Nashik Climbers & Rescuers Association कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान april 2024

 कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान*



https://www.facebook.com/groups/1879620169023234/posts/3696614530657113/

रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता एम एम आर सी सी मधून ओमकार ओम चा फोन आला कोकणकड्यावरून एका मुलीने सुसाईड केले आहे असा राजुर पोलीस स्टेशन मधून फोन आला आहे आपल्याला मदतीला बोलवत आहेत त्याप्रमाणे शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन असे जॉइंटली ऑपरेशन करायचे परंतु यामध्ये गणेश गिध यालाही ऍड करावे असे दयानंद कोळी यांनी सुचविले त्याप्रमाणे कॉन्फरन्स कॉल वरती गणेश गिधला घेण्यात आले आणि चर्चेअंती असे ठरले की गणेश गिध डेला ॲडव्हेंचर टीम आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनची टीम जॉईंटली ऑपरेशन चालू करेल त्यांना शिवदुर्ग गरज लागल्यास बॅकअप देईल ठरल्याप्रमाणे दोन्ही टीम सर्व आवश्यक साहित्यांची पॅकिंग करून रात्री आठ वाजता कोकणकड्याच्या दिशेने निघाली प्रवासादरम्यान मुरबाड मधून दीपक विसे तसेच कल्याण मधून सतीश बोबडे यांची शिवगर्जना ही टीम ही ऑपरेशन मध्ये जॉईन झाली सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता राजूर पोलीस स्टेशन मध्ये करून नाशिक क्लाइंबर्सची टीम पाचनई गावात सरपंच श्री भास्कर बादड यांच्या घरी रात्री 1:30 वाजता पोहोचली गणेशची डेला एडवेंचर टीम सह इतर दोन्ही टीम रात्री 3:30वाजता भास्करच्या घरी पोहोचली रात्रीच कोकणकड्यावर जायचं होतं परंतु इक्विपमेंट जास्त असल्याने आणि गावातील मंडळी उपलब्ध न झाल्यामुळे सकाळी साडेसहा वाजता आणलेल्या सर्व साहित्यांमधून आवश्यक साहीत्यांसह कोकणकड्याच्या दिशेने निघाली ठीक 8:00 वाजता कोकणकड्यावर पोहोचली त्यानंतर सर्व अँकरिंग पूर्ण झाल्यानंतर 15 जणांच्या टीमचे चार भागात विभागणी करण्यात आली गणेश गीध याच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबवले जात होते खाली उतरणाऱ्या टीम मध्ये दीपक विसे आणि तनया कोळी हे दोघे होते गरज पडल्यास दर्शन याला पाठवण्यात येणार होते कम्युनिकेशन टीम मध्ये हॅम रेडिओ सेटअपसह दयानंद कोळी अजय पाटील सतीश बोबडे सचिन गुरव हे होते टॉप वरील अँकरिंग वर लक्ष देण्यासाठी अँकर नंबर 1टीम आणि अँकर नंबर 2 टीम त्याचबरोबर दोन सदस्य इक्विपमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी ठेवण्यात आले होते आधी मिळालेल्या माहितीनुसार बॉडी ही फक्त 300 ते 350 फूट आहे त्या अनुषंगाने नाशिकच्या टीमने 200 मीटरची रोप कॉईल आणि 100 मीटरच्या दोन कॉइल सोबत आणल्या होत्या तसेच गणेशने 200 मीटरच्या दोन कॉइल आणि 100 च्या दोन कॉइल तसेच इतर टेक्निकल इक्विपमेंट ही दोन्ही टीमच्या सोबत होते ऍक्च्युअल कड्यावर गेल्यानंतर पाहिले तर बॉडी ही ऍडव्हान्स बेस कॅम्प ला जाऊन पडलेली होते म्हणजे जेथे दोन उंबराची झाड आहेत त्या टप्प्यापासून 40 फूट वरती पडलेली होती ही खोली कड्यापासून सुमारे 1400 फूट होती आता खरंच टीमच्या समोर मोठे आव्हान होते सलग 1400 फुटाचा रोप टीम जवळ नव्हता पण कुशल नेतृत्व टीम सोबत होते त्यामुळे आजवरच्या आपल्या सर्व अनुभवाचा कस लावीत गणेशने टीम सोबत असलेल्या तिन्ही 200 मीटरच्या रोप कॉइल जॉईंट करण्याचा निर्णय घेत ऑपरेशनला सुरुवात केली दोन्ही रोप वरील बिले मन रेडी करून सकाळी ठीक साडेनऊ वाजता गणपती बाप्पा आणि आई भवानीचा नामस्मरण करून सर्वप्रथम दीपक विसे कोकणकड्या वरून रिकवरी साठी खाली उतरला साधारणता अर्ध्या तासात दीपक बॉडी पाशी पोहोचला आणि सुरक्षित जागी उभा राहिला रोपला दोन ठिकाणी नोट्स असल्यामुळे खाली पोचेपर्यंत बिले पॉईंट आणि पुली अशा दोन ठिकाणी नॉट