Loading Events

« All Events

  • This event has passed.

Raireshwar – Mohangad – Kavlyagad – Raigad (R to R)

August 12, 2022 @ 9:30 pmAugust 15, 2022 @ 9:00 pm

3169 image 288630900 792899952117728 6118215904918672454 n
 Save as PDF

शिलेदार

आयोजित

स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर ते स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम

(व्हाया मोहनगड – वरंधा घाट – कावळ्यागड – पारमाची नाळ)

● मोहिमेचे नाव – किल्ले रायरेश्वर ते दुर्गदुर्गेश्वर रायगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम – R to R

● तारीख – 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022

●मोहिम शुल्क –

1699/- Without Travel
(Group Discount Available)

(प्रवास खर्च वैयक्तिक असेल, प्रवासाचे नियोजन मुख्य समुहात केले जाईल)

● नेतृत्व – शिलेदार संस्थे चे सर्व शिलेदार
● मोहीमेसाठी एकत्र जमण्याचे ठिकाण – रायरेश्वर

● मोहिमेचा मार्ग – रायरेश्वर – मोहणगड – वरांधा घाट – कावळ्यागड – दुर्गदुर्गेश्वर रायगड
● मुक्काम – पहिला मुक्काम मोहणगड पायथा / दुसरा मुक्काम शेंदूर मलई

गडे हो __

इतिहास हा केवळ पुस्तकात वाचायचा नसतो तर तो भूगोलात शोधायचा असतो केवळ भूगोलात शोधायचा नसतो तर तो सह्याद्रीत रानवाटा ढोरवाटा माकडवाटा तुडवित पहायचा असतो . केवळ त्या वाटा तुडवायच्या नसतात तर त्यावरील ईतिहास लोककथा समाध्या थडगी रहाळपरिसरातील मंदिरे वास्तु शिलालेख वनसंपदा प्राणीसंपदा प्राणवायु समजुन प्राशन करायचा असतो.
होय..
ईतिहास हा केवळ मऊ मुलायम बिछायतीवर लोळत पडुन वाचण्याऐवजी तो जगायला या ….
आपल्या ह्या वानरदेहातील त्या नराला वाचवायला या…!!

अशी ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती मोहिम का व कशासाठी
कारण__
जेव्हा,
स्वराज्यावर एखाद्या परकिय गनिमांचे आक्रमण होत असे त्यावेऴी हेरांमार्फत केवऴ काही तासांत या बातम्या खडानखडा माहीती महाराजांपर्यंत राजधानीच्या गडावर पोहचवली जायची, तेच बहिर्जी नाईकांचे हेर याच घाटवाटांनी प्रवास करत रात्री अपरात्री कमीत कमी वेऴेत हे सर्व कार्य करत.
एक हेर हा एका पायदऴाच्या सेनापतीच्या बरोबर होता, अस निदान आम्ही तरी समजतो.
कारण त्याला प्रसंगी वेशांतर कराव लागत असे, प्रसंगी गनिमाच्या गोटात जिव हातावर घेत माहीती काढावी लागे.
सापडला गेला तर गर्दनच मारली जाणार हे माहीत असूनही ती जिगर ते धाडस तो त्याग त्यांच्य़ा ठाई होता….
प्रसंगी त्यांस हाती तलवारी धनुष्य पेलावे लागत होते, आपल्या जिवाची कुठलीच शाश्वती नसताना लढणारे हे विर.
कुठल्याच स्वार्थाची आपेक्षा नाही.
स्वराज्य उभारण्यात या #बहिर्जी_नाईक व हेरांचे सर्वात मोठे योगदान होते.
ते कित्येक संपले, ते कधीच समोर आले नाहीत.
गनिमी काव्यात ते माहिर होते.
हरहुन्नर लढवून आपल्या धन्याच्या चरणी इमान वाहत होते.
मला
शिवराय व्हायचे नाही…
मला व्हायचेय बहिर्जी
निस्वार्थी त्याग..
त्यांची चपऴता..
त्यांचा तो गनिमी कावा.
त्यांचा तो जिगरीपणा ..
त्यांची पाऊले याच घाटवाटांतून गेली.
त्यांची चरणधूळ मला माथी लेवून हे गुण आत्मसात करत मला माझे जिवन व कार्य उज्वल करायचेय..
देणारे ते शिवराय थोर आहेत.
ते भरभरून देतात.
कवी भूषण म्हणतात…
“ना राजा किसी राज के
ना ब्यापारी कीसी जहाज के,
भिकारी किजीए हमे महाराज शिवराज के”
आम्हाला त्यांच्या चरणातील भिकारी व्हायचय.. आम्हास सह्याद्रीचा दगड व्हायचय. आम्हास निस्वार्थी सेवा करणारे बहिर्जी व्हायचेय….. बहिर्जी व्हायचेय.

● मोहिमेचा उद्देश :
1. रायेश्वर ते रायगड ह्या सह्याद्रीमंडळातील रानवाटा घाटवाटा रहाळ परिसरातील गावे, लोकजीवन , मंदीरे शिल्पे समाध्या थडगी दंतकथा वनस्पती वन्यपशुसंपदा समजुन घेणे .
2. अवघड कडे, घाटवाटा रानवाटा व नाळीवाटा पार करून शरीराचा कस आजमावणे. सह्याद्रीचे विलोभणीय दृष्य जवळून पाहत त्याचे विविधांगी दृष्टीने अभ्यासात्मक निरीक्षण करणे .
3. सह्याद्रीमंडळात भ्रमंती करताना एकमेकासोबतची एक टिमभावना विकसित करणे, सह्याद्रीमंडळातील भटकंतीचे महत्त्व अन परिभाषा समजुन घेणे .
4. घरसंसारातील रोजच्या चिंता काळजीने काळजुंन गेलेल्या शरीर व मनाला नवप्रेरणा व ऊभारी देत आत्मविश्वासाची अक्षरे गिरवणे.

मोहिमेचे स्वरूप –

पहिला दिवस – 12 ऑगस्ट 2022

रायरेश्वर येथे सर्वांनी एकत्र येऊन मुक्काम करणे.

दुसरा दिवस – 13 ऑगस्ट 2022

दुस-या दिवशी पहाटे 5:30 वाजता चहा नाष्टा करुन पुढे मार्गस्त.

रायरेश्वर – धानिवली – मोहणगड – शिरगाव

शिरगाव मुक्काम जेवन.
________

तिसरा दिवस – 14 ऑगस्ट 2022 सकाळचा चहा नाष्टा करुण पुढे मार्गस्त_

शिरगाव वरधा घाट – कावळ्यागड – पामराची नाळ – शेदुर मलई

शेदुर मलई येथे रात्रीचे जेवण व दुसरा मुक्काम
_______

दिवस चौथा – 15 ऑगस्ट 2022
सकाळचा चहा नाष्टा करुण पुढे मार्गस्त-
वाघोली मार्गे रायगड
पाचाड खिंडीतुन पायरी मार्गाने किंवा चित्त दरवाजाच्या राजमार्गाने रायगड सर करणे.
गड सर करत असताना रायगडावरील माय हिरा आज्जीचे आशिर्वाद घेणे अन मोहीमेची माहीती देणे.

गडावर राजसदरेवर मुजरा करणे, अन जगदिश्वर मंदिरात पुजा करणे अन शिवसमाधीजवळ नतमस्तक होऊन मोहीमेची सागंता.

दुपारचे जेवण व सायंकाळी चहा अवकिरकर याच्या घरी
_______

शुल्क भरण्यासाठी –

Payment Details –

Shiledar Adventure India

HDFC Bank, Kamothe, Panvel

Current Account –

A/c No. – 50200044689652

IFSC Code – HDFC0003997

Google Pay/Phone Pay – 9022556690

(शुल्क भरल्यावर समुहात पावती नाव नबंर ठिकाण द्यावे)
_______

सोबत घ्यावयाच्या वस्तू / गोष्टी खालीलप्रमाणे –

(खाली नमूद केलेल्या सर्व गोष्टी गरजेनुसार आणणे बंधनकारक राहील)

1. टी – शर्ट, ट्रेक पॅन्ट
2. सध्या दिवस थंडिचे आहेत त्यामुळे सर्व प्रथम प टोपी, कमी वजनाचा स्वेटर
3. मोबाईल व camera वगैरे साहित्य पाण्यात भिजू नये म्हणून काही प्लास्टिक पिशव्या. camera चे ट्राय पॉड टाळा.
4. एक चादर किंवा रग आणि बेडशिट इतके पातळ व कमी वजनाचे आणखी एक.
5. ट्रेक मध्ये हाफ पँट निषिद्ध अाहे.मुक्कामाच्या ठीकाणी रात्रीच्या वापरासाठी फक्त घेऊ शकतात.
6. एक जोड कपडे ट्रेक मध्ये वापरण्या व्यतिरिक्त.कारण,तसेही तिनही दिवस ट्रेकचे कपडे अगात असतात त्यामुळे तिन दिवस तेच वापरले तरी काही हरकत नाही. टुथपेस्ट,टॉवेल व छोटा साबण ( फ्रेश होण्याकरिता )
7. सोबत सुका खाऊ बिस्किटे, प्लम केक,इत्यादी घ्यायचा आहे. जो निदान स्वत:साठी दोन दिवस पुरेल.
8. सोबत एक विजेरी ,एक चाकू,एक लाईटर,एक mat,दोन लिटर पाणि मावेल इतकी पाण्याची बॉटल,एक पेन,एक पेन्सील,एक नोंदवही हे साहित्य कंपलसरी पाहीजे.
9. ट्रेक शुज कंपलसरी आहेत.ट्रेकचे नसतील तर निदान त्यांची ग्रिफ मजबूत असावी. नविन शुजच्या भानगडीत पडू नका. अनावश्यक खर्च टाळा. चप्पल टाळा. रात्रीच्या वापरासाठी घ्यायची असेल तर घ्या.पण वजन कमी असेल तर.
10. जर कसले औषध वैगेरे चालू असेल तर ती औषधे सोबत बाळगावीत. तसेच सोबत स्प्रे,पेनकिलर, बॅंडेज, जखमेवरील मलम जवळ ठेवावे.
12. मोहिमेच्या मार्गावर लागणाऱ्या दुर्गम खेड्यापाड्यात राहणाऱ्या लहान लहान मुलांना देण्यासाठी काही खाऊ ( चॉकलेट, बिस्कीट , गोळ्या ) व शालेय उपयोगी साहित्य स्वईच्छेने आणायचे असल्यास ते हि सोबत घ्यावे.
13. या सर्वांना सामावून घेईल इतकी आपल्या सोईप्रमाणे मजबूत बॅग.
15. आपल्याकडे आपल्याच आरोहण व संरक्षणाचे काही साहित्य जसे दोर, डिसेंडर, कँराबिनेर, बेल्ट वगैरे साहित्य आहे. ते फक्त वाटून घेत एकमेकांना सहाय्य करत ही भटकंती मोहिम पुर्ण करायची आहे.
16. सर्वात महत्वाचे व नेहमीचे…
सह्याद्रीच्या कातळ कड्यांना भिडण्याची धमक मात्र सोबत घेऊन या.
________

या मोहिमेकरिता करता येणाऱ्या सर्व व्यक्तींना नियम अटी व सुचना :
_________

1. सह्याद्रीभटके ह्या भटकंतीमोहिमेत सहभागी होतील त्यांनी अवघडतम व काठिण्यतम घाटवाटा नाळीवाटा पार करण्याची परिसीमा गाठायची जिद्द ठेवायला हवी .
2. हि भटकंतीमोहिम नाठाळ व अगदीच नवख्यांनी निषिध्द मानावी, कुठल्याही प्रकारचे आजार वा शारीरिक व्यंग असलेल्या व आपल्या शारीरिक क्षमतांचा नीटसा अजमास नसलेल्या व्यक्तीनी ह्या मोहिमेत येण्याची तसदी घेऊ नये हि विनंती .
3. मोहीमेत सर्वात पुढे ध्वजधारक असेल सर्वानी त्याच्या पाठोपाठ चालणे.
4. रायरेश्वर ते रायगड ह्या पदभ्रमंती मोहिमेत दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार रहावे, कुठलीही हुल्लडबाजी व दंगामस्ती वा सह्याद्रीशी गैरवर्तन आपणांकडुन होणर नाही ह्याची काळजी घ्यावी . एक टिमवर्क ह्या नात्याने व एक युनिट ह्या नात्याने आपण स्वतःची व त्याच्याही आगोदर ईतर भावंडाची काळजी घ्यावी .
5. प्रंचढ शारीरिक व मानसिक कष्ट झेलत सह्याद्रीचा ऊन वारा पाऊस थंडी व भंडारासम चिखलमाती अंगावर लेऊन घेण्याची तयारी असावी .
6. हा मौजमजे साठी काढलेला ट्रेक नसून एका जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक मार्गावर पुन्हा मार्गक्रमण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे त्याचे भान ठेवावे आपल्याकडून चुकीची भाषा व कोणतेही चुकीचे अथवा असभ्य वर्तन घडणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी.कोणत्याही प्रकारचे व्यसन मोहिमेत खपवून घेतले जाणार नाही. (कोणताही गैरप्रकार किंवा चुकीचे काही वाटल्यास मोहिमेचे लीडर किंवा आयोजकांच्या निदर्शनास त्वरित घालून द्यावे) मोहिमेमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यानकडून शिस्तीची अपेक्षा आहे …
7. मोहीम मार्गावर सर्वांसोबत चालावे मागे मागे रेंगाळत बसू नये. जास्तीत जास्त आंतर आपणास चालायचे आहे तेव्हा प्रत्येकाकडून सहकार्य अपेक्षित आहे, समूह सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊ नये.
8. तुम्हीं याआधीही अनेकदा हि मोहीम किंवा इतर कोणत्या मोहीम केल्या असल्या, तुम्हाला अनेक अनुभव किंवा जाणकारी असेल तरीही ईथे मोहिमेचे आयोजक व मोहीमचे लीडर यांच्या सूचनांचे पालन करावेच लागेल.
10. मोहिमेमध्ये येताना किमती वस्तू आपआपल्या जबाबदारीवर आणाव्यात ( महागडे मोबाईल व कॅमेरे ) त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान अथवा हानी झाल्यास (गहाळ झाल्यास किंवा पावसामुळे हानी पोहोचल्यास) त्याचे तुम्ही स्वतः जबाबदार असाल. सोन्याचे अथवा महागडे दागिने सोबत ठेवू नये. ठेवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:ची असेल.
11. भंटकतीमोहिमेत सामील होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यांकडून शिस्तीची अपेक्षा आहे, एक संघभावनेच्या धोरणातुन सर्वांना समावुन घेत एकजुटीने एकाच गटात चालावे, समुह सोडुन ईतस्थतः भटकु नये.
12. आयोजक मंडळींवर सर्व सहकारीवर्गाची व मोहिमेची जबाबदारी असल्याने आपणांकडुन सहकार्य अपेक्षित आहे.
14. सर्वांनी मोठी रोख रक्कम , दागिने वा ईतर किमंती वस्तू कटाक्षाने आणण्याचे टाळावे. काहीही गैरप्रकार झाल्यास आयोजकांना जबाबदार धरू नये हि विनंती .
15. मोहिमेकाळात मोहीम आयोजकांनी घेतलेला निर्णय हाच अंतिम निर्णय असेल त्यावर कोणीही कसलाही वाद घालू नये.
16. प्रत्येकाने दिलेल्या वेळेचे नियमांचे व सुचनांचे महत्व काटेकोर पणे पाळावे.
17. वेळेनुसार नियोजनात योग्य ते बदल केले जातील त्यात कोणताही आक्षेप नसावा.
● टीप –
• रायरेश्वर ते रायगड मोहीमेचे संपुर्ण नेतृत्व आपली शिलेदार संस्थेची भटकंतीची अघाडीची टिम करेल. त्या सर्वाच्या सुचनाचे पलण करणे बंधनकारक आहे.
• मोहीमेत आपले अभ्यासक आपल्याला मार्गातील ऐतीहासिक महत्व ईतीहास सागंतील तो सर्वानी ऐकणे.

● संपर्क क्रमांक –
शिलेदार सागर नलवडे – 9022556690

सह्याद्री भटकणे म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, या सह्याद्रीच्या कातळ कड्यांनाही एका ज्वाज्वल्य तेजोमय इतिहासाचा दर्प आहे, मराठमोळ्या मावळ्यांच्या निस्वार्थी त्यागाचा त्यांना गंध आहे, त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत ते जगलेलेच काही आयुष्य या तीन दिवस आपण जगूयात.
आपण 24 डिसेंबर मोहिमेस सुरुवात करतोय, गलेलठ्ठ पैसे खर्च करत आपणांस मोहिम करायची नाही. कमीत कमी साहित्य व कमीत कमी वजन सांभाळत आपल्याला ही भटकंती करायची आहे.कमी साहित्यांत गरजा पुर्ण करणे हा एक अत्यंत सुप्त गुण आपल्याला इथे शिकायचा आहे.

“जय शिवराय जय सह्याद्री जय गडकोट”

आयोजक

SHILEDAR ADVENTURE INDIA
Moving Towards The Goals…!

https://www.facebook.com/events/597687791569933/

Details

Start:
August 12, 2022 @ 9:30 pm
End:
August 15, 2022 @ 9:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/597687791569933/

Venue

Sahyadri Mountain Range