शिलेदार परिवार
आयोजित
राजगड – तोरणा – रायगड ऐतिहासिक मशाल मोहिम🚩
● तारीख – 15 एप्रिल ते 16 एप्रिल 2023
●मोहिम शुल्क –
1599/- (विना प्रवास)
2599/- पुणे ते पुणे
3099/- मुबंई ते मुबंई
समाविष्ट – दोन दिवस चहा नाष्टा जेवन, पॅकफुड, प्रवासखर्च ई.
● नेतृत्व – शिलेदार संस्थे चे सर्व शिलेदार
● मोहीमेसाठी एकत्र जमण्याचे ठिकाण – राजगड ( पद्मावती माता मंदिर)
● मोहिमेचा मार्ग – राजगड – संजीवनी माची – आळु दरवाजा – तोरणा मार्ग – तोरणा – भट्टी – गेळगणी – धनगर वाडा – मोहरी – सिगांपूर नाळ – दापोली – वारंगी – टकमकवाडी – रायगड वाडी – नाणे दरवाजा – दुर्गदुर्गेश्वर रायगड
● मुक्काम – दापोली गाव
गडे हो ____
इतिहास हा केवळ पुस्तकात वाचायचा नसतो तर तो भूगोलात शोधायचा असतो केवळ भूगोलात शोधायचा नसतो तर तो सह्याद्रीत रानवाटा ढोरवाटा माकडवाटा तुडवित पहायचा असतो . केवळ त्या वाटा तुडवायच्या नसतात तर त्यावरील ईतिहास लोककथा समाध्या थडगी रहाळपरिसरातील मंदिरे वास्तु शिलालेख वनसंपदा प्राणीसंपदा प्राणवायु समजुन प्राशन करायचा असतो.
होय..
ईतिहास हा केवळ मऊ मुलायम बिछायतीवर लोळत पडुन वाचण्याऐवजी तो जगायला या ….
आपल्या ह्या वानरदेहातील त्या नराला वाचवायला या…!!
● मोहिमेचा उद्देश :
1. राजगड ते रायगड ह्या सह्याद्रीमंडळातील रानवाटा घाटवाटा रहाळ परिसरातील गावे, लोकजीवन , मंदीरे शिल्पे समाध्या थडगी दंतकथा वनस्पती वन्यपशुसंपदा समजुन घेणे .
2. अवघड कडे, घाटवाटा रानवाटा व नाळीवाटा पार करून शरीराचा कस आजमावणे. सह्याद्रीचे विलोभणीय दृष्य जवळून पाहत त्याचे विविधांगी दृष्टीने अभ्यासात्मक निरीक्षण करणे .
3. सह्याद्रीमंडळात भ्रमंती करताना एकमेकासोबतची एक टिमभावना विकसित करणे, सह्याद्रीमंडळातील भटकंतीचे महत्त्व अन परिभाषा समजुन घेणे .
4. घरसंसारातील रोजच्या चिंता काळजीने काळजुंन गेलेल्या शरीर व मनाला नवप्रेरणा व ऊभारी देत आत्मविश्वासाची अक्षरे गिरवणे.
मोहिमेचे स्वरुप –
▪︎पहिला दिवस – 14 एप्रिल 2023
टप्पा – 1 पाली ते पद्मावती माची :- 02 किमी अंतर, 02:00 तास वेळ
रात्री नाईट ट्रेक करून पद्मावती देवी मंदिरात येऊन दर्शन घेऊन आराम.
▪︎दुसरा दिवस – 15 एप्रिल 2023
07:00 वाजता – राडगजवरिल प्रसन्न सूर्योदय पाहुन चहा नाष्टा करुन पुढे मार्गस्त.
टप्पा – 2 राजगड, संजिवनी माची, अळू दरवाजा, बापुजी बुवाजी खिंड, खोपडेवाडी (धनगरवाडी), तोरणा पाहुन वेल्हे – 15 किमी अंतर, 08:00 तास वेळ
दुपारचे जेवण – पॅक फुड
दुपारी 05 पर्यंत वेल्हे गावात पोहचणे.
वेल्हा ते मोहरी गाडीने प्रवास.
मोहरी येथे रात्रीचे जेवन व मुक्काम.
▪︎तिसरा दिवस – 16 एप्रिल 2023
सकाळचा चहा नाष्टा करुण पुढे मार्गस्त –
टप्पा – 3 मोहरी, सिंगापूर नाळ दापोली – 5 किमी अंतर, 3 तास वेळ
दापोली ते वाघोली गाडीने प्रवास
टप्पा – 4 वाघोली ते हिरकणीवाडी खिंड :- 5 किमी अंतर, 2 तास वेळ
वाळुसरे खिडं मार्गे रायगड सर करणे.
गड सर करत असताना रायगडावरील माय हिरा आज्जीचे आशिर्वाद घेणे अन मोहीमेची माहीती देणे.
गडावर राजसदरेवर मुजरा करणे, अन जगदिश्वर मंदिरात पुजा करणे अन शिवसमाधीजवळ नतमस्तक होऊन मोहीमेची सागंता.
दुपारचे जेवण – हिरकणीवाडी
_________________
सोबत घ्यावयाच्या वस्तू / गोष्टी खालीलप्रमाणे –
(खाली नमूद केलेल्या सर्व गोष्टी गरजेनुसार आणणे बंधनकारक राहील)
1. टी – शर्ट, ट्रेक पॅन्ट
2. सध्या दिवस थंडिचे आहेत त्यामुळे सर्व प्रथम प टोपी, कमी वजनाचा स्वेटर
3. मोबाईल व camera वगैरे साहित्य पाण्यात भिजू नये म्हणून काही प्लास्टिक पिशव्या.camera चे ट्राय पॉड टाळा.
4. एक चादर किंवा रग आणि बेडशिट इतके पातळ व कमी वजनाचे आणखी एक.
5. ट्रेक मध्ये हाफ पँट निषिद्ध अाहे.मुक्कामाच्या ठीकाणी रात्रीच्या वापरासाठी फक्त घेऊ शकतात.
6. एक जोड कपडे ट्रेक मध्ये वापरण्या व्यतिरिक्त.कारण,तसेही तिनही दिवस ट्रेकचे कपडे अगात असतात त्यामुळे तिन दिवस तेच वापरले तरी काही हरकत नाही. टुथपेस्ट,टॉवेल व छोटा साबण ( फ्रेश होण्याकरिता )
7. सोबत सुका खाऊ बिस्किटे, प्लम केक,इत्यादी घ्यायचा आहे. जो निदान स्वत:साठी दोन दिवस पुरेल.
8. सोबत एक विजेरी ,एक चाकू,एक लाईटर,एक mat,दोन लिटर पाणि मावेल इतकी पाण्याची बॉटल,एक पेन,एक पेन्सील,एक नोंदवही हे साहित्य कंपलसरी पाहीजे.
9. ट्रेक शुज कंपलसरी आहेत.ट्रेकचे नसतील तर निदान त्यांची ग्रिफ मजबूत असावी.नविन शुजच्या भानगडीत पडू नका.अनावश्यक खर्च टाळा.चप्पल टाळा.रात्रीच्या वापरासाठी घ्यायची असेल तर घ्या.पण वजन कमी असेल तर.
10. जर कसले औषध वैगेरे चालू असेल तर ती औषधे सोबत बाळगावीत. तसेच सोबत स्प्रे,पेनकिलर, बॅंडेज, जखमेवरील मलम जवळ ठेवावे.
12. मोहिमेच्या मार्गावर लागणाऱ्या दुर्गम खेड्यापाड्यात राहणाऱ्या लहान लहान मुलांना देण्यासाठी काही खाऊ ( चॉकलेट, बिस्कीट , गोळ्या ) व शालेय उपयोगी साहित्य स्वईच्छेने आणायचे असल्यास ते हि सोबत घ्यावे.
13. या सर्वांना सामावून घेईल इतकी आपल्या सोईप्रमाणे मजबूत बॅग.
15. आपल्याकडे आपल्याच आरोहण व संरक्षणाचे काही साहित्य जसे दोर,डिसेंडर,कँराबिनेर,बेल्ट वगैरे साहित्य आहे.ते फक्त वाटून घेत एकमेकांना सहाय्य करत ही भटकंती मोहिम पुर्ण करायची आहे.
16. सर्वात महत्वाचे व नेहमीचे…
सह्याद्रीच्या कातळ कड्यांना भिडण्याची धमक मात्र सोबत घेऊन या.
________________________
या मोहिमेकरिता करता येणाऱ्या सर्व व्यक्तींना नियम अटी व सुचना :
_________________________
1. सह्याद्रीभटके ह्या भटकंतीमोहिमेत सहभागी होतील त्यांनी अवघडतम व काठिण्यतम घाटवाटा नाळीवाटा पार करण्याची परिसीमा गाठायची जिद्द ठेवायला हवी .
2. हि भटकंतीमोहिम नाठाळ व अगदीच नवख्यांनी निषिध्द मानावी, कुठल्याही प्रकारचे आजार वा शारीरिक व्यंग असलेल्या व आपल्या शारीरिक क्षमतांचा नीटसा अजमास नसलेल्या व्यक्तीनी ह्या मोहिमेत येण्याची तसदी घेऊ नये हि विनंती .
3. मोहीमेत सर्वात पुढे ध्वजधारक असेल सर्वानी त्याच्या पाठोपाठ चालणे.
4. राजगड ते रायगड ह्या पदभ्रमंती मोहिमेत दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार रहावे, कुठलीही हुल्लडबाजी व दंगामस्ती वा सह्याद्रीशी गैरवर्तन आपणांकडुन होणर नाही ह्याची काळजी घ्यावी . एक टिमवर्क ह्या नात्याने व एक युनिट ह्या नात्याने आपण स्वतःची व त्याच्याही आगोदर ईतर भावंडाची काळजी घ्यावी .
