शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चौल्हेर – भिलाई आणि गव्हाळी गुहा मोहीम” गडसेवक रोहित जाधव यांच्यासोबत
गाव – वाडी चौल्हेर / तिळवण, तालुका – सटाणा, जिल्हा – नाशिक
श्रेणी – सोपी
दिनांक – २८ आणि २९ डिसेंबर २०२४
मोहीम प्रमुख – उन्मेष खैरे / ९५५२८५३०५९
मोहीम कार्यवाह – योगेश शिरसाट / ९९७०६२६२६९
भटकंती एका गुहेची, गडसेवक रोहित जाधव यांचे सोबत..!
गव्हाळी गुहा (गौहाळी) बरोबरच मेजवानी किल्ले चौल्हेर आणि किल्ले भिलाई…
किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे. चौल्हेर किल्ल्याच्या प्रवेशव्दारांची रचना पाहाण्यासारखी आहे.
चौल्हेर गडाच्या शेजारील हे डोंगर, तेथील एका डोंगराचे नाव नडग धाम असे होते…नडग म्हणजे अस्वल. अस्वल हा एकमेव प्राणी आहे की ज्याला ताजे अन्न लागते तो त्याच्या गुहेत ८ महीने पुरेल इतके अन्न साठवून ठेवतो. याचाच अर्थ असा कि या भागात अशा साठवणुकीच्या गुहा नक्कीच असतील. ज्यांचा उपयोग किल्ल्यासाठी अटीतटीच्या प्रसंगात धान्य साठवणुकीसाठी होत असणार..नडग धाम शेजारील डोंगराला झावराळ्या असे नाव होते. झावराळे म्हणजे केसाळ…म्हणजे पुन्हा अस्वलाशी संबधित. झावराळ्या शेजारील डोंगराला जांबवंत्या नाव होते. पुन्हा अस्वलाशी संबधित…त्या शेजारील डोंगराला देर भावजय असे नाव…त्या पौराणिक लोककथेत सुद्धा अस्वलाचे महत्व येते आणि महत्वाचे म्हणजे या जंगलाचे नाव गव्हाळी…गव्हाळीचा अर्थ…मुबलक पाण्याची जागा..पण एका स्थानिक वृद्ध स्त्री ने सांगितले कि ते गव्हाळी नाही गौहाळी आहे आणि त्याचा अर्थ भरपुर गुहा असा आहे. नडग धाम गुहा.. एकदम मोठी.. आणि अद्भुत गुहा. ती डायरेक्ट जायबारी येथे निघते. म्हणजे रस्त्याच्या मार्गाने गेलो तर १२ कि.मी अंतर आहे. आणि गुहेतुन ते अंतर फक्त १०३ मीटर आहे…केव्हढे आपले पुर्वज हुशार होते की त्यांनी हा चोर रस्ता बनवून ठेवला.
तर चला मग “मोहीम किल्ले चौल्हेर – भिलाई आणि गव्हाळी गुहा” गडसेवक रोहित जाधव यांच्यासोबत…
कार्यक्रमाचा तपशील :-
शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री खाजगी बसने प्रभादेवी मुंबईहून वाडी चौल्हेर गावाकडे प्रस्थान. शनिवारी सकाळी अंदाजे ५ वाजेपर्यंत गावात आगमन. फ्रेश होऊन सकाळी ६ वाजता गड चढाईला सुरुवात. गडसेवक रोहित जाधव यांच्यासोबत गडाची आणि परिसराची माहिती घेत २-२.३० तासात गड माथ्यावर पोहोचून घरून आणलेला नाश्ता करणे. गड फिरून अंदाजे ११.३० पर्यंत खाली उतरणे. तेथून बसने तिळवण गावात पोहोचून दुपारच्या जेवणाकरता पॅक लंच घेऊन गव्हाळी गुहेकडे प्रस्थान. २ वाजेपर्यंत गुहेच्या तोंडावर पोहोचून जेवण. सर्व गुहा फिरून झाल्यावर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तिळवण गावात मुक्काम.
रविवारी सकाळी नाश्ता करून दुपारच्या जेवणाकरता पॅक लंच घेऊन किल्ले भिलाई कडे प्रस्थान. गड फिरून दुपारचे जेवण. अंदाजे ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना.
ट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये १,३००/- (रुपये एक हजार तीनशे फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, चहा, जेवण, राहणे अंतर्भूत).
२८ डिसेंबर २०२४ चा सकाळचा नाश्ता आपण स्वतः आणायचा आहे.
मोहिमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये १,२००/- (रुपये एक हजार दोनशे फक्त) असेल.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास २० डिसेंबर २०२४ नंतर ट्रेक फी : रुपये १,४००/- (रुपये एक हजार चारशे फक्त) असेल.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, रेनकोट, जरुरी पुरते कपडे.
३) पाण्याची २ लिटर बाटली. पॅक लंचसाठी डब्बे.
४) स्वतः पुरता सुका खाऊ जवळ बाळगणे कारण दुपारचे जेवण गडावरून खाली आल्यावर होणार आहे.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.
नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल आणि जन्मदिनांक उन्मेष खैरे / ९५५२८५३०५९ किंवा योगेश शिरसाट / ९९७०६२६२६९ या क्रमांकावर WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गडकोटांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास २०/१२/२०२४ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २०/१२/२०२४ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) संस्थेच्या आजीव सदस्यांना आपले ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे अन्यथा ट्रेक फी मधील सवलत दिली जाणार नाही.
वरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – उन्मेष खैरे / ९५५२८५३०५९ आणि ८४५९३४१२६४
==============================
मोहीम कार्यवाह – योगेश शिरसाट / ९९७०६२६२६९
नाव नोंदणी झाल्यावर “चौल्हेर – भिलाई आणि गव्हाळी मोहीम” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर/ ९८१९५ ६६१२०
Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. त्यानंतरच नावनोंदणी होईल व बसमधील सीट आरक्षित केली जाईल. त्यानुसारच बसमधील सीट नंबर दिले जातील.
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/…
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers