात “रजिस्ट्रेशन” कायमचे रद्द होण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत.
#Rescue #Teams
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1959146604367978&id=1627576320858343

पेब ची गर्दी …काही वरती ..काही खालती 😥

पेब ला या वेळी नाही म्हणता अंदाजे 500 ते 600 ट्रेकर्स होते…चढताना ही शेवटच्या Boulder जवळ Bottle neck होता म्हणून आमच्या टीमने मीळून जवळ जवळ150 ते 200च्या आसपास लोकांना वर खेचून घेतल.

पण खर Challages तर ऊतरताना होते.

ऊतरते वेळी भली मोठि रांग पाहुन वीचार केला की ..का होतय हे तर कळाल काही नवे ट्रेकर्स भितिपोटि Ladder वर पुढे सरकण्यास घाबरत होते. आम्ही वीचार केला कि आपण पुढे जावून थोडा Support करू जेणेकरून रांग ललकर लवकर पुढे होईल. मी आणी शरद वेगवेगळ्या ठीकाणी ऊभे राहून ते करत असताना ऐक गडी म्हणतो अरे लवकर करा काय टाईमपास करताय ….त्या वरून थोडा शाब्दीक चढाओढ झाली आणी त्या साहेबांना मदतीला बोलवले असता त्याची बोबडीच वळली . आता काय म्हणाव अशा स्वार्थी लोकांना…. बर तेवढच नाही त्यात अजून ऐक करामत म्हणजे आपण किति बींधास कडेवरून चालू शकतो ह लोेकांना दाखवण्याच्या नादात आणखी ऐका साहेबांनी ऐक दगड पाडला आणी तो आशीश च्या Shoulder वर पडला ..त्याला जखम तर झाली परंतू experience ट्रेकर म्हणून तो सहनकरु शकला …
या सगळ्या गोष्टींचा वीचार करता ऐक गोष्ट कळाली कि काही आतीमुर्ख आणी फुकटच्या हुशार्या मारणार्यां मुळे …कोणाचा तरी जिव जावू शकतो …

ऐक वीनंती हीच की जर प्रसंगा वेळी तुम्हााला मदद करता येत नसेल तर दुसर्याला तरी करू द्या. तुमच्या मोठेपणा पाई कोणाच तरी नुकसान होईल.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1427626883957466&set=a.522114084508755.1073741825.100001305035920&type=3
Konkankada Festival was feeling angry.
June 27 at 10:27am · Mumbai ·
To whomsoever it may concern,

We Believe that the Harishchandragad (Fort/Destination/Nature) is our home and that none of you have the right to just get yourself in and spoil the aura and sanctity of the place by smoking and drinking shit.
this week we saw a so called Hi-Fi group named vagabond from Mumbai enjoying drinks and smoking shit in the holy caves. Inspite of bringing the attention of the leader, they did not stop and later we found out that the leader was also doing the same thing in other cave. around 50cigarette filters and boxes which were thrown outside the cave were picked up by savaleram badad and told us when asked about this..
When asked, he said “i did not knew drinking and smoking is not allowed here. thanks for telling us we wont do it again”
And next day again same shit was going on.
THIS IS HOW YOU TRAIN YOUR LEADERS WHO DONT KNOW THAT SMOKING AND DRINKING IS NOT ALLOWED??
Organizations who take up clean up projects are not fools to clean your shit every now and then. You have no right to enter any place and sit shitting weed and emptying bottles.
THIS IS SAHYADRI AND THE PLACE IS BLESSED BY THE GREAT MARATHA KING CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ.
Shame on you groups who allow this things and henceforth any group who will be found doing such rubbish activities will be mentioned here and taken care of by the community as the village authorities are failing to take strict actions against them.
Please share to all commercial and professional groups and organizers and solo trekkers and non trekkers and picnicers and leisure trekkers

– Konkankada festival Team
https://www.facebook.com/konkankadafest/posts/1065150123615801


Posted

in

by

Tags: