Palghar dams, ponds, waterfalls are prohibited until September 6

पालघरमधील धरणं, तलाव, धबधब्यांत उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मनाई
पालघर : पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात. मात्र पालघरमध्ये तुम्ही धबधबे किंवा धरणावर पिकनिकला जाण्याचा विचार करत असाल, तर आणखी दोन महिने तुम्हाला थांबावं लागणार आहे. धबधबे, धरणात उतरण्यास 6 सप्टेंबर 2019 पर्यंत मनाई करण्यात आली आहे.

कोणकोणत्या धबधबे, तलाव आणि धरणांचा समावेश

1) काळमांढवी धबधबा, केळीचा पाडा, ता. जव्हार
2) हिरडपाडा धबधबा, ता. जव्हार
3) दाभोसा धबधबा, ता. जव्हार
4) डोम विहीरा खडखड धरण, ता. जव्हार
5) पळूचा धबधबा, साखरा, ता. विक्रमगड
6) वाघोबा खिंड धबधबा, ता. पालघर
7) एैना दाभोण धबधबा, बोईसर
8) पडघा, बोईसर धबधबा
9) देवखोप धरण, पालघर
10) तांदुळवाडी धबधबा, सफाळा, ता. पालघर
11) झांझरोळी धरण, केळवा रोड पूर्व, ता. पालघर
12) चिंचोटी धबधबा, वसई
13) तुंगारेश्वर धबधबा, वसई
14) वांद्री धरण, गांजे ढेकाळे, ता. पालघर
15) तिळमाळचा धबधबा, वडपाडा परळी, ता. वाडा

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 (C) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्हयातील 15 धबधबे, तलाव किंवा धरणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात 10 जुलै 2019 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये खालील गोष्टींसाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत कळवलं आहे.

धबधबा-धरणांवर काय करण्यास मनाई?

1. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहणे
2. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
3. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे
4. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे आणि उघड्यावर मद्य सेवन करणे
5. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे
6. वाहन अतिवेगाने चालवणे तसेच वाहतुकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहने चालवणे
7. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे
8. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल आणि प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे
9. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य आणि अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे किंवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे
10. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डीजे सिस्टम वाजवणे, गाडीमधील स्पीकर, उफर वाजवणे आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे
11. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे
12. धबधब्याच्या एक किमी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी आणि सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)

मनाईच्या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (ब) नुसार कारवाई करण्यात येईल. मनाई आदेशात नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्ती, संस्था यांच्याकडून चित्रिकरण, सामाजिक उपक्रम/कार्यक्रम इत्यादींसाठी संबंधित विभागाकडून पूर्व परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना लागू असणार नाहीत.
(MK)

— google translate below —

Palghar dams, ponds, waterfalls are prohibited until September 6
Palghar: There are many plans for going to the waterfalls, dams, ponds or rivers in the monsoon. Weekend plans many years with co-friends or friends. However, if you are planning to go to picnics on footpaths or on the river in Palghar, then you have to wait for another two months. Waterfall, dam has been prohibited till September 6, 2019.
Which waterfalls, ponds and reservoirs are included
1) Pumpkin waterfall, banana padha, Ta. Javar
2) Hingapada waterfall, Ta. Javar
3) Dabhosa waterfall, Ta. Javar
4) Dome Vihira Rakh Dam, Ta. Javar
5) Palal waterfall, Sugar, Ta. Vikramgad
6) Waghoba pass waterfall, Ta. Palghar
7) Anna Dabhan Falls, Boisar
8) Padha, Boisar waterfall
9) Devakhop Dam, Palghar
10) Tandulwadi Falls, Safala, Ta. Palghar
11) Jhanjharoli Dam, Kelwa Road East, Ta. Palghar
12) Chinchoti Waterfall, Vasai
13) Tungareshwar waterfall, Vasai
14) Vandri Dam, Gange Dhekale, Tal. Palghar
15) Tillalal Falls, Vadpada Parli, Tal. Wada
Section 144 of the Criminal Procedure Code, 1973 and the Disaster Management Act, 2005, prohibits the following for the following things during the period from July 10, 2019 to September 6, 2019, within one kilometer around 15 waterfalls, ponds or dams in Palghar district. Is being done. District Magistrate Dr. Prashant Naranvere has informed about this through a press release.
What are the prohibitions of waterfalls?
1. Due to the rains falling into the water rapidly drifting, falling into deep water and swimming in it
2. Floodwave or sit under water flow.
3. Sailfish removal or any type of shooting due to rains caused by dangerous sites, waterfalls, rocks, dangerous turns
4. Drinking or drinking alcoholic beverages, drinking alcohol, selling unauthorized alcohol, and drinking alcohol on open in the natural waterfalls of rain caused by rain
5. Stop vehicular traffic as well as stop vehicles in dangerous places
6. Running vehicles in such a way as to drive the vehicle faster and also affect the traffic
7. Vehicle driving while driving vehicles and overtaking other vehicles in dangerous condition
8. throwing food, garbage, glass and plastic bottles, thermocol and plastic materials in public at public places
9. Conducting any kind of sexual harassment, tinkling, indecent behavior with women, indecent and obscene gestures, sedition or shame.
10. Playing loud sound mechanism in public place, sounding DJ system, speaker speaker, buzz and so make noise pollution
11. Any action that will make noise, gas and water pollution
12. All bikes, four-wheelers and six wheeler vehicles are prohibited from accessing one kilometer area of ​​waterfalls (excluding essential service vehicles).
If the breach of prohibition order is concerned, the action will be taken against Section 51 of the Indian Penal Code 1860 and 51 (B) of Disaster Management Act 2005. In the prohibition order, in the places mentioned in the order given by the concerned departments, for the purpose of filming, social activities / programs etc, from the individuals, institutions, will not be applicable to prior permission programs.
(MK)

Posted

in

by

Tags: