Loading Events

« All Events

  • This event has passed.

किल्ले रांगणा

April 25 @ 10:30 am - April 26 @ 11:30 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित किल्ले रांगणा मोहीम
जिल्हा : सिंधुदुर्ग
श्रेणी : सोपी
दिनांक : शनिवार दि. 25 एप्रिल व रविवार दि. 26 एप्रिल २०२६
तळ कोकणातील किल्ले तसे भुईसपाट आहेत, पण रांगणा किल्ल्याची चढण सुमारे २ तासांची आहे. घाट आणि कोकण यांच्या सीमेवर असलेला हा किल्ला घाट वाटेचं उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यावर असताना आपलं geographical location कोल्हापूर जिल्ह्यात असतं आणि किल्ला उतरून खाली आलो की आपण तळकोकणात असतो. किल्ला खूप मोठा असून जुने अवशेष पाहण्यासारखे आहेत.

शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026:
रात्री 8 वाजता भारत माता सिनेमा, लालबाग येथून बस निघेल. अटल सेतू मार्गे प्रवास.

पहिला दिवस
शनिवार दि. 25 एप्रिल 2026
सकाळी 5 वा. कडावल गावात पोहोचून प्रात: विधी आटपून चहा नाश्ता होईल. त्यानंतर पॅक लंच घेऊन नारूर गावातून रांगणा किल्ल्यासाठी ट्रेक सुरू. संध्याकाळपर्यंत ट्रेक पूर्ण करून कडावल गावात येऊन रात्री जेवण आणि मुक्काम.

दुसरा दिवस
रविवार दि. 26 एप्रिल 2026
सकाळी आन्हीकं उरकून चहा नाश्ता करून. आदिवासी वस्तू कला स्थळाला भेट देऊन त्यानंतर मुंबईकडे रवाना. वाटेत दुपारचे जेवण.

ट्रेक फी : रु. 2800/- प्रति व्यक्ती
ट्रेक फी मध्ये मुंबई ते कुडाळ मधील बस प्रवास, शनिवार-रविवार सकाळचा चहा-नाश्ता, शनिवार-रविवार दुपारचे जेवण, फक्त शनिवार संध्याकाळचा चहा-बिस्किटे, फक्त शनिवार रात्रीचे जेवण आणि शनिवार रात्रीचा मुक्काम अंतर्भूत आहे.
आजीव सदस्यांसाठी ट्रेक फी : रु. 2700/- प्रति व्यक्ती
(“आजीव सदस्य ओळखपत्र” मोहिमेत बाळगणे बंधनकारक. ओळखपत्र असल्यासच सवलत मिळेल)
मोहिमेत सदस्य संख्या ३४ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदवावीत.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर नाश्ता व पाण्याची बाटली नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) मधमाशांचा वावर असल्याने परफ्यूम/बॉडी स्प्रे वापरू नये.
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, रेनकोट व आवश्यक कपडे.
४) पाण्याची १ लिटर बाटली.
५) स्वतःपुरता सुका खाऊ.
६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत. Zole-F Ointment व Electral पाकीट आवश्यक.
७) सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून मोठ्या पिशवीत ठेवावे, जेणेकरून सॅकमधील कपडे सुरक्षित राहतील.
8) ताट, वाटी, पेला, पॅक लंच साठी टिफिन बॉक्स

नियम :-
१) मोहिमेत कोणत्याही प्रकारच्या व्यसनास परवानगी नाही.
२) आवश्यक साहित्य आणणे बंधनकारक आहे.
३) मोहीम प्रमुखांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
४) आपत्कालीन परिस्थितीत किंवा दुखापतीसाठी संस्था जबाबदार राहणार नाही.
५) कचरा/प्लास्टिक टाकू नये.
६) ट्रेक दरम्यान ग्रुपसोबत राहावे. एकटे कुठेही जाऊ नये.
७) सदस्य संख्या 34 मर्यादित असल्याने लवकर नोंदणी करावी.
८) ट्रेक हा साहसी अनुभव आहे; यात Luxury सुविधा मिळणार नाहीत. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतलेत तरच ट्रेकचा आनंद घेऊ शकाल, अन्यथा निराशाच हाती येईल.

नाव नोंदणी प्रक्रिया :
१) नोंदणीपूर्वी मोहीम प्रमुखांशी संपर्क साधून जागा उपलब्धता तपासावी.
📞 98195 66120
२) फी भरल्यानंतर पावती WhatsApp करावी.
३) अंतिम तारीख : शनिवार दि. 20 एप्रिल 2026 (किंवा 34 सदस्य पूर्ण झाल्यास नोंदणी बंद)
४) मोहीम प्रमुख गूगल फॉर्म पाठवतील तो पूर्ण इंग्रजीत भरून पाठवावा.
५) सहभागी सदस्यांना WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकसंबंधित माहिती, updates आणि शंकांचे निरसन केले जाईल.
६) अंतिम दिनांक उलटल्यानंतर जागा शिल्लक असल्यास ट्रेक फी रु. १००/- ने वाढवली जाईल.

नाव नोंदणी रद्द प्रक्रिया :
१) 20 एप्रिल 2026 पूर्वी रद्द केल्यास पूर्ण फी परत मिळेल.
२) 20 एप्रिल 2026 नंतर फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
३) स्वतःऐवजी दुसऱ्या व्यक्तीस पाठवू शकता (ती व्यक्ती ट्रेकसाठी सक्षम असावी).

मोहीम प्रमुख नितिन पन्हाळकर
मोहीम कार्यवाह : अजित नर 9819566120

बँक तपशील :-
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
Account No – 60134804616
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318

शिवशौर्य ट्रेकर्स
संस्था संपर्क क्रमांक 9320755539
इतर संपर्क क्रमांक
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
मुंबई – अजित नर / ९८१९५६६१२०
पालघर / वसई / विरार – हार्दिक म्हात्रे / ९०४९० १३६७७
नवी मुंबई – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९

फोटो अल्बम :

वेबसाईट :

इंस्टाग्राम : shivashourya_trekkers
WhatsApp ग्रुप :

Details

Organizer

  • Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स – 24 November 2022
  • Email noreply@facebookmail_com

Venue

  • Mumbai, India 400025, Maharashtra
  • Mumbai, India 400025, Maharashtra + Google Map