5. प्रंचढ शारीरिक व मानसिक कष्ट झेलत सह्याद्रीचा ऊन वारा पाऊस थंडी व भंडारासम चिखलमाती अंगावर लेऊन घेण्याची तयारी असावी .
6. हा मौजमजे साठी काढलेला ट्रेक नसून एका जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक मार्गावर पुन्हा मार्गक्रमण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे त्याचे भान ठेवावे आपल्याकडून चुकीची भाषा व कोणतेही चुकीचे अथवा असभ्य वर्तन घडणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी.कोणत्याही प्रकारचे व्यसन मोहिमेत खपवून घेतले जाणार नाही. (कोणताही गैरप्रकार किंवा चुकीचे काही वाटल्यास मोहिमेचे लीडर किंवा आयोजकांच्या निदर्शनास त्वरित घालून द्यावे) मोहिमेमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यानकडून शिस्तीची अपेक्षा आहे …
7. मोहीम मार्गावर सर्वांसोबत चालावे मागे मागे रेंगाळत बसू नये. जास्तीत जास्त आंतर आपणास चालायचे आहे तेव्हा प्रत्येकाकडून सहकार्य अपेक्षित आहे, समूह सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊ नये.
8. तुम्हीं याआधीही अनेकदा हि मोहीम किंवा इतर कोणत्या मोहीम केल्या असल्या, तुम्हाला अनेक अनुभव किंवा जाणकारी असेल तरीही ईथे मोहिमेचे आयोजक व मोहीमचे लीडर यांच्या सूचनांचे पालन करावेच लागेल.
10. मोहिमेमध्ये येताना किमती वस्तू आपआपल्या जबाबदारीवर आणाव्यात (दागिने महागडे मोबाईल व कॅमेरे ) त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान अथवा हरवल्यास तुम्ही स्वतः जबाबदार
11. भंटकतीमोहिमेत सामील होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यांकडून शिस्तीची अपेक्षा आहे, एक संघभावनेच्या धोरणातुन सर्वांना समावुन घेत एकजुटीने एकाच गटात चालावे, समुह सोडुन ईतस्थतः भटकु नये.
12. आयोजक मंडळींवर सर्व सहकारीवर्गाची व मोहिमेची जबाबदारी असल्याने आपणांकडुन सहकार्य अपेक्षित आहे.
14. सर्वांनी मोठी रोख रक्कम , दागिने वा ईतर किमंती वस्तू कटाक्षाने आणण्याचे टाळावे. काहीही गैरप्रकार झाल्यास आयोजकांना जबाबदार धरू नये हि विनंती .
15. मोहिमेकाळात मोहीम आयोजकांनी घेतलेला निर्णय हाच अंतिम निर्णय असेल त्यावर कोणीही कसलाही वाद घालू नये.
16. प्रत्येकाने दिलेल्या वेळेचे नियमांचे व सुचनांचे महत्व काटेकोर पणे पाळावे.
17. वेळेनुसार नियोजनात योग्य ते बदल केले जातील त्यात कोणताही आक्षेप नसावा.
● टीप –
• राजगड ते रायगड मोहीमेचे संपुर्ण नेतृत्व आपली शिलेदार संस्थेची भटकंतीची अघाडीची टिम करेल. त्या सर्वाच्या सुचनाचे पलण करणे बंधनकारक आहे.
• मोहीमेत आपले अभ्यासक आपल्याला मार्गातील ऐतीहासिक महत्व ईतीहास सागंतील तो सर्वानी ऐकणे.
● संपर्क क्रमांक –
शिलेदार सागर नलवडे – 9022556690 9004615001 9005715001
Registration will be done only after Payment confirmation.
Please follow the given procedure to register for event through E-transfer.
1. Call Shiledar’s and confirm the availability of seat.
2. Transfer the money to “Shiledar” Account.
3. Send your Name, Age, Blood Grp Address, Mobile No & Screen shot of payment on what’s app – 9022556690
_____________________________
PAYMENT DETAILS –
Shiledar Adventure India
HDFC Bank, Juinagar – Navi Mumbai
Current Account –
A/c No. – 50200044689652
IFSC Code – HDFC0003953
Google Pay/Phone Pay No – 9022556690
_____________________________
सह्याद्री भटकणे म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, या सह्याद्रीच्या कातळ कड्यांनाही एका ज्वाज्वल्य तेजोमय इतिहासाचा दर्प आहे, मराठमोळ्या मावळ्यांच्या निस्वार्थी त्यागाचा त्यांना गंध आहे, त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत ते जगलेलेच काही आयुष्य या तीन दिवस आपण जगूयात.
आपण ऐतिहासिक मोहिम करतोय, कमीत कमी साहित्य व कमीत कमी वजन सांभाळत आपल्याला ही भटकंती करायची आहे.कमी साहित्यांत गरजा पुर्ण करणे हा एक अत्यंत सुप्त गुण आपल्याला इथे शिकायचा आहे.
“जय शिवराय जय सह्याद्री जय गडकोट”
आयोजक
*SHILEDAR ADVENTURE INDIA*
Moving Towards The Goals…!
https://www.facebook.com/events/616826933621553/