The fort is located at a height of 1,470 feet above sea level in the Kulang hill range in Nashik district and forms part of the Alang-Malang group of forts.
“We were panicky and remained awake all night. We had planned to start scaling the fort at 10 am on Sunday, but got late. We started climbing at around 3 pm. We stayed together and waited for the rescue team to arrive,”
There were eight men and five women in the group, majority of them in their 20s and 30s. All of them were first-time trekkers.
a team of 15 local volunteers from Chandori village of Niphad taluka, was mobilised
But, even the local guide could not find the route to the fort ???
But, even the locals (could not find the route to the fort
Pramod Anderson, a guide from Mumbai.
The guide was not a local resident, and their calculation went awry.
I told them to not remove their shoes for safety. We also told them to use one mobile phone at a time to save battery.
We could not find their exact location, so we told them to whistle loudly.
Detailed account shared by Prashant Rajaram Pardeshi in marathi
https://www.facebook.com/prashantpardeshi21/posts/10226050026860182
english translation done from google translate from marathi
On Sunday, the trip of 11 Gujarat tourists to Kulang fort near Ghoti in Nashik turned into an unexpected nightmare. Was the end of this trip sweet or bitter? How did the Marathi rescue force rescue them in the middle of the night and bring them down safely? This whole story is worth listening to. The purpose of this article is to convey to you the direction of Maharashtra’s world famous historical and geographical tourism. Are we able to implement history and geography tourism? Leave it to you, what memories of outsiders are carrying with you …
On 29th August, around noon, 7 persons from Baroda along with their 2 relatives from Mumbai reached the foothills of Kulang fort near Ghoti in a private vehicle from Mumbai. In Maharashtra, people visit forts. Some of them were for trekking, some for trekking and some for trekking. They heard from someone that people come to the fort even in half a day. From there, the highest peak of Maharashtra, Kalsubai and the surrounding mountains were visited. The surroundings of the fort are quiet and beautiful under the mantra. Its beauty is enhanced by the rainy season.
He reached Ambewadi around noon. Relatives from Mumbai had done some treks earlier. He had learned that Kunlang was a simple fort. No one from the village was with Watadya. Maybe they didn’t get one because of the farm work or they didn’t take it with them.
They waited for the fort in a pleasant atmosphere. Heard of using Google Maps. He soon realized that the climb to the fort was the largest of all. It was starting to rain. So he decided to go to the fort. They may not have noticed that the sun was setting or that the light was dimming while the trek was in full swing. They must have noticed the arithmetic of time and the difficulty of the journey while waiting for the steep carved steps. He tried to keep going, but when it got dark, he realized that it was not possible to go back from this difficult area to the top of the fort. Realizing the danger, the wise man got the telephone number of Nashik District Disaster Management. Arjun Kurrahade has recently taken charge of the disaster department. For the past several years, Prashant Waghmare has been in charge of disaster management. Mr. Kurrahade contacted the rescue squad at Chandori directly around 3:00 am and requested them to immediately launch a rescue operation at Kulang fort. The Vanteya Mountaineering Association in Nashik used to contact the rescue team of the oldest and most experienced mountaineering organization or the Bhosla Adventure Foundation. Chandori Rescue Force is mainly known for its water rescue. They are called anywhere in the district to rescue in the water. Since the force had some mountain rescue equipment, they woke up the rescue squad members in the middle of the night. Sagar Gadakh, the chief of this force, informed that he reached the foothills of Kulang around 4-30 in the morning. From there, they reached the area where the tourists from Baroda were staying. It was already dark. Kiran Rao, Balu Ambekar, Vaibhav Jamdade, Shanad Wakhande, Vilas Gangurde, Suresh Shete formed two groups. One group was sent to Madan and the other to Kulang. Tourists could not tell the exact location. Nor did the defense realize it. Finally, around 9:00 am, one of his team saw tourists. Until then, the church was standing there. Because of the slippery roads and the deep ravines, they showed the wisdom of staying together.
The rescue squad wasn’t immediately available for comment. As a result, the tourist community was in turmoil. There was occasional contact over the phone and they were constantly reassured. These congregations had to spend the night in difficult places in the dark with heavy rain. Then began to bring them down. At 1:50, everyone was brought to the base. Parmeshwar Kosole of Igatpuri tehsildar’s office reached the spot. The rescue squad was led by Tehsildar Tejas Chavan and Resident Collector Bhagwat Doiphode.
These tourists had no idea that another crisis was waiting for them after reaching the foothills. At the foothills, Forest Department officials began their investigation. Explain why our permission was not granted
Saying this, he checked his documents and imposed a fine. The amount of the fine could not be ascertained, but the rescue squad was persuaded to co-operate with the tourists, but the Forest Department officials completed the task. The tourists said that there was no forest department post here and there was no information about where to tear the receipt but it was of no use. A section was seen waking up in the middle of the night and coming to the rescue, while a section was seen taking action. You can’t run tourism that way. If the forest department wants to implement tourism, you need to have such a system. There should be facilities like outposts, guards, rescue teams. Where can I pay the registration fee, where can I get permission, can I get a share from the village or from a government employee? Planning for where to get food must be prepared. Mountain tourism is not about building roads, it is about putting up so-called protective walls of iron pipes in the mountains. Starting when it feels like it, banning it whenever it feels like it can send a different message to the tourist. In the most difficult places on the back of the world, tourism continues all season. The forest department has to be precise in some of these, otherwise what memories of tourism in Maharashtra will people carry away.
Our region is full of mountain beauty. It has a glorious history. At every step, the glory of this glory is to be shown to the world. Ineffective planning should not cause you to fail to show it properly.
Kulang in the conventional sense is a simple category fort. But he is not really a snake as easy as it seems to a Maharashtrian man. For this, various options like amateur, commercial, local can be made available for tourists. From there, tourists can choose the right option. Registration and handing over of permits should be done by the organization that travels the fort without pushing the tourists. Tourists should be able to facilitate ready-to-trek on a ready-to-eat basis, simply by providing their information. Otherwise, if you get stuck in Sopaskar, people will not bother to come here for tourism. Mountain tourism is a very different type of tourism, for which tourists need to give all the instructions at the beginning. Registration, licenses should be kept online nowadays.
रविवारी नासिकच्या घोटी जवळच्या कुलंग किल्ल्यावर गुजरातच्या ११ पर्यटकांची सहलवजा साहसी सफर अनपेक्षित अशा भयस्वप्नात बदलली गेली. या सहलीचा शेवट गोड झाला की कडू? मध्यरात्री मराठी बचावदलाने त्यांचा कशा पद्दतीने बचाव करून त्यांना सुरक्षित रित्या खाली उतरवून आणले? हा सगळाच किस्सा ऐकण्याजोगा ठरला आहे. या लेखाच्या माध्यमातून तो तुमच्या पर्येंत पोहचविण्याचा उद्देश इतकाच की, महाराष्ट्राच्या जगप्रसिद्ध अशा ऐतिहासीक तथा भौगोलिक पर्यटनाची दिशा कुणीकडे चालली आहे. आपण इतिहास आणि भौगोलिक पर्यटन राबविण्यासाठी सक्षम आहोत का? आपले तर सोडा, बाहेरचे लोक आपल्या इथल्या पर्यटनाच्या कोणत्या स्मृती घेऊन जात असतील…
२९ ऑगस्ट, दुपारच्या सुमारास बडोद्याहून ७ जण त्यांच्या मुंबईतल्या २ नातलगांसमवेत मुंबईवरून खासगी वाहनाने घोटी जवळच्या कुलंग किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाले. महाराष्ट्रात लोक किल्ले फिरायला जातात. त्यातले काही जण सहल म्हणून तर काही जण ट्रेक म्हणून तर काही गिर्यारोहण आदी साहस करण्यासाठी, हे ऐकून असललेल्या या मंडळीने कुलंग नावाचा सोप्या श्रेणीतला किल्ला असल्याचे ऐकले होते. त्यांना कोणाकडून तरी कळाले की, अर्ध्या दिवसातही लोक किल्ल्यावर जाऊन येतात. तिथून महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसूबाई व परिसरातील डोंगराचे मनाहारी दर्शन घडतले. किल्ल्याचा परिसर मंत्ररल्यागत शांत सुंदर आहे. पावसाळी साज चढल्याने त्याचे सौंदर्य काही औरच बहरले आहे.
दुपारच्या सुमारास ते आंबेवाडीत दाखल झाले. मुंबईतल्या नातलगांनी यापूर्वी काही ट्रेक केले होते. कुंलंग हा सोप्या श्रेणीतला किल्ला असल्याची त्यांनी माहिती मिळवली होती. गावातून कोणीही वाटाड्या सोबत नव्हता. कदाचित शेतीच्या कामामुळे त्यांना कोणी मिळाला नसेल किंवा त्यांनीच सोबत घेतला नसेल.
मनोहारी वातावरणात त्यांनी किल्ल्याची वाट पकडली. गुगल नकाशाची मदत घेतल्याचे ऐकिवात आहे. थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की किल्ल्याची चढाई बर्यापैकी मोठी आहे. पाऊसही सुरू होता. तशातच त्यांनी गडावर जाण्याचे ठरवले. आजूपासूच्या सह्यसौंदर्यात ही डोंगरयात्रा रममाण झाली असताना सूर्य अस्ताला चालल्याचे किंवा प्रकाश कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नसावे. कातळ कोरीव पायर्यांची वाट लागल्यावर त्यांना वेळेचे गणित आणि वाटेची कठिणता लक्षात आली असावी. तशातच त्यांनी पुढे जात राहण्याचा प्रयत्न केला, परंतू अंधार दाटल्यावर त्यांना कळूच चुकले की, आता या अवघड भागातून ना माघारी परतणे शक्य ना वर गडमाथ्यावर. धोक्याची जाणिव होताच त्याच्यातील सुज्ञ माणसाने नासिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा दूरध्वनी क्रमांक मिळवला. अर्जून कुर्हाडे यांनी नुकताच आपत्ती विभागाचा पदभार स्विकारला आहे. गेली अनेक वर्षे प्रशांत वाघमारे हे आपत्ती व्यवस्थापनाची कमान सांभाळून होते. श्री. कुर्हाडे यांनी पहाटे ३-०० वाजेच्या सुमारास थेट चांदोरी येथील बचाव दलाशी संपर्क साधून त्यांना तात्काळ कुलंग किल्ल्यावर बचाव मोहिम राबविण्याची विनंती केली. एरवी नासिक शहरातील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था या सगळ्यात जुन्या व अनूभवी गिर्यारोहण संस्थेच्या बचाव दलाशी किंवा भोसला अॅडव्हेंचर फाऊन्डेशनशी संपर्क साधला जायचा. चांदोरीचे बचाव दल हे प्रामुख्याने पाण्यातील बचावासाठी ओळखलेा जाते. जिल्ह्यात कुठेही पाण्यात बचाव करायचे असेल तर त्यांना पाचारण केले जाते. या दलाकडे काही डोंगरबचावाची उपकरणे असल्याने त्यांनी मध्यरात्रीच्या वेळी बचावदलाच्या सदस्यांना झोपेतून उठवून तयार केले. या दलाचे प्रमुख सागर गडाख यांनी पहाटे ४-३०च्या सुमारास कुलंगच्या पायथ्याला पोहोचल्याची माहिती दिली. तिथून त्यांनी बडोद्याचे पर्यटक थांबून असलेला पायर्यांचा परिसर गाठला. तोवर उजाडले होते. किरण रावा, बाळू आंबेकर, वैभव जमदाडे, शणद वाखंडे, विलास गांगुर्डे, सुरेश शेटे आदी कार्यकर्त्यांनी दोन गट तयार केले. एक गट मदनच्या वाटेला तर दुसरा कुलंगवर पाठविण्यात आला. पर्यटकांना नेमके ठिकाण सांगता येत नव्हते. किंवा बचाव दलाला त्याचे आकलन होत नव्हते. अखेर सकाळी ९-०० वाजेच्या सुमारास त्यांच्या एका पथकाला पर्यटक दिसले. तोवर ही मंडळी तिथेच थांबून होती. निसरड्या वाटांमुळे आणि खोल दरीमुळे त्यांनी एकाठिकाणी थांबून राहण्याचा सूज्ञपणा दाखविला.
बचावदलाने त्यांना तात्काळ सोबत त्यांनी पाणी व बिस्कीटे तसेच इतर खाण्याचे पदार्थ दिले. त्यामुळे पर्यटक मंडळींना तरतरी आली. दरध्वनीवरून अधून मधून संपर्क होत होता व त्यांना सतत धीर दिला जात होता. या मंडळींना भर पावसात अंधारात कठिण ठिकाणी रात्र काढावी लागली. त्यानंतर त्यांना खाली आणण्यास सुरूवात झाली. १वाजून ५० मिनीटांनी सर्वांना पायथ्याला आणण्यात आले. इगतपूरी तहसीलदार कार्यालयाचे परमेश्वर कोसोळे घटनास्थळी दाखल झाले. बचाव दलास तहसीलदार तेजस चव्हाण, निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
पायथ्याला आल्यानंतर आणखी एक संकट आपली वाट बघत आहे याची या पर्यटकांना कल्पना नव्हती. पायथ्याला वनविभागाच्या अधिकार्यांनी त्यांची चौकशी सुरू केली. आमची परवानगी का घेतली नाही, असे सांग
असे सांगत त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली व दंड ठोठावला. दंडाची रक्कम कळू शकली नाही, परंतू बचाव दल त्यांना पर्यटकांची आपबिती सांगून सहकार्याची भावना ठेवण्यास समजात होते, परंतू वनविभागाच्या अधिकार्यांनी कारवाईचा सोपस्कर पूर्ण करून घेतला. याठिकाणी वनविभागाची चौकी नव्हती व पावती कुठे फाडायची या संबंधी कोणतीही माहिती नसल्याचे पर्यटकांनी सांगून पाहिले पण त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. एक विभाग मध्यरात्री उठून बचावासाठी पुढे येत असताना एक विभाग सावज सापडावे अशा अविर्भावात कारवाई करताना दिसून आला. अशा पद्दतीने तुम्ही पर्यटन नाही राबवू शकत. वनविभागाला जर पर्यटन राबवायचे असेल तर तुमच्याकडे तशा स्वरूपाची यंत्रणा असणे आवश्यक आहे. चौक्या, पहारे, बचावदल अशा सुविधा असायला हव्या. नोंदणीची रक्कम कुठे भरायची, कुठून परवानगी घ्यायची, सोबत गावातून किंवा सरकारी कर्मचार्यातून वाटेडे देता येतील का? भोजनादी कुठून घ्यायचे याचे नियोजन तयार असायलाच हवे. डोंगर पर्यटन म्हणजे रस्ते बांधणे नव्हे, डोंगरांना लोखंडी नळकांड्यांचे तथाकथित संरक्षक कठडे लावणे नव्हे. जेव्हा वाटेल तेव्हा सुरू जेव्हा वाटेल तेव्हा बंदी असा धरसोडपणा केला तर पर्यटकात वेगळा संदेश पोहोचू शकतो. जगाच्या पाठीवर सर्वात कठिण ठिकाणी, सर्व ऋतूत पर्यटन सुरू ठेवले जाते. वनविभागाने यातील काही तरी नेमकेपणा ठेवायला हवा, अन्यथा महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या कोणत्या स्मृती लोक घेऊन जातील.
आपला हा प्रदेश डोंगर सौंदर्याने नटलेला आहे. याला दैदिप्यमान असा इतिहास आहे. प्रत्येक पावलावर जगाला हे वैभव याची महत्ती दाखविण्याजोगी आहे. कुचकामी नियोजनामुळे आपण ते योग्य पद्धतीने दाखविण्यात कमी पडता कामा नये.
रूढ अर्थाने कुलंग हा सोप्या श्रेणीतला किल्ला. परंतू महाराष्ट्री माणसाला तो जिततका सोपा वाटतो तितका तो प्रत्यक्षात सापा नसतो. यासाठी गडपर्यटन घडवून आणारे हौशी, व्यावसायिक, स्थानिक असे विविध पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध करून देता येऊ शकतील. त्यातून पर्यटकांना योग्य पर्याय निवडता येइल. नोंदणी, परवानग्यांचे सोपस्कर हे पर्यटकांवर न ढकलता गड सफर घडविणार्या संस्थेने करावेत. पर्यटकांनी केवळ त्यांची माहिती उपलब्ध करून, रेडी टू इटच्या धर्तीवर रेडी टू ट्रेकची सुविधा देता यायला हवी. अन्यथा सोपस्करात अडकलात तर लोक येथे पर्यटनाला येण्याची फारशी तसदी घेणार नाहीत. डोंगर पर्यटन हा र्स्वस्वी वेगळा प्रकार असतो, त्यासाठी पर्यटकांना सुरूवातीलाच सर्व सूचना देण्याची आवश्यकता असते. नोंदणी, परवाने हे आजच्या काळात तर ऑनलाईन पद्दतीनेच ठेवायला हवेत.
https://www.facebook.com/prashantpardeshi21/posts/10226050026860182