Loading Events

« All Events

Summer Camp

May 3 @ 2:00 pm - May 5 @ 5:00 pm

दुर्गमल्हार ट्रेक्स अँड टुर्स

समर कॅम्प…

३ मे ते ५ मे २०२५

मे महिन्याची सुट्टी आणि मामाचा गाव हे एक पूर्वी समीकरण च असायचं. आताच्या rat रेस मध्ये मुले आणि पालक इतके अडकले आहेत की ना मुलांना ह्यासाठी वेळ आहे ना की त्यांच्या पालकांना.

चूल, बंब, पाटा वरवंटा, उखळ, जाते ह्या वस्तू आणि हे शब्द ही आपल्या आयुष्यातून हद्दपार झाले आहेत. पण सारवलेले अंगण, तुळशी वृंदावन, त्याभोवती रांगोळी, आमराई, नदीतले डुंबणे, रात्री चांदण्या मोजत, गोष्टी ऐकत अंगणात झोपणे, झाडाच्या सावलीत दुपारी गोट्या, लगोरी, भोवरा खेळणे ह्या आणि अशा अनेक गोष्टींपासून आपली मुले कोसो दूर आहेत. त्यांच आयुष्य शाळा, क्लास, सोशल मीडिया, मोबाईल ह्यातच अडकून पडल आहे अस वाटणाऱ्या प्रत्येक पालकांसाठी आनंदाची बातमी.

मुलांचा IQ वाढण्या पेक्षा त्यांचा EQ वाढावा अस वाटणाऱ्या प्रत्येक पालकांसाठी दुर्गमल्हारचा एक प्रयत्न

Children camp हे म्हणण्यापेक्षा तुमची मुले मामा, मावशी, काका, आत्या, दादा, ताई सोबत धमाल करतील असं निखळ आनंदाचं वास्तव्य अनुभवतील. दिवसभर मोबाईल वर गेम खेळण्यापेक्षा आमराईत हुंदडतील, घरात एकटे खेळण्यापेक्षा चार मुलांसमवेत खेळतील. त्यातून त्यांचा सामाजिक विकास ही होईल. थोड स्वावलंबन ही शिकतील. पुस्तकातला इतिहास गोष्टींच्या रुपात अनुभवतील. रिसॉर्ट मधल्या स्विमिंग पुल ऐवजी नदीत डुंबतील.

ह्या आणि अशा अनेक अनुभवातून समृद्ध करण्यासाठी पाठवतायना आपल्या मुलांना धमाल करायला?
कुठे : अनघा फार्म
कधी: ३ मे ते ५ मे

शुल्क:- रु.४५९९/- फक्त..

अधिक माहितीसाठी संपर्क:

1. दुर्ग मल्हार ऑफिस :- 7887880489
2. विरार शाखा :-9975396250
3. विवेक पाटील :- 9960922466
4. माधवी लोकरे:-9224643272

https://www.Durgmalhar.com
https://wa.me/917887880489
https://youtube.com/c/durgmalhar

Details

Start:
May 3 @ 2:00 pm
End:
May 5 @ 5:00 pm
Event Category:
Website:
https://www.facebook.com/events/664667079422955/

Organizer

दुर्ग मल्हार
Email
noreply@facebookmail_com

Venue

Online event