शिफ्टिंग कराव्या लागत होत्या दीपकच्या पाठोपाठ तनया कोळी ही सुद्धा कोकण कड्यावरून दीपकच्या मदतीसाठी स्ट्रेचर विक्टिम बॅग आणि थोडेफार कोरडे खाण पाणी सोबत घेऊन खाली उतरली दोघ एकमेकांची काळजी घेत दुपारी ठीक वाजून 12:05 मिनिटांनी खाली पडलेल्या त्या मुलीच्या जवळ पोहोचले 1400 फूट उंचीवरून जीव दिल्यामुळे अतिशय वाईट आणि भयानक अवस्थेमध्ये तिचे शरीर दिसत होते पूर्ण डोकं फुटलं होतं हात पाय तुटले होते शरीराची पूर्ण एक बाजू डोक्यापासून पायापर्यंत डॅमेज झाली होती बॉडीच्या जवळ जायच्या आधीच दोघांनीही सर्जिकल ग्लोज सह सर्जिकल मास घातले सर्जिकल ग्लोज वरती कॉटन ग्लोज परिधान करून दोघेही टॉप रोपला अटॅच राहूनच त्या बॉडीला सुरक्षित जागेवरती हलवलं त्यानंतर सोबत नेलेली विक्टिम बॅग तिच्या बाजूला अंथरली दीपकने डोक्याकडील बाजूने आणि तनयाने पायाकडील बाजूने सावधगिरीने तिला सरकवीत विक्टिम बॅग मध्ये पॅक केली  (कारण ती उचलण्याच्या अवस्थेत नव्हती) त्यानंतर सोबत नेलेल्या स्केड स्ट्रेचर मध्ये तिला प्रॉपर पॅक करून टॉप रोपला अँकर केले आणि दोघेही फॉल लाईन पासून दूर जाऊन सुरक्षित ठिकाणी उभे राहत तनया वॉकी टॉकीवर वरील टीमशी संपर्क साधत होती बॉडी पॅक केलेली स्ट्रेचर बरोबर दुपारी 2वाजता वरती खेचण्यास चालू करण्यात आली अतिशय सावधगिरीने स्ट्रेचर पूल करण्यात येत होती एवढ्या मोठ्या ओवर हँग अंतरामुळे रोपला खूप ट्विस्ट पडलेले होते ते ट्विस्ट मोकळे करत हळूहळू स्ट्रेचर दुपारी ठीक 3:30 वाजता कड्याच्या वरील भागात खेचून घेण्यास टीमला यश आले राजुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी कवळे साहेब कोकण कडयावर आलेलेच होते वर आणलेली बॉडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली त्यानंतर खालील टीमला पुढचे ऍडव्हान्स बेस कॅम्प टू बेस कॅम्प येथील 300 फुटाचा रॅपल करून जाण्यासाठी 200 मीटरची रोप कॉईल अटॅच करून त्यावर दर्शन यास खाली सोडण्यात आले बरोबर सव्वाचार वाजता दर्शन दीपक आणि तनयाच्या जवळ जाऊन पोहोचला तेथून 200 मीटरची कॉइल सेपरेट करून खाली असलेल्या उंबराच्या झाडाला चाळीस फुटाचा रोप आणि दोन स्क्रू गेट कॅराविनर लावून त्यातून 200 मीटरची कॉइल यु करून तिघेही एका मागून एक असे खाली उतरले आणि रोप खाली खेचून घेतला त्यानंतर त्यांना घेण्यासाठी बेलपाड्यातून दोन गावकरी आलेले होते एकूण पाच जणांची टीम खालच्या बाजूने नळीच्या वाटेने पाचनई गावात पोचणार होती बरोबर संध्याकाळी 5 वाजता दोन्ही टीम सोबत असलेल्या सर्व टेक्निकल साहित्यांची व्यवस्थित पॅकिंग करून कोकणकड्यासह आई भवानी चे आभार मानून पाचनई गावाच्या दिशेने निघाल्या टॉप वरील टीम 6:15 वाजता तर खाली उतरलेली टीम रात्री ठीक 8:30 वाजता पाचनई गावात भास्कर बादड यांच्या घरी पोहोचल्या तेथे गेल्यावर सर्व साहित्यांची मोजणी करून प्रत्येक टीमने आपापले साहित्य वेगळे केले आणि रात्री ठीक दहा वाजता आलेल्या सर्व टीम राजूर पोलीस स्टेशनला पोहोचल्या तेथे राजुर पोलीस स्टेशन तर्फे सर्व रेस्क्यू टीम मेंबर्स चे पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आभार व्यक्त करीत कौतुक करण्यात आल त्याचबरोबर रेस्क्यू टीमच्या जेवणाची व्यवस्था तसेच टीमचा झालेला प्रवास खर्च हा राजुर पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आला पोलीस स्टेशननी खूपच चांगल्या प्रकारे रेस्क्यू टीमला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे सर्व रेस्क्यू टीम खूप खूप आभारी आहेत एक्चुअल रिकवरी करण्यासाठीचा टाइमिंग सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 म्हणजेच फक्त 6 तासात 1400 फुटाचे रिकव्हरी ऑपरेशन सर्व टीमच्या  सहकार्याने यशस्वी पूर्ण करण्यात आले *कोकणकडा रिकव्हरी ऑपरेशन मधील सहकारी सदस्य**

