सफर ‘वसई’ किल्ल्याची..
‘वसई’ म्हटल्यावर पटकन काही सुचत असेल तर ते म्हणजे ‘वसईचा किल्ला’. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या, निसर्गसंपन्न अश्या वसईतला हा किल्ला केवळ इतिहासप्रेमींनाच नाही तर पर्यटक, फोटोग्राफर्स, चित्रकार, ब्लॉगर्स सर्वांनाच भुरळ घालतो. किल्ल्याची भक्कम तटबंदी, दिमाखात उभे असलेले भरभक्कम बुरूज, महादरवाजे, पेशवेकालीन देवळं आजही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. इथल्या पोर्तुगीजकालिन वास्तू, शिळा, मुर्त्या, शिलालेख एवढचं नव्हे तर या मातीतला प्रत्येक धुलिकण एक रक्तरंजित इतिहास सांगतो; फक्त त्यांची भाषा समजायला हवी. नाहीतर ती भाषा समजावून देणारा, इतिहासाशी प्रामाणिक असणारा दुर्गतज्ञ हवा. म्हणूनच ‘लोपामुद्रा’ व ‘भोवरा’ संयुक्तपणे आयोजित करत आहेत ‘वसईच्या किल्ल्याची ऐतिहासिक सफर’ इतिहास संशोधक डॉ. श्रीदत्त नंदकुमार राऊत यांच्यासोबत. तेव्हा सहभाग घ्या आणि इतिहासातील एका सुवर्णपर्वाचे साक्षीदार व्हा.
कधी व कुठे :
शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२, वसई किल्ला.
सर्वसाधारण नियोजन :
– स. ८.०० वसई स्थानक
– स. ८:३० वसईचा किल्ला
– स. ९.०० वाजेपर्यंत चहा/नाश्ता
– स. ९ ते दु. १२.०० दुर्गसफर व माहिती
– दु. १२.०० ते दु. १.३० जेवण व विश्रांती
– दु. १.३० ते दु. ४.३० दुर्गसफर व माहिती
– सायं. ५.०० वाजेपर्यंत चहा
– सायं. ५.३० कार्यक्रमाची सांगता
वैशिष्ट्ये :
सफर: किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू, पुरातन मंदिरे व चर्चेस,
(शक्य झाल्यास भुयारी मार्ग व रणभुमी)
माहिती: दुर्गबांधणी व किल्ल्याचा इतिहास, किल्ल्याचे भा़ैगोलिक व ऐतिहासीक महत्व, वसईची मोहीम, मराठा-पोर्तुगीज युद्ध इत्यादी.
किंमत: रु. ८०० मात्र
(ज्यामध्ये किल्ल्याची सफर व माहिती, सकाळचा चहा/ नाश्ता, दुपारचे जेवण (व्हेज) व संध्याकाळचा चहा इत्यादी समाविष्ट असेल)
कसे पोहोचाल :
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकात उतरून पश्चिमेस असलेल्या स्टेशनलगतच्या बस थांब्याहून किल्ल्याकडे येण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेस सुटतात त्या थेट किल्ल्याजवळच सोडतात. (शिवाय प्रायव्हेट रिक्षा/ओला-उबर देखील मिळू शकतात. शेअर रिक्षा अर्ध्या रस्त्यापर्यंतच सोडतात.)
काय आणाल :
– प्रत्येकी एक लीटर पाणी
– फुल प्यांट-फुल टिशर्ट, टोपी, सनग्लासेस
– गरजेनुसार आ़ैषधे, ग्लुकोज इत्यादी
सहभागी होण्यासाठी संपर्क साