Loading Events

« All Events

  • This event has passed.

सिहगड – राजगड- तोरणा – रायगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम

July 21, 2022 @ 9:30 pmJuly 24, 2022 @ 9:30 pm

3611 image 287470610 793019722105751 5657055147442395391 n
 Save as PDF

शिलेदार परिवार

आयोजित

किल्ले सिहगड ते दुर्गदुर्गेश्वर रायगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम

🚩व्हाया निसनिची वाट 🚩

● तारीख –
– 22 जुलै ते 24 जुलै 2022

● सिंहगड ला किती तारखेला अन कुठे व किती वाजता जमावे .
– 21 जुलै रोजी रात्री 10 पर्यंत
सिंहगड पायथा (पार्किंग)

● मोहिमेचा उद्देश :

1. नरवीर तानाजी मालुसरेंच्या रुधीराभिषेकाने पावन झालेली डोणगिरी कड्याजवळील मृदा रायगडावर नेऊन ती मंत्र- घोषानिशी राजसभेत पसरणे.

2 .सिंहगड ते रायगड या सह्याद्रीमंडळातील रानवाटा घाटवाटा रहाळ परिसरातील गावे , लोकजीवन , मंदीरे शिल्पे समाध्या थडगी दंतकथा वनस्पती वन्यपशुसंपदा समजुन घेणे .

3. अवघड कडे, घाटवाटा रानवाटा व नाळीवाटा पार करून शरीराचा कस आजमावणे. सह्याद्रीचे विलोभणीय दृष्य जवळून पाहत त्याचे विविधांगी दृष्टीने अभ्यासात्मक निरीक्षण करणे .

4. सह्याद्रीमंडळात भ्रमंती करताना एकमेकासोबतची एक टिमभावना विकसित करणे, सह्याद्रीमंडळातील भटकंतीचे महत्त्व अन परिभाषा समजुन घेणे .

5 .घरसंसारातील रोजच्या चिंता काळजीने काळजुंन गेलेल्या शरीर व मनाला नवप्रेरणा व ऊभारी देत आत्मविश्वासाची अक्षरे गिरवणे .

● मोहिमेचा मार्ग –
सिंहगड – विझंर – राजगड – तोरणा – भट्टी – मोहरी – वारंगी – रायगडवाडी – नाणे दरवाजा – रायगड

● मुक्काम –
भंट्टि/वेल्हे व वारंगी

● आयोजक – शिलेदार परिवार

● नेतृत्व – परिवाराचे सर्व अनुभवी शिलेदार

● जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था

दिवस पहिला – 22 जुलै 2022

नाष्टा – विझंरगाव

दुपार राजगड – पॅक फुड ठेपले व स्वत:ची शिदोरी

रात्रीचे जेवण – भट्टि/वेल्हे

मुक्काम – भट्टि येथील मंदिरात व शाळेमध्ये

दिवस दुसरा – 23 जुलै 2022

नाष्टा – भट्टि अथवा / मोहरी

दुपारचे जेवण – भाजी भाकरी किवा डाळ भात व स्वत:ची शिदोरी

रात्रीचे जेवण – वारंगी

मुक्काम – वारंगी येथील समाजमंदिर व शाळेमध्ये

दिवस तिसरा – 24 जुलै 2022

नाष्टा – वारंगी

दुपारचे जेवण – रायगडवाडी

24 जुलै 2022 रोजी सायंकाळी परतीचा प्रवास.

नियम व अटी :

1. जे सह्याद्रीभटके ह्या भटकंतीमोहिमेत सहभागी होतील त्यांनी अवघडतम व काठिण्यतम घाटवाटा नाळीवाटा पार करण्याची परिसीमा गाठायची जिद्द ठेवायला हवी .

2. हि भटकंतीमोहिम नाठाळ व अगदीच नवख्यांनी निषिध्द मानावी.

3. कुठल्याही प्रकारचे आजार वा शारीरिक व्यंग असलेल्या व आपल्या शारीरिक क्षमतांचा नीटसा अजमास नसलेल्या व्यक्तीनी या मोहिमेत येण्याची तसदी घेऊ नये हि विनंती .

4. सिंहगड ते रायगड या पदभ्रमंती मोहिमेत दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार रहावे. कुठलीही हुल्लडबाजी व दंगामस्ती वा सह्याद्रीशी गैरवर्तन आपणांकडुन होणार नाही याची काळजी घ्यावी.
शिलेदार परिवाराची मोहिम आहे तेव्हा आपण स्वतःची व त्याच्याही आगोदर ईतर भावंडाची काळजी घ्यावी .

5. प्रंचढ शारीरिक व मानसिक कष्ट झेलत सह्याद्रीचा ऊन वारा पाऊस व भंडारासम चिखलमाती अंगावर लेऊन घेण्याची तयारी असावी .

● महत्वाच्या सुचना –

1. प्रत्येकाने दिलेल्या वेळेचे नियमांचे व सुचनांचे महत्व काटेकोर पणे पाळावे.

2. हा मौजमजेसाठी काढलेला ट्रेक नसून एका जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक मार्गावर पुन्हा मार्गक्रमण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे त्याचे भान ठेवावे आपल्याकडून गलिच्छ भाषा , असभ्य वर्तन , कुठल्याही प्रकारचे व्यसनयुक्त पदार्थांचे सेवन पुर्णतः टाळावे.

3. भंटकतीमोहिमेत सामील होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यांकडून शिस्तीची अपेक्षा आहे. एक संघभावनेच्या धोरणातुन सर्वांना समावुन घेत एकजुटीने एकाच गटात चालावे . समुह सोडुन ईतस्थतः भटकु नये.

4. आयोजक मंडळींवर सर्व सहकारीवर्गाची व मोहिमेची जबाबदारी असल्याने आपणांकडुन सहकार्य अपेक्षित आहे.

5. स्वतःची शारीरिक क्षमता, योग्यता याची खात्री करूनच मग मोहिमेत सहभागी व्हावे.

6. मोहिमेमध्ये येताना किमती वस्तू आपआपल्या जबाबदारीवर आणाव्यात ऊदा. कॅमेरा मोबाईल ई.
सर्वांनी मोठी रोख रक्कम , दागिने वा ईतर किमंती वस्तू कटाक्षाने आणण्याचे टाळावे.
काहीही गैरप्रकार झाल्यास आयोजकांना जबाबदार धरू नये हि विनंती .

7. मोहिमेकाळात मोहीम आयोजकांनी घेतलेला निर्णय हाच अंतिम निर्णय असेल त्यावर कोणीही कसलाही वाद घालू नये.

8. वेळेनुसार नियोजनात योग्य ते बदल केले जातील त्यात कोणताही आक्षेप नसावा.

9. हि लांब पल्ल्याची म्हणजेच रेंज ट्रेक असल्याने कमी वेऴेत जास्त आंतर पार करत आपली शारीरिक क्षमता पाहत मोहिम करायची आहे, यामध्ये तुम्हाला सर्व किल्ले पुर्ण पाहता येणार नाहित.

10. जे सदस्य आधी शुल्क भरुन नाव निश्चित करतील त्याचीच नावे मोहिमेसाठी असतिल. मोहिमेचे पुढिल आठवडाभर आपण नियोजन व अभ्यास करणार आहोत.

मोहिम शुल्क –

2999/- मुबंई ते मुबंई

2749/- पुणे ते पुणे

1999/- विना प्रवास खर्च

(Group Discount Available)

(ज्याना फक्त रायगड वरुन परतीचा प्रवास हवा आहे त्याची सोय केली जाईल.)

Payment Details –

Shiledar Adventure India

HDFC Bank, Kamothe, Panvel

Current Account –

A/c No. – 50200044689652

IFSC Code – HDFC0003997

Google Pay/Phone Pay – 9022556690

● संपर्क क्रमांक –

9022556690 / 9004615001 / 9004615001

धन्यवाद.

आयोजक :
शिलेदार परिवार

https://www.facebook.com/events/542611634177927/

Details

Start:
July 21, 2022 @ 9:30 pm
End:
July 24, 2022 @ 9:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/542611634177927/

Venue

Sahyadri Mountain Range