Loading Events

« All Events

  • This event has passed.

Pune Mountaineers Vasota Trek (sah2/25)

February 23 @ 4:00 am - 9:00 pm

पुणे माऊंटेनियर्स ट्रेक: sah2/25

*ट्रेकची आयटनरी पुढीप्रमाणे:*

१. पहाटे ३:४५ वाजता नेहरू स्टेडियमच्या मेन गेट समोरील फूटपाथ वर जमणे.
2. पहाटे ४:०० वाजता बामणोलीकडे जाण्यासाठी निघणे. गाडीमध्ये पोळी भाजीचा नाश्त्याचा पॅक देण्यात येईल.
3. सकाळी ७:३० वाजता बामणोली येथे पोहोचणे.
4. संकपाळ यांच्या हॉटेल मध्ये चहा घेणे तसेच त्यांच्याकडून दोन पोळ्या आणि उसळ असा पॅक लंच बरोबर घेणे.
5. सकाळी आठ वाजता बोटीमध्ये बसणे. वेळ वाचविण्यासाठी आपण आपला नाश्ता जसा वेळ मिळेल तसा करून घ्यावा. असे केले तरच आपण गडावर फिरण्यासाठी वेळ देऊ शकू, याची नोंद घ्यावी.
6. सकाळी साडेनऊच्या सुमाराला व्याघ्र प्रकल्पाच्या कमानीत पोहोचणे.
7. इको सेन्सिटिव्ह क्षेत्र असल्याने प्रत्येकाने पाणी बॉटल्स आणि इतर कचरा कुठेही टाकू नये ही विनंती.
8. सर्वांनी एकत्र राहवे. वन विभागाच्या गाईडच्या सूचनांचे पालन करावे.
9. दुपारी तीन वाजेपर्यंत गड फिरून आणि जेवण करून पुन्हा परतीच्या मार्गावर निघणे.
10. सायंकाळी पाच वाजता गड उतरून बोटी मध्ये येणे. सायंकाळी ५ नंतर वनखाते बोटी थांबू देत नाही, याची नोंद घ्यावी.
11. ज्याचे त्याने फ्रेश होऊन, संकपाळ यांच्या हॉटेल मध्ये चहा व मॅगी घेऊन सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यात परत येण्यासाठी निघणे.
12. ट्रेक फी रुपये पंधराशे पन्नास फक्त. ट्रेक फी मध्ये पुणे ते पुणे प्रवास सकाळचा चहा, पॅक नाश्ता, पॅक लंच, दुपारचा चहा आणि मॅगी इत्यादी समाविष्ट केलेले आहे.
13. ट्रेक फिज मध्ये रात्रीचे जेवण समाविष्ट केलेले नाही
14. आपल्या आवडीचा खाऊ जवळ ठेवावा.

*बरोबर घेण्याच्या गोष्टी*
१. फुल शर्ट किंवा स्लिव्हज् आणि फुल पँट.
2. सॅक
3. ट्रेक शूज
4. ट्रेकिंग पोल किंवा बांबूची काठी
5. सन कॅप
6. टॉवेल
7. आवडीचा खाऊ
8. तीन बाटल्या पाणी.
9. टॉर्च
10. इलेक्ट्रोलाइट्स
11. नेहमीची औषधे
12. व्होलीनी स्प्रे ऑइंटमेंट
13. टिश्यू पेपर
14. सनीटायजर इत्यादी.

*विशेष सूचना:*

१. वनक्षेत्राच्या नियमांचे कसोशीने पालन करावे.

पुणे माऊंटेनियर्स करीता

Details

Date:
February 23
Time:
4:00 am - 9:00 pm
Event Category:
Website:
https://www.facebook.com/events/1576019523108042/

Organizer

Pune Mountaineers Friend Circle
Email
noreply@facebookmail.com

Venue

Nehru Stadium, Pune
Nehru Stadium, Pune + Google Map