- This event has passed.
Torana Trek
*पुणे माऊंटेनियर्स तोरण गड किंवा प्रचंडगड ट्रेक*
आपण पुणे माऊंटेनियर्स तर्फे रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी तोरणा किल्ल्यावर हायकिंग करण्याचे योजिले आहे.
तोरण फळांच्या उदंड असलेल्या जंगलामुळे या गडाचे नांव तोरण गड असे पडले.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोहीम सुरू करताना सर्वात प्रथम काबीज केलेला किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो. जणू स्वराज्याचे तोरणच या किल्ल्यावरून बांधले गेले होते.
महाराजांनी या अक्राळविक्राळ किल्ल्याला प्रचंडगड असे नांव दिले होते.
या किल्ल्याची डागडुजी करताना महाराजांना येथे गुप्त धनाचा खजिना सापडला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आई मेंगजाई ने आपल्या स्वराज्याला पहिलाच उदंड आणि भरभरून आशिर्वाद दिलेला आहे.
राजगड तोरणा करताना आपण अनेकदा बुधला माचीवरून केशरी सूर्यास्ताचे विहंगम दर्शन घेतलेले आहे तर सिंगापूरच्या नाळेतून किंवा गोप्या घाटातून केळदच्या मढे घाटातून उतरताना आपण तोरण्याच्या मागून त्याच्या देखण्या रूपाला आपल्या पार्श्वभागी ठेऊन आपण अनेकदा फोटो सेशन्स केले आहेत.
मिळालेल्या पैशातून आपली जहागिरी राखत इतद्देशियांवर जुलूम आणि दादागिरी करीत महाराजांना अगदी सहज आयुष्य व्यतीत करता आले असते, पण जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्ची घालायचा आणि जनतेचे हिंदवी स्वराज्य उभे करायचे, या उत्कट आणि उदात्त भावनेने ही स्वराज्य निर्मिती झाली आहे.
आईच्या दुधाईतका पौष्टिक आणि सात्विक इतिहास आपल्याला जिजाऊंनी आणि महाराजांनी दिला आहे.
असा हा स्वराज्याच्या इतिहासाने न्हाऊन निघालेला प्रचंडगड, आपण इसवीसन २०२५ चा आपला पहिला ट्रेक म्हणून करणार आहोत.
*ट्रेकची आयटनरी पुढीप्रमाणे:*
१. पहाटे ५ वाजता नेहरू स्टेडियमच्या मेन गेट समोरील फूटपाथ वर जमणे.
2. पहाटे ५:१५ वाजता तोरण्याकडे कूच करणे.
3. सकाळी ७:३० वाजता वेल्हा येथे पोहोचणे.
4. कदम यांच्या हॉटेल मध्ये चहा आणि नाश्ता करणे.
5. सकाळी साडेआठ वाजता गड चढण्यास सुरुवात करणे.
6. सकाळी साडेअकराच्या सुमाराला मेंगजाई देवीच्या देवळात पोहोचणे.
7. एक वाजेपर्यंत जवळपासचा गड फिरणे.
8. दुपारी एक वाजता, आपण घरून बरोबर आणलेला डबा खाणे.
9. दुपारी दोन ते चार गड फिरून पुन्हा मेंगजाई देवीच्या मंदिरात परत येणे.
10. सायंकाळी सहा वाजता गड उतरून वेल्ह्या मध्ये येणे.
11. ज्याचे त्याने फ्रेश होऊन सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यात परत येण्यासाठी निघणे.
12. ट्रेक फी रुपये आठशे फक्त. ट्रेक फी मध्ये पुणे ते पुणे प्रवास सकाळचा चहा आणि नाश्ता समाविष्ट केलेला आहे.
13. ट्रेक फिज मध्ये कोणतेही जेवण समाविष्ट केलेले नाही.
14. प्रत्येकाने आपापला डबा घेऊन येण्याचे आहे.
15. डब्यामध्ये फोडणीची पोळी, केळी, चीज, उसळ पोळी किंवा भाजी पोळी, असे पदार्थ असावेत.
16. आपण मेंगाजाई देवीच्या देवळाच्या आवारात बसून जेवण करणार असल्याने शक्यतो अंडी नसावीत.
*बरोबर घेण्याच्या गोष्टी*
१. फुल शर्ट किंवा स्लिव्हज् आणि फुल पँट.
2. सॅक
3. ट्रेक शूज
4. ट्रेकिंग पोल किंवा बांबूची काठी
5. सन कॅप
6. टॉवेल
7. जेवणाचा डबा
8. तीन बाटल्या पाणी.
9. टॉर्च
10. इलेक्ट्रोलाइट्स
11. नेहमीची औषधे
12. व्होलीनी स्प्रे ऑइंटमेंट
13. टिश्यू पेपर
14. सनीटायजर इत्यादी.
*विशेष सूचना:*
१. पुणे माऊंटेनियर्स तर्फे या ट्रेक मध्ये जेवणाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही, ज्याने त्याने आपापले डबे आणावयाचे आहेत.
2. ज्यांना डबे आणणे शक्य नाही ते आपल्या डब्यांची ऑर्डर गडाच्या पायथ्याशी हॉटेल तोरणा येथे देऊ शकतात.
3. ट्रेक ग्रुपमध्ये त्यांचा नंबर शेयर केला जाईल. ज्याने त्याने आपली ऑर्डर देण्याची आहे. त्याच्या पेमेंटची जबाबदारी पुणे माऊंटेनियर्स घेणार नाही, याची नोंद घ्यावी.
पुणे माऊंटेनियर्स करीता
सुधीर खेडकर
8888852241
विनय भालेराव
9579639951