Loading Events

« All Events

  • This event has passed.

Forest Trail and Farmers Meet

June 6 @ 2:00 pm - June 7 @ 7:00 pm

नमस्ते 🙏

🌿 जंगल भ्रमंती व शेतकरी भेट 🌿

शनिवार व रविवार
दिनांक ६ व ७ जून २०२६

सालाबादप्रमाणे यावर्षीची जंगल व शेतकरी भेट आपण दिनांक ६ व ७ जून २०२६ रोजी आयोजित केली आहे. निमित्त आहे – भंडारदरा परिसरातील या काळात होणारे काजव्यांचे अनोखे दर्शन.

काजवा संवर्धनासाठी शेतीत रसायने न वापरणारे आपले शेतकरी व त्यांची पारंपरिक शेती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी – काजवे – निसर्ग आणि आपण सर्व सजग नागरिक यांचा सुंदर मेळ घालून समविचारी लोकांनी खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र यावे आणि आपले हे नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न.

चला तर मग अन्नाची ही निसर्गसाखळी समजून घेऊया आणि अर्थातच सोबत सह्याद्रीत भटकंतीही करूया.

✨ यात आहे :

1. आदिवासी गावातील लोकांच्या सहवासात त्यांच्या संस्कृतीचे दर्शन
2. आदिवासी महिलांचे कांबड-फुगडी नृत्य
3. स्थानिक रानभाज्या व मिलेट्सचे चुलीवरील जेवण आणि खास करवंद कढी
4. देवराई भेट, काजवे दर्शन व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सांदण दरी भेट
5. आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होता येईल अशी खास निसर्गसहल

🏡 राहण्याची सोय :
गावातील शेतकऱ्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था असेल, जेथे बेसिक सोयी उपलब्ध असतील.

📞 ग्रुप सवलत व प्रवेश शुल्कासाठी आमच्याशी संपर्क साधावा.

📍 ठिकाण :
उडदावणे – भंडारदरा, कळसूबाई शिखर पायथा
ता. अकोले, जि. अहिल्यानगर

भेटूया मग, एक अनोखा जीवनानुभव घेण्यासाठी! 🌱✨

काळसूबाई मिलेट्स, नाशिक
📞 7558485436

Details

Organizer

  • Kalasubai Millets and traditional foods

Venue