BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.15.19//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Mumbai Hikers
X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org
X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20230101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20240811T060000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20240811T090000
DTSTAMP:20260408T232649
CREATED:20240725T033718Z
LAST-MODIFIED:20240725T033718Z
UID:49414-1723356000-1723366800@mumbaihikers.org
SUMMARY:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "तुंग गड उर्फ कठीणगड मोहीम" - 11 August 2024
DESCRIPTION:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “तुंग गड उर्फ कठीणगड मोहीम”गाव – तुंगवाडी\, तालुका – मावळ\, जिल्हा – पुणेश्रेणी – सोपीदिनांक – ११ ऑगस्ट २०२४मोहीम प्रमुख – नारायण धनावडेमोहीम कार्यवाह – अजित नर \nगडाच्या नावावरून जरी वाटत असेल की\, गड चढायला खरोखरच कठीण असेल मात्र गड चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातील तुंग गड हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असे. या गडावरून लोहगड\, विसापूर\, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. या गडाला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर गडांसमवेत हा गड देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण\, हे गड मात्र जिंकू शकले नाहीत. जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. \nकार्यक्रमाचा तपशील :-रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी परळ एसटी डेपो येथून सकाळी ६:०० वाजता बसने तुंगवाडीकडे मार्गस्थ. स्वतः आणलेला नाश्ता करणे. चहा घेऊन पुढे उपस्थितांची ओळख करून साधारण १०:०० वाजता ट्रेकला सुरुवात. गडदर्शन करून थोड्या विश्रांतीनंतर परत ट्रेक करत पायथ्याशी आगमन आणि दुपारचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना. \nट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये ८००/- (रुपये आठशे फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास\, चहा व दुपारचे जेवण अंतर्भूत).११ ऑगस्ट २०२४ चा सकाळचा नाश्ता आपण स्वतः आणायचा आहे.मोहिमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये ७००/- (रुपये सातशे फक्त) असेल.ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकासाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.नाव नोंदणीची अंतिम तारीख ४ ऑगस्ट २०२४ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास ४ ऑगस्ट २०२४ नंतर ट्रेक फी : रुपये ९००/- (रुपये नऊशे फक्त) असेल. \nट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.२) चांगल्या प्रतीचे बूट\, मोजे\, एक्स्ट्रा चप्पल\, नीकॅप\, रेनकोट\, जरुरी पुरते कपडे.३) पाण्याची २ लिटर बाटली.४) स्वतः पुरता सुका खाऊ जवळ बाळगणे कारण दुपारचे जेवण गडावरून खाली आल्यावर होणार आहे.५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत\, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.६) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील. \nनियम :-१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव\, व्यवसाय\, मोबाईल\, रक्तगट\, पूर्ण पत्ता\, घरातील एकाचा मोबाईल आणि जन्मदिनांक (नारायण धनावडे) ९३२१५४०९८० किंवा (अजित नर) ९८१९५६६१२० या क्रमांकावर WhatsApp करावे.२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गडकोटांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.६) नाव रद्द करायचे झाल्यास ४ ऑगस्ट २०२४ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. ४ ऑगस्ट २०२४ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.७) निसर्गात फिरताना कचरा\, प्लास्टिक वाटेत टाकू नये.८) संस्थेच्या आजीव सदस्यांना आपले ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे अन्यथा ट्रेक फी मधील सवलत दिली जाणार नाही. \nवरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी. \nआपले नम्र :-मोहीम प्रमुख – नारायण धनावडे / ९३२१५४०९८०==============================मोहीम कार्यवाह – अजित नर / ९८१९५६६१२० \nनाव नोंदणी झाल्यावर “तुंग गड मोहीम” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती\, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल. \nशिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९ \nBank Details :-Bank Name – Bank of MaharashtraBranch – PrabhadeviAccount No – 60134804616IFSC Code – MAHB0000318Branch Code – 000318Account Name – SHIVASHOURYA TREKKERS \nट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. \nशुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल. \nशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंकfacebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/… \nशिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईटshivashouryatrekkers.org \nशिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्रामshivashourya_trekkers See less \nfacebook.com/events/834865991598104/
URL:https://mumbaihikers.org/event/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf-2/
LOCATION:तुंगवाडी\, तुंगवाडी
ORGANIZER;CN="Shivashourya Trekkers %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8 - 24 November 2022":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
END:VCALENDAR