*जाहीर आवाहन …!!!*
♻️”हरित परिसर, स्वच्छ परिसर”♻️
निसर्गप्रेमींनो, आपण सर्वजण मिळून गेली काही वर्षे, आपल्या परिसरात, वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन, हे कार्य अगदी मनापासून करीत आहोत. आपल्या ह्या स्तुत्य उपक्रमास सम-वैचारिक लोकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. निसर्ग संवर्धनासोबतच आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि आपणा सर्वांची सामाजिक बांधिलकी सुध्दा आहे. या विषयाला अनुसरूनच आपण सिंगल युज प्लास्टिक, त्याचं रिसायकलिंग आणि कचऱ्याचं निर्मूलन, यासाठी प्रयत्नशील राहणे हि काळाची गरज आहे. ठाणे महानगरपालिका याबाबत कार्यशील आहे आणि विविध उपक्रम राबवित आहे आणि कापडी पिशव्या वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, येत्या रविवारी १४.०८.२०२२ रोजी ♻️ *”हरित परिसर, स्वच्छ परिसर”* ♻️ उपक्रमाचा प्रारंभ करीत आहोत. महानगरपालिके कडून बनवल्या गेलेल्या रू. १०/- शुल्क असलेल्या कापडी पिशव्या 🛍️ वापरण्यासाठी आवाहन करणार आहोत.
आपणांस सर्वांना विनंती आहे की, सदर उपक्रमास आपला उत्स्फूर्त सहभाग देऊन सहकार्य करावे.🙏🏻
आपणांस विनंती आहे की, हा संदेश आपण आपल्या संकुल व मित्रपरिवारा मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा.
*भेटण्याचे ठिकाण:* 📍
डी-मार्ट जवळ, ९० फीट रोड,
पारसिक नगर, ठाणे पश्चिम.
*दिनांक व वेळ :* 🕰️
रविवार १४ ऑगस्ट २०२२, सकाळी ७ वाजता.*
🌳पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप🌳
https://www.facebook.com/events/605430514536833/