Loading Events

« All Events

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम”

February 9 @ 9:00 am12:00 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम”
गाव – पेठेचीवाडी, तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणे
श्रेणी – सोपी
दिनांक – ९ फेब्रुवारी २०२५
मोहीम प्रमुख – हार्दिक म्हात्रे
मोहीम कार्यवाह – सागर हर्षे

सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. ‘हडसर’ हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड, सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या. तरीही सद्यस्थितीत असलेली गडाची प्रवेशद्वारे आणि कातळकोरीव पायरी मार्ग स्थापत्यदृष्ट्या विशेष आकर्षित करतात.

कार्यक्रमाचा तपशील :-
शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रौ ११ वाजता खाजगी बसने प्रभादेवीहून प्रस्थान. रविवार ९ फेब्रुवारी २०२५, सकाळी पायथ्याच्या पेठेचीवाडी गावात आगमन. फ्रेश होऊन, चहा-नाश्ता करून पुढे उपस्थितांची ओळख आणि साधारण ८:०० वाजता ट्रेकला सुरुवात. गडदर्शन करून थोड्या विश्रांतीनंतर परत ट्रेक करत पायथ्याशी आगमन आणि दुपारचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना.

ट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये १,०५०/- (रुपये एक हजार पन्नास फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, चहा-नाश्ता व दुपारचे जेवण अंतर्भूत).
मोहिमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकासाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये ९५०/- (रुपये नऊशे पन्नास फक्त) असेल.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २ फेब्रुवारी २०२५ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास २ फेब्रुवारी २०२५ नंतर ट्रेक फी : रुपये १,१५०/- (रुपये एक हजार एकशे पन्नास फक्त) असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, जरुरी पुरते कपडे.
३) पाण्याची २ लिटर बाटली.
४) स्वतः पुरता सुका खाऊ जवळ बाळगणे कारण दुपारचे जेवण गडावरून खाली आल्यावर होणार आहे.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल आणि जन्मदिनांक (हार्दिक म्हात्रे) ९०४९०१३६७७ किंवा (सागर हर्षे) ९७०२८२५९८९ या क्रमांकावर WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गडकोटांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास २ फेब्रुवारी २०२५ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २ फेब्रुवारी २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.

वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – हार्दिक म्हात्रे / ९०४९० १३६७७
================================
मोहीम कार्यवाह – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९

नाव नोंदणी झाल्यावर “किल्ले हडसर मोहीम” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्निल चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

Details

Date:
February 9
Time:
9:00 am – 12:00 pm
Event Category:
Website:
https://www.facebook.com/events/1303492877457781/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

पेठेचीवाडी
पेठेचीवाडी + Google Map