Loading Events

« All Events

  • This event has passed.

महा-युनिस्केप २०२६

May 30 @ 9:30 am - June 1 @ 1:30 am

नमस्कार,🤝

आपल्या *महा-युनिस्केप २०२६* उपक्रमांतर्गत आयोजित *१६-१७ मे २०२६ ची ‘सिंधुदुर्ग-विजयदुर्ग’ सहल* ही काही अपरिहार्य कारणांमुळे पुनर्रचित करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही सहल सिंधुदुर्ग-विजयदुर्ग ऐवजी *फक्त “विजयदुर्ग”* येथे जाईल.

नियोजनातील या बदलानुसार सुधारित वेळापत्रक आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
________________________________________
🚩 *महा-युनिस्केप २०२६ 🚩 भारताच्या मराठा लष्करी भूप्रदेशांतर्गत ‘युनेस्को’ जागतिक वारसा स्थळ नामांकित १२ गड-किल्ले!*

*१२ महिने – १२ गड या विशेष मोहिमेतील… *

🌊 पाचवे पुष्प: अजिंक्य विजयदुर्ग! 🌊
________________________________________
📅 महत्त्वाची माहिती

• दिनांक: ३० आणि ३१ मे २०२६ (शनिवार – रविवार)
• सहल शुल्क: ₹ ३,५९९/- (फक्त)

• ✅ समाविष्ट गोष्टी:
o पुणे ते पुणे प्रवास (आरामदायी AC बसने)
o उत्तम निवास व्यवस्था (Shared Homestay Rooms)
o प्रथमोपचार सुविधा (First Aid)

• ❌ समाविष्ट नाही:
o दोन्ही दिवसांचा सकाळचा चहा-नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण.
o स्थानिक मार्गदर्शक उपलब्ध झाल्यास त्यांचे शुल्क.
o इतर वैयक्तिक खर्च.

________________________________________
🤔 *या वारसा सहलीस का यावे?*
विजयदुर्ग किल्ल्याच्या केवळ स्थळदर्शनापलीकडे जाऊन, त्याचा इतिहास, भूगोल आणि महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा अभ्यासपूर्ण दौरा नक्की अनुभवा:
• वारसा संवर्धन की सौंदर्यीकरण? या दोघांमधील नेमका फरक आणि त्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी.
• युनेस्कोचे नामांकन: युनेस्कोने विजयदुर्ग आणि इतर ११ दुर्गांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन का दिले, यामागचे जागतिक महत्त्व समजून घेणे.
• आपली जबाबदारी: हा आंतरराष्ट्रीय दर्जा कायम राहण्यासाठी एक सामान्य इतिहासप्रेमी म्हणून आपण काय करणे गरजेचे आहे?
• आधुनिक दृष्टिकोन: आजच्या आधुनिक काळाच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांकडे पाहण्याचा एक नवा, प्रगल्भ दृष्टिकोन मिळवण्यासाठी.

________________________________________
📍 संक्षिप्त वेळापत्रक

दिवस १: शनिवार, ३० मे २०२६

• सकाळी ०६:०० ते ०६:४०: पुणे येथून प्रस्थान. (मार्ग: विश्रांतवाडी ➡️ डेक्कन ➡️ चांदणी चौक ➡️ सिंहगड रोड)

• दुपारी ०४:००: विजयदुर्ग येथे आगमन अपेक्षित. (प्रवास वेळेत पूर्ण झाल्यास वाटेत ऐतिहासिक ‘रिद्धी सिद्धी मंदिर’ आणि सुंदर ‘गिर्ये बीच’चे दर्शन — संध्याकाळी ४ ते ७ दरम्यान)

• रात्री ०७:३० नंतर: होमस्टे येथे आगमन आणि त्यानंतर खास ‘अनुभव कट्टा / सांस्कृतिक कार्यक्रम’ (सर्व सदस्यांचा सहभाग अनिवार्य).

• रात्री ११:३०: दिवे बंद (Lights Out).

दिवस २: रविवार, ३१ मे २०२६

• सकाळी ०६:०० ते ०७:३०: वेक अप कॉल, फ्रेश होणे आणि चहा-नाश्ता

• सकाळी ०८:०० ते ११:३०: ऐतिहासिक ‘विजयदुर्ग किल्ला’ सफर आणि सविस्तर अभ्यासपूर्ण दर्शन

• दुपारी ११:३० ते ०१:००: अतिरिक्त वेळ उपलब्ध असल्यास ऐतिहासिक ‘सरदार धुळप वाडा’ भेट किंवा स्वखर्चाने रोमांचक ‘वाघोटन खाडी बोट सफारी’.
• दुपारी ०१:००: विजयदुर्ग परिसरात दुपारचे जेवण.

• दुपारी ०१:३०: पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू. (रात्री १०:०० ते १०:३० दरम्यान पुण्यात आगमन अपेक्षित).

________________________________________
📞 अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क:
📱 ९१७५९ ०९८६४

पर्यटन खर्च की समृद्ध जीवन अनुभवण्यासाठी केलेली गुंतवणूक?
निर्णय तुमचा… चला, महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास डोळ्यांत साठवण्यासाठी आजच आपली जागा निश्चित करा!

धन्यवाद,
प्रविण रमेश सानप
वसुंधरा वारसा पर्यटन
(शाश्वत आणि जबाबदार पर्यटन)

Details

Organizer

  • वसुंधरा वारसा पर्यटन – Vasundhara Heritage Tourism – 24 July 2025

Venue

  • Online event