Kataldhar Waterfall Rescue 31st July 2022

 Kataldhar Waterfall Rescue

*कातळधार रेस्क्यू*

रविवार दि. ३१ जुलै २२ रोजी

कॉल आला की एक मुलगी कातळ धार धबधब्याजवळ पडली असून तिचा पाय फ्रॅक्चर असल्याने ति जागेवरून हालू शकत नाही . लगेचच टिम ची जुळवाजुळव करून रेस्क्यूसाठी निघालो . लोणावळ्यातून राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून फणसराई च्या जवळ खाली दरीन कातळधार हा प्रचंड धबधबा कोसळतो. हा धबधबा पाहण्यासाठी किवा दरीतील हा ट्रेक करण्यासाठी मुंबई पुण्याकडून अनेक ट्रेकर येत असतात . याच ट्रेकला सहा जणांचा एक ग्रूप आला होता . धबधब्याजवळ या ग्रुपमधील एक मुलगी येथील मोठ्या दगडावरून पाय घसरून पडली. यावेळी तिच्या पायाला प्रॅक्चर झाले . याठिकाणी दुसऱ्या ग्रुपबरोबर गेलेली प्राजक्ता बनसोड ( शिवदुर्ग सदस्या ) ही त्याठिकाणी होती . तिने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून फोन केला व मदतीची गरज असल्याचे सांगितले .

साधारण पणे दिड तासात टिम घटनास्थळी पोहचली . पोहचल्यानंतर प्रथमोपचार करून स्ट्रेचरवर घेतले. घनदाट जंगलातून अतिषय अवघड व चढणीच्या वाटेने सदर जखमी मुलीला रस्त्यापर्यंत आणले व त्यानंतर अम्ब्यूलन्स मधून पुढील उपचारासाठी त्यांच्या ग्रुपबरोबर पाठवून दिल .

* शिवदुर्ग टिम*

रोहीत वर्तक, समिर जोशी, योगेश उंबरे, अमोल परचंड, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, आनंद गावडे, राजेंद्र कडू, कुणाल कडू , अशोक उंबरे, चैतन्य वाडेकर, प्रणय आंभुरे, हेमंत पाटील, प्राजक्ता बनसोड, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, तुषार सातकर, सचिन वाडेकर, यश वाडेकर, मुंबई ट्रेकर – लियांडर वाझ, जोयेल विल्फ्रेड, सुशांत वायदंडे, व जय सोनार अमोल चिनुरे.

#rescue #savelife #socialwork #humanity #mountain #outdoors #mountainrescue #trekkingindia #waterfalls #accident #quickresponse

https://www.instagram.com/reel/CgyW4lipqvc/


Posted

in

by

Tags: