Loading Events

« All Events

  • This event has passed.

किल्ले अशेरी

June 14 @ 10:30 am - 1:30 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
मोहीम क्रमांक १७१
“किल्ले अशेरी”
तालुका व जिल्हा – पालघर
श्रेणी – मध्यम
दिनांक – १४ जून २०२६
मोहीम प्रमुख – सिद्धार्थ बाविस्कर
मोहीम कार्यवाह – हार्दिक म्हात्रे

पालघर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व बुलंद गिरीदुर्ग म्हणून अशेरी गड ओळखला जातो. आकाराने विस्तृत असल्याने पालघर मधील महत्त्वाच्या ठाण्यांमध्ये या गडाची गणना होते. अशेरी गडावर नानाविविध राजवटी नांदल्या, त्यांचे अवशेष व खाणाखुणा आजही गडावर पहावयास मिळतात.

कार्यक्रमाचा तपशील :-
रविवारी १४ जून २०२६ रोजी पहाटे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातून सुटणारी पहाटे ०५:०३ वाजताची डहाणू फास्ट लोकल ट्रेन प्रत्येकाने आपापल्या सोयीच्या रेल्वे स्थानकातून पकडावी. त्यासाठी बोईसर स्थानकापर्यंतचे आपापले रिटर्न तिकीट स्वतः काढावे.
*सकाळी साधारण ७ वाजता बोईसर रेल्वे स्थानकात जमणे.
*Shared प्रवासी वाहनाने साधारण पाऊण तासाच्या प्रवासानंतर अशेरी गडाच्या पायथ्याच्या खडकोना गावात आगमन.
*चहा नाश्ता आटोपून लवकरात लवकर किल्ल्याकडे मार्गस्थ.
*पावसाची सुतराम शक्यता नसल्याने व उन्हाची तीव्रता फार जास्त असल्याने साधारण अडीच ते तीन तास चढाईला लागू शकतात.
*गडावर पोहोचून स्थलदर्शन
*गड उतराई करून पायथ्याच्या गावात जेवण
*बोईसर रेल्वे स्थानकात पोहोचून मोहिमेची सांगता.

अत्यावश्यक माहिती :
सदर मोहीमेदरम्यान पावसाची सुतराम शक्यता नसल्याने व उन्हाची तीव्रता फार जास्त असल्याने साधारण अडीच ते तीन तास चढाईला लागू शकतात. त्यामुळे गड चढाई-उतराईसाठी प्रत्येकाने किमान ३ लिटर पाणी सोबत बाळगणे अत्यावश्यक आहे. ORS/Electral, टोपी व sunglasses
असल्यास उत्तम.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक.
२) नाश्ता, चहा व जेवणासाठी स्वतःचे ताट, वाटी, पेला.
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, नीकॅप, टोपी, sunglasses, जरुरी पुरते कपडे.
४) पिण्याचे किमान ३ लिटर पाणी, स्वतः पुरता सुका खाऊ.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत.

* ट्रेक फी :
रुपये 500/- (रुपये पाचशे फक्त) प्रति व्यक्ती. (बोईसर रेल्वे स्टेशन ते बोईसर रेल्वे स्टेशन प्रवास, सकाळचा चहा-नाश्ता व दुपारचे जेवण अंतर्भूत)

नाव नोंदणी प्रक्रिया :
नाव नोंदणीसाठी मोहीम प्रमुख अथवा कार्यवाहसोबत बोलून मोहिमेची रूपरेषा जाणून घेऊन स्वतः नोंदणी करावी. *आपले मित्रमंडळ अथवा ओळखीच्या इतर कोणाही व्यक्तीमार्फत स्वतःचे नाव नोंदवू नये.
*नोंदणीची अंतिम तारीख बुधवार ७ जून २०२६ असेल.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. सिद्धार्थ बाविस्कर
9309237241 किंवा हार्दिक म्हात्रे 9049013677 यांना WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘अत्यावश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास १० जून २०२६ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. १० जून २०२६ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) संस्थेच्या आजीव सदस्यांना आपले ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे अन्यथा ट्रेक फी मधील सवलत दिली जाणार नाही

नाव नोंदणी झाल्यावर ‘किल्ले अशेरी’ या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या ४ दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – सिद्धार्थ बाविस्कर
/
9309237241
======================
मोहीम कार्यवाह – हार्दिक म्हात्रे
/ 90490 13677

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई- /९३२०७ ५५५३९
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
वसई/पालघर – हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शुल्क प्राप्त झाल्याचे लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

Details

Organizer

  • Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स – 24 November 2022
  • Email noreply@facebookmail_com

Venue