BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.15.18//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Mumbai Hikers
X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org
X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20230101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20240630T080000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20240630T110000
DTSTAMP:20260404T084354
CREATED:20240522T084251Z
LAST-MODIFIED:20240522T084251Z
UID:47797-1719734400-1719745200@mumbaihikers.org
SUMMARY:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "टकमक गड मोहीम" - 30 June 2024
DESCRIPTION:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “टकमक गड मोहीम”गाव – सकवार\, तालुका – वसई\, जिल्हा – पालघर.श्रेणी – मध्यम.दिनांक – ३० जून २०२४मोहीम प्रमुख – विवेक जाधवमोहीम कार्यवाह – सागर हर्षे \nपालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात\, सकवार गावाच्या मागे टकमक गड आहे. बिंबदेव राजाचा पुत्र\, राजा भीमदेवाने १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी केली. माहिम (महकावती) या राजधानी पासून घाटावर जाणार्‍या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी\, त्याचे संरक्षण करण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली होती. गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यातून हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी कोहोज-अशेरी या गडांबरोबर जिंकला असावा. नंतर गड पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला. चिमाजी आप्पांनी वसईची मोहीम काढल्यावर टकमक गडाला महत्व आले. मराठ्यांनी १७३२ मध्ये टकमक गड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. परंतु मराठे आणि पोर्तुगिज यांच्यात झालेल्या तहाप्रमाणे हा गड परत पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला. ८ एप्रिल १७३७ रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा गड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. १८ व्या शतकात इंग्रजांनी या गडाचा वापर कैदखाना म्हणून केला. त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक गडांप्रमाणे या गडावरील टाकी आणि जाण्याचे मार्ग यांची नासधूस करून गड पुन्हा वसणार नाही याची काळजी घेतली. \nकार्यक्रमाचा तपशील :-रविवार ३० जून २०२४ रोजी चर्चगेट स्थानकातून सकाळी ५:३६ ला सुटणारी विरार जलद लोकल आपापल्या जवळच्या स्थानकातून पकडून ७:०० वाजेपर्यंत विरार स्थानकात एकत्र जमणे. तिथून बसने सकवार गावात पोहोचणे. नाश्ता व उपस्थितांची ओळख करून साधारण ८:०० वाजता ट्रेकला सुरुवात. गडदर्शन करून थोड्या विश्रांतीनंतर परत ट्रेक करत पायथ्याशी आगमन आणि दुपारचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना. \nट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये ५५०/- (रुपये पाचशे पन्नास फक्त) प्रती व्यक्ती (विरार ते विरार प्रवास\, चहा-नाश्ता व दुपारचे जेवण अंतर्भूत).मोहिमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये ४५०/- (रुपये चारशे पन्नास फक्त) असेल.नाव नोंदणीची अंतिम तारीख २३ जून २०२४ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास २३ जून २०२४ नंतर ट्रेक फी : रुपये ६५०/- (रुपये सहाशे पन्नास फक्त) असेल. \nट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.२) चांगल्या प्रतीचे बूट\, मोजे\, एक्स्ट्रा चप्पल\, नीकॅप\, रेनकोट\, जरुरी पुरते कपडे.३) पाण्याची २ लिटर बाटली.४) स्वतः पुरता सुका खाऊ जवळ बाळगणे कारण दुपारचे जेवण गडावरून खाली आल्यावर होणार आहे.५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत\, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.६) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील. \nनियम :-१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव\, व्यवसाय\, मोबाईल\, रक्तगट\, पूर्ण पत्ता\, घरातील एकाचा मोबाईल आणि जन्मदिनांक (विवेक जाधव) ९८९००३११८७ किंवा (सागर हर्षे) ९७०२८२५९८९ या क्रमांकावर WhatsApp करावे.२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गडकोटांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.६) नाव रद्द करायचे झाल्यास २३ जून २०२४ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २३ जून २०२४ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.७) निसर्गात फिरताना कचरा\, प्लास्टिक वाटेत टाकू नये. \nवरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी. \nआपले नम्र :-मोहीम प्रमुख – विवेक जाधव / ९८९०० ३११८७==============================मोहीम कार्यवाह – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९ \nनाव नोंदणी झाल्यावर “टकमक गड मोहीम” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती\, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल. \nशिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२० \nBank Details :-Bank Name – Bank of MaharashtraBranch – PrabhadeviAccount No – 60134804616IFSC Code – MAHB0000318Branch Code – 000318Account Name – SHIVASHOURYA TREKKERS \nट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल. \nशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंकfacebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/… \nशिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईटshivashouryatrekkers.org \nशिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्रामshivashourya_trekkers \nfacebook.com/events/1093542325062219/
URL:https://mumbaihikers.org/event/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4/
LOCATION:सकवार\, वसई\, सकवार\, वसई
ORGANIZER;CN="Shivashourya Trekkers %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8 - 24 November 2022":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
END:VCALENDAR