 टीम *नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन*

 दयानंद कोळी

 तनया कोळी

 अभिजीत वाघचौरे 

अजय पाटील

 *टीम डेला ऍडव्हेंचर*

 गणेश गीत 

आकाश अंभोरे

  सुधीर उंबरे

 शैलेश शेलोकार

 विनायक गोपाळे

 दर्शन देशमुख 

*सह्याद्री एडवेंचर मुरबाड**

 दीपक विसे 

*टीम शिवगर्जना**

सतीश बोबडे 

 तन्मय माने

भरत जाधव

 **टीम रक्षा सामाजिक विकास मंडळ*

पाचणाई ग्रामस्थ, भास्कर badad, रोहित बादड , रवी  झाडे, ज्ञानेश्वर बादड 

Badad 

सुमित गुरव


*Konkada recovery operation a challenge*

On Sunday 7th April 2024 at 6:30 pm received a call from Omkar Om from MMRCC saying a girl has committed suicide from Konkada, a call from Rajur police station is calling you for help. Likewise Shivdurg Rescue Team Lonavala and Nashik Climbers and Rescuers Association As Dyanand Koli suggested that Ganesh Gidh should also be added to jointly operation but Ganesh Gidh should also be added on the conference call and the end of discussion that Ganesh Gidh Dela Adventure Team and Nashik Climbers and Rescuers Association team will start jointly operation. Shivdurg will give backup if needed. As planned, both the teams packed all the necessary materials and left towards Konkada at eight pm. During the journey, Deepak Vise from Murbad and Satish Bobde from Kalyan, Shivgarjana team joined the operation to fulfill all legal matters at Rajur Police Station, Nashik Climbers team in Pachanai village Sarpanch Shri Bhaskar Ganesh’s Dela Adventure Team reached Badad’s home at 1:30 pm and both other teams reached Bhaskar’s home at 3:30 pm. They wanted to go to Konkada at night but due to high equipment and the village congregations were not available, they went towards Konkada with all the necessary materials brought at 6:30 am. After that after completing all the anchoring, the team of 15 were divided into four parts. Under the leadership of Ganesh Gidh, this operation was being implemented. Deepak Vise and Tanya Koli were both in the team. If needed, the darshan will be sent to the communication team with Ham radio setup. Dayanand Koli Ajay Patil Satish Bobde Sachin Gurav was the anchor number 1 team and anchor number 2 team to focus on the anchoring at the top. Along with that two members were kept to provide equipment. According to the information received earlier, the body is only 300 to 350 feet. According to that, the team of Nashik coiled 200 meters and Two coils worth 100 meters were brought along with Ganesh, two coils worth 200 meters and two 100 coils and other technical equipment were with both the teams. After going to the actual brink, the body was lying to advance base camp, which means 40 from the stage where there are two umbrella trees. The room was lying over the feet was about 1400 feet from the bride now there was a big challenge in front of the team consecutive 1400 feet rope team was not near but skilled leadership was with the team so how to enjoy all our experience till date Ganesh decided to joint all three 200 meters rope coils with the team Started the operation by taking the bills on both the saplings, mind was ready and after remembering Ganapati Bappa and Mother Bhavani at nine:30 in the morning, first of all, Deepak Vise got down from Konkada for recovery. In about half an hour, Deepak reached the body and stood in a safe place till the plant reached down due to notes at two places. Note shifting was had to be done