- This event has passed.
Vasota fort – 24 January 2026
.
??????????
*रोमांच अन उत्कंठतेचा कहर.. वासोटा एक अदभूत सफर…*
*वासोटा*…सह्याद्रीच्या निबीड अरण्यातला अन जावळीच्या दुर्गम जंगलातला *एक अप्रतिम वनदुर्ग*… सातारा जिल्ह्यातील कोयना – बँकवाटरच्या परिसरात असलेल्या कोयना अभयारण्याच्या सुरक्षा घेऱ्यात वसलेला हा *चित्त – थरारक किल्ला..*
चहूबाजूला काळजाचा थरकाप उडवीणारे उंचच-उंच डोंगरकडे, सभोवताली सह्याद्रीच्या घनदाट वर्षावनातील घनघोर अरण्य, त्या घनघोर अरण्यात असलेला अनेक जंगली प्राण्यांच्या वावर, सह्याद्रीचा राखणदार तसेच जंगलाचा राजा “वाघ” हयाच्या वास्तव्याच्या खाणाखुणा आणि कोयनेच्या खोऱ्यात अथांग पसरलेला विस्तीर्ण शिवसागर जलाशय..ह्यामुळे ह्या किल्ल्याला एक नैसर्गिक, अभेद्य सुरक्षा कवच लाभले आहे.. जे ह्या किल्ल्याला अतिशय दुर्गम, दुर्लभ, अजेय आणि उत्कंठावर्धक बनविते.
असा हा इतिहास, भूगोल आणि निसर्गसंपन्न वासोटा किल्ला ज्याला भूतकाळातील कथित वाघाच्या वास्तव्यामुळे व्याघ्रगड असेही म्हटले जाते. हा किल्ला सातारा जिल्ह्यातील कोयना जंगल परिसरात वसलेला आहे. घनदाट जंगल, खोल दऱ्या आणि नैसर्गिक संरक्षणामुळे हा किल्ला इतिहासकाळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे.
अशा ह्या वासोटा किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात शिलाहार राजवटीच्या काळात झाल्याचे मानले जाते. नंतर हा किल्ला बहामनी आणि आदिलशाही यांच्या ताब्यात गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. 1655 साली वासोटा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. कोयना परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि घाटमार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत उपयुक्त होता. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याचे बळकटीकरण करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात व पुढे मराठा साम्राज्याच्या कारकिर्दीत हा किल्ला स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी वापरला जात होता. मात्र, घनदाट जंगलामुळे आणि दुर्गमतेमुळे किल्ल्याचा वापर लष्करीदृष्ट्या कालांतराने कमी झाला.
आज वासोटा किल्ला इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्स यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. व्याघ्रदरी कडा आणि कोयना धरणाचे विहंगम दृश्य यामुळे हा किल्ला सह्याद्रीचे रौद्र रूप, अफाट निसर्गसौंदर्य आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास यांचा सुंदर संगम दाखवतो.
? असा गौरवशाली इतिहास मिरवणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी, घनदाट अन निबीड अरण्यातल्या जंगलसफारीचा रोमांच अनुभवन्यासाठी आणि किल्ल्यावर जाता-येताना..अथांग पसरलेल्या.. शिवसागर जलाशयातील..तब्बल दीड
तासांच्या दीर्घ नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी…टीम उनाड ट्रेकर्स २४-२५ जानेवारी २०२६ रोजी..आपल्यासाठी घेऊन येत आहेत.. एक खास इवेंट ट्रेक… *”वासोटा- जंगल सफर.. With Unad Trekkers”*??
मग विचार कसला करता..
*चला तर मित्रांनो.. आमच्या सोबत उनाडक्या करायला !!!!!* ??
आपला ट्रेक आजच बुक करा : 7666114140 / 7039754745 / 9321210957 / 9892459211