https://www.facebook.com/groups/1879620169023234/posts/3516482842003617/
हरिश्चंद्रगडावर झाल्या दोन दिवसांत दोन यशस्वी शोधमोहिमा…. रविवार दिनांक 16 जुलै हरिश्चंद्रगडावर झाल्या दोन दिवसांत दोन यशस्वी शोधमोहिमा….
रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी अहमदनगर येथुन हरिश्चंद्रगड ट्रेकसाठी आलेला नऊ जणांचा ग्रुप खिरेश्वर टोलारखिंड मार्गे हरिश्चंद्रगडावर सुखरूप पोहचला पण….
परतीच्या प्रवासादरम्यान हरिश्चंद्रगडावर धुकं व पाऊस जास्त असल्यामुळे नऊ जणांच्या ग्रुपमधील दोन जण धुक्यात भरकटल्यामुळे ते परत खिरेश्वरच्या वाटेने खाली येण्याऐवजी पाचनई गावात उतरले,
दरम्यान त्यांचे सात सहकारी खिरेश्वर गावात पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपले दोन सहकारी खिरेश्वरला पोहचलेच नाहीत, त्यांचे सहकारी खिरेश्वरला पोहचलेच नसल्याने ते पुर्णता: गोंधळून गेले होते,ते गावातील लोकांकडे मदत मागत होते,पण… रविवार असल्याने खिरेश्वरला आडराई जंगल ट्रेकसाठी खूप गर्दी होती, त्यामुळे प्रत्येक जण त्या दिवशी व्यस्त होता, त्यादरम्यान आमचे मोठे बंधू मारुती चहादु रेंगडे हे पुण्याहून आलेल्या ग्रुपला आडराई जंगल ट्रेकसाठी गाईड म्हणून गेले होते,
त्यांना सोडून घरी जात असताना सायंकाळी पाच वाजता त्यांच्याकडे या ग्रुपच्या सहका-यांनी मदत मागितली, पण… बंधुनी त्यांना थोडा वेळ वाट पाहायला सांगितले, काही कारणास्तव त्यांना पोहचण्यासाठी वेळ लागु शकतो, त्यामुळे त्यांना आधार देत त्यांना सांगितले जर थोडा वेळ वाट पाहुनी जर तुमचे मित्र आले नाहीत तर मला फोन करा. दोन तास वाट पाहिल्यानंतर त्यांचे सहकारी पोहचले नसल्याने ते अस्वस्थ झाले, त्यांनी मारुती रेंगडे यांना फोन केला व सांगितले की आमचे मित्र आले नाहीत.तेंव्हा संध्याकाळचे सात वाजले होते,
बंधुना पेच पडला की त्यांना शोधायचं कसं, पण… क्षणाचा विलंब न करता त्यांनी हरिश्चंद्रगडावर आसणा-या आमचे मित्र रामनाथ बारकु भारमल यांना फोन लावुन गडावर तपास करण्यास सांगितले,व गावातील मित्र बंटी मेमाणे यांना सोबत घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले, साडेसात वाजता रामनाथ बारकु भारमल यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की ते दोन जण पाचनई गावात उतरले आहेत, त्याच दरम्यान त्या दोन जणांचा मोबाईल नेटवर्कमध्ये आल्याचा मेसेज आला, त्यांना फोन लावुन त्यांना विचारले असता त्यांनी लव्हाळी या गावात असल्याचे सांगितले. टोलारखिंडीत पोहोचल्यावर त्यांनी तेथील वनविभागाचे कर्मचारी शरद भांगरे व गौरव मेमाणे यांना त्या घटनेची माहिती देवून लव्हाळीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
शरद भांगरे व गौरव मेमाणे यांनी या घटनेची शहानिशा करण्यासाठी परिसरातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन विचारले असता त्यांनी त्या दोन जणांना कोथळे येथे सोडले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी मारुती रेंगडे यांना फोन करून सांगितले की ते लव्हाळी गावात नसुन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कोथळे गावात आणून सोडले आहे.
मारुती रेंगडे यांनी त्यांना बुधा भांगरे यांच्या घरी थांबण्यास सांगितले व त्यांनी आपला मोर्चा कोथळे गावाकडे वळवला.
रात्री साडे आठ वाजता कोथळे गावातील बुधा भांगरे यांच्या घरी पोहचल्यानंतर त्या दोन जणांच्या जेवणाची व्यवस्था केली व रात्री साडे नऊ वाजता त्यांना सोबत घेऊन टोलारखिंड मार्गे खिरेश्वर चा प्रवास सुरू झाला,व रात्री बारा वाजता सुखरूप खिरेश्वर गावात पोहोचले. सर्वांनी मारुती रेंगडे व बंटी मेमाणे यांचे आभार मानले व रात्री एक वाजता सदर ग्रुप अहमदनगरसाठी रवाना झाला.
घटना क्रं 2
……….………..या घटनेचा सविस्तर वृत्तांत असा की ठाणे येथील चार जणांचा ग्रुप वय अंदाजे अठरा ते बावीस वर्षे… हरिश्चंद्रगड ट्रेक साठी 17 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता खिरेश्वर गावात पोहचला, गावातील ऐश्वर्या हाॅटेल मध्ये चहा नाश्ता करून थोडीशी माहिती घेऊन त्यांनी टोलारखिंड मार्गे हरिश्चंद्रगड ट्रेक चालू केला.
चिंतामण कवटे यांनी त्यांना आपल्या हाॅटेलचे कार्ड दिले व सांगितले की काही अडचण आल्यास फोन करा.
साडेचार वाजता ट्रेक सुरु झाला, टोलारखिंडीतुन पुढे जाण्यासाठी त्यांना रात्र झाली त्यामुळे रात्रीच्या अंधारात धुक्याची जोड…
अशी अवस्था त्यात जोरदार पाऊस सुरू होता,
त्यामुळे त्यांना रस्ता समजत नव्हता, शेवटी जे नको तेच घडलं हरिश्चंद्रगडाकडे जाणा-या पाऊलवाटेने न जाता ते वेताळ दांडाच्या
बाजुला गेले. रात्री नऊ वाजले तरी हरिश्चंद्रगड येत नाही म्हणून त्यांनी चिंतामण कवटे यांना फोन केला, व त्यांनी आंम्ही रस्ता चुकलो आहोत हे सांगितले. रात्री नऊ वाजले असल्याने गडावर जाण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते, त्यामुळे चिंतामण कवटे यांनी रेंगडे बंधु जाऊ शकतात याची खात्री असल्याने त्यांना मारुती रेंगडे यांचा नंबर दिला व सांगितले की त्यांना फोन करा ते तुंम्हाला मदत करतील.
सोमवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी पुन्हा आमचे बंधु मारुती रेंगडे हे जालना येथुन आलेल्या पाच जणांच्या ग्रुपसोबत आडराई जंगल ट्रेकसाठी गाईड म्हणून गेले, व दुपारी चार वाजता परत आल्यावर ते दोन दिवसांची दगदग व पुरेशी झोप न झाल्याने सायंकाळी पाच वाजता झोपी गेले, रात्री दहा वाजता त्यांचा फोन वाजला गाढ झोपेत असल्या कारणाने त्यांना जाग आली नाही, त्यामुळे आमच्या वहिनींनी फोन उचलला तर समोरुन रडण्याचा आवाज आला,व वहिनींनी गोंधळून आमचे बंधु मारुती रेंगडे यांना उठवले व फोन दिला. समोरुन सांगितले की आंम्ही रस्ता चुकलो आहोत आंम्ही कुठे आहोत हे आंम्हाला समजत नाही.
त्यांच्या बोलण्यातली तगमग व रडण्याचा आवाज ऐकून मात्र मारुती रेंगडे यांची झोपच उडाली. त्यांनी मारुती रेंगडे यांना विनंती केली काहिही करा पण आंम्हाला घ्यायला या…
इतक्या रात्री त्यात जोरदार पाऊस व धुकं असण्याने एकटे जाणे शक्य नव्हते, म्हणून आमच्या घरी आलले गावातीलच पाहुणे मधुकर धरमुडे यांना सोबत घेऊन मारुती रेंगडे रात्री साडे दहा वाजता त्या ग्रुपच्या मदतीसाठी रवाना झाले,
रात्री साडे बारा वाजता ज्या परिसरात ते चुकले होते त्या परिसरात पोहचले पण धुकं व पाऊस असल्याने तो ग्रुप त्यांना सापडत नव्हता, आवाज देवून देखील प्रतिसाद येत नव्हता, तब्बल आठ तासांच्या शोधमोहिमनंतर सकाळी साडे सात वाजता मारूती रेंगडे व मधुकर धरमुडे यांना तो ग्रुप भेटला, पण… रात्री जोराचा पाऊस, वारा , यामुळे या ग्रुपची अवस्था शब्दात वर्णन करण्यापलीकडची होती.
सकाळी आठ वाजता हरिश्चंद्रगडाच्या पाऊलवाटेवर असणा-या एका स्टाॅलवर आणुन त्यांना शेकोटी करुन दिली,व चहा मॅगी खाऊ घालुन खिरेश्वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली, दिड दोन तासांच्या प्रवासाला तब्बल सहा तास लागले.
दुपारी एक वाजता आमच्या घरी त्यांना जेऊ घालुन ऐश्वर्या हाॅटेल येथे आणून सोडले. त्यांनी मारुती रेंगडे व मधुकर धरमुडे यांचे आभार मानले.
मित्रांनो पावसाळा आणि सह्याद्री यांचं नातं आहे ते न उलगडणारं आहे, कधी कोसो दूर असलेल्या डोंगररांगा स्पष्ट दिसतात,तर कधी सोबतीला असलेला सहकारी धुक्यामुळे दिसत नाही.
जोराचा पाऊस,दाट धुकं, भयंकर वारा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
त्यामुळे पावसाळ्यात सह्याद्रीत कुठल्याही ट्रेक, सहल किंवा ट्रिपचं नियोजन करत असाल तर……
त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती जाणून घ्या, एखाद्या दोन स्थानिक लोकांचें तसेच रेस्क्यु टिमचे (दुरध्वनी)मोबाईल नंबर
जवळ ठेवा.
ओढे नाले ओलांडताना त्यात असणारे खाच खळगे,
प्रवाह किती जोराचा आहे हे लक्षात येत नाही त्यासाठी
रोप (दोरी)चा व काठीचा वापर करा.
धबधब्याखाली भिजत असाल व पावसाचं प्रमाण वाढलं तर वेळीच बाजूला व्हा.
उंच ठिकाणी जाताना किंवा फोटोग्राफी करताना सावधगिरी बाळगा.
सह्याद्रीत टूव्हिलर, किंवा फोरव्हिलर घेऊन जाताय,तर काळजी घ्यावी, प्रामुख्याने अरुंद घाटरस्ते आहेत,व ते धुक्याने वेढलेले असतात,
कृपया….(१)सोबत असलेलं जेवण, फास्ट फूड, पाणी बाॅटल,
रस्त्यावर टाकु नका,
(२)गाईड घेण्यास कुठलाही कमीपणा मानू नका जेणेकरून वरती नमुद केलेल्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.
टुरिस्ट गाईड…
बाळु रेंगडे 9370996422
मारुती रेंगडे 7875833915