11July 2022 Visapur Rescue. A boy fell on Visapur fort and received a call that he was injured at 3.30 pm yesterday. Immediately after that, Shivdurg rescue team went for help. Yash Mehta Mangaon Raigad and his friends had come for trekking at Visapur fort. While walking, he slipped and fell about sixty feet and got stuck in a tree. With the help of other tourists coming to the fort, his friends pulled him out of the bush but he could not stand due to serious injuries to both his legs. Shivdurg Rescue Team reached Patan village waiting for traffic. The locals and the team picked him up safely from the middle of the fort on a stretcher. And shifted to Pune after receiving first aid at private hospitals in Lonavla. Shivdurg rescue team members Mahesh Masne, Sagar Kumbhar, Rohit Vartak, Yogesh Umbre, Harsh Tonde, Hershal Chaudhary Shashikant Belhekar. Sainath Saste Patil and Prafulla Narwade from Pune helped in this rescue.
11July 2022 Visapur Rescue.
विसापूर किल्ल्यावर एक मुलगा पडला व जखमी असल्याचा फोन काल दुपारी साडेतीन वाजता आला. त्यानंतर लगेचच शिवदुर्ग रेस्कु टिम मदतीसाठी निघाली.
यश मेहता माणगाव रायगड व त्यांचे मित्र विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आले होते. चालताना पाय घसरून सुमारे साठ फुट तो खाली घसरला व एका झाडीत अडकला. किल्ल्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांच्या मदतीने त्यांच्या मित्रांनी त्याला झाडीतून बाहेर घेतले पण त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो उभा राहू शकत नव्हता. शिवदुर्ग रेस्कु टिम ट्रॅफिक मधून वाट काढत पाटण गावात पोचली. स्थानिक नागरिक व टिमने स्ट्रेचरवर किल्ल्याच्या मध्यावरुन खाली सुरक्षीत उचलून आणले. व लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करून पुणे येथे हलवले.
शिवदुर्ग रेस्कु टिमचे सदस्य महेश मसने, सागर कुंभार, रोहित वर्तक, योगेश उंबरे, हर्ष तोंडे, हर्षल चौधरी शशिकांत बेल्हेकर. साईनाथ सस्ते पाटील व प्रफुल्ल नरवडे या पुण्यातील युवकांनी या रेस्कुमध्ये मोलाचे सहकार्य केले.