at two places like Bill Point and Puli. Followed by Deepak, Tanaya Koli also came down with a stretcher victim bag and a little dry mining water from Konkan to help Deepak. Both of them taking care of each other and reached near the girl who fell down at 12:05 in the afternoon 1400 Her body was visible in a very bad and horrible condition due to giving life from foot height full head was broken arms legs were broken whole side of body was damaged from head to toe before getting close to the body both wore surgical mass with surgical glosses both top Attached to the rope and moved the body to a safe place. Then the accompanied victim bag lamped on her side and Tanaya on her side carefully packed her in a slide victim bag (because she was not in a carrying mode) then packed her properly in the carried skade stretcher and anchored the top rope And both off the fall line and standing in a safe place Tanya was contacting the team above at walkie talkie with body packed stretcher pulling up at 2pm very carefully the stretcher was being pooled due to such a large over hang gap had a lot of twist The team managed to slowly pull the stretcher into the top area of the branch at 3:30 pm. Senior officer of Rajur Police Station Kavale Saheb had come to Konkan branch. The body brought on was released by the police. Then the following team was able to rapple 300 feet at the next Advance Base Camp to Base Camp 200 meter plant coil was attached and dropped down to Darshan. Along with the discussion, Darshan reached near Deepak and Tanaya. From there, separated 200 meter coil and planted a 40 feet plant to the umbrella tree underneath and two screw gate caraviner and used 200 meter coil from it. All three were backward. One came down and pulled down the rope, after that two villagers came from Belpada to pick them up. A total of five people team was going to reach Pachanai village on the lower side by the hose. Along with 5 pm, both the teams were packed properly and thanked Aai Bhavani with Konkankada The top teams left for the village at 6:15 pm and the team who went down reached Bhaskar Badad’s house at Pachanai village at 8:30 pm. After reaching there, each team separated their materials by counting all the materials and all the teams who arrived at exactly 10 pm reached Rajur police station there The station thanked all the rescue team members and appreciated by the police officers. Along with that, the food arrangement of the rescue team as well as the travel expenses of the team was given by the Rajur Police Station. The police station is very thankful to their rescue team for cooperating with the rescue team in a very well way. Timing for actual recovery is 9:30 am to 3:30 pm, that is only in 6 hours, 1400 feet recovery operation was successfully completed with the cooperation of all the team *Associate member of Konkada Recovery Operation**

Team *Nashik Climbers & Rescuers Association*

Dayanand Koli

Tanya Koli

Abhijeet Waghchaure

Ajay Patil

*Team Della Adventure*

Ganesh song

Akash Ambhore

Sudhir Umbre

Shailesh Shelokar

Vinayak Gopale

Darshan Deshmukh

*Sahyadri Adventure Murbad**

Deepak Vise

*Team Shivgarjana**

Satish Bobde

 तन्मय माने

Bharat Jadhav

**Team Raksha Social Development Board*

Panchnai Villagers, Bhaskar Badad, रोहित बादड , Ravi Trees, Dnyaneshwar Badad

Badad 

Sumit Gurav


Posted

in

by

Tags: