36 वा पुणे भटकंती कट्टा –
फेब्रुवारी 2023
मित्रांनो,
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलेली कित्येक वेडी लोकं आपण बघत असतो. कधी त्यांना इतिहासाने झपाटलेलं असतं तर कधी साहसाने. कधी निसर्गाने पिसं लावलेलं असतं तर कधी एखाद्या विषयाने !!
पण आपल्या घरापासून तब्बल 350 किमी लांब असणाऱ्या एखाद्या अतिशय दुर्गम प्रदेशाने आणि त्यातही एखाद्या किल्ल्याने पूर्णपणे पछाडून टाकलेला कोणी वल्ली बघितलाय ??
एक नाही,दोन नाही, तीन नाही तर तब्बल 70 पेक्षा जास्त वेळा महाराष्ट्रातल्या सर्वोच्च किल्ल्याला म्हणजेच साल्हेरला भेट देणारा,अभ्यासणारा आणि त्याचे एक अन एक अंतरंग स्वतःच्या आयुष्यात अक्षरशः एकरूप करणारा एक जातिवंत भटका असा एक विषय घेऊन फेब्रुवारीचा आपला पुणे भटकंती कट्टा गाजवणार आहे की जो समर्पित आहे Exclusively महाराष्ट्राच्या ह्याच दुर्गसम्राटाला म्हणजेच किल्ले साल्हेरला !!
आजपर्यंत अत्यंत अल्पपरिचीत आणि आपल्या नजरेपल्याड असलेल्या फक्त साल्हेर किल्ल्यावरच्याच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या विस्तीर्ण बागलाण प्रदेशातल्या अश्या काही गोष्टी ऐकायला मिळणार आहेत ज्या ऐकून अक्षरशः थक्क व्हायला होईल !!
तुम्हाला माहित आहे ??
– हाळसमुखाची वाट, तोरणधुरा, हाथीडोम ह्या वाटांनी तुम्ही कधी साल्हेर सर केलाय ??
– भगवान शंकराची झोपलेली मूर्ती नक्की कुठे आहे ??
– प्रति तैलबैला असावा असा भास करून देणाऱ्या नैसर्गिक कातळभिंती साल्हेर परिसरात कधी पाहिल्या आहेत ??
– झाडांना फळं येतात हे सत्य आहे पण २-३ मिनिटांत चक्क दही तयार करणारी वनस्पती आहे तरी कोणती ??
– हनुमानाला बाण लागून तो जिथे उलटा पडला अशी आख्यायिका असणारी जागा साल्हेरजवळ नक्की कुठे आहे ??
– निळवा,कलुऱ्या,बहिरम घोडा,दिर भावजय ही नावं बागलाणातल्या डोंगरांना पडली तरी कशी ??
– कधीही न पाहिलेलं श्रीकृष्णाचं शिल्प साल्हेर किल्ल्याच्या कोणत्या भागात आहे ??
उत्सुकता ताणली गेली ना ??
तेव्हा भेटूया शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या लाडक्या पुणे भटकंती कट्ट्यावर !!
कट्टा हाऊसफुल्ल होणारच आहे. आपल्याला करायचाच आहे आणि हा कट्टा तर गाजणार आहेच तेव्हा वेळेपूर्वी 10 मिनिटं येऊन आपली जागा पकडून ठेवा.
कट्ट्याचे डिटेल्स खालीलप्रमाणे :
36 वा पुणे भटकंती कट्टा
विषय : साल्हेरच्या मुलुखात !!
वक्ता : स्वप्नील खोत
गिर्यारोहक
दिनांक: शनिवार, दि. 11 फेब्रुवारी 2023
वेळ: सायंकाळी 6 वाजता
ठिकाण: इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पुलाजवळ, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क समोर,राजेंद्रनगर,पुणे 30
प्रवेश : अर्थातच विनामूल्य
पोस्टर डिझाईन : देवा घाणेकर
#पुणेभटकंतीकट्टा
#यावंचलागतंय
https://www.facebook.com/events/494001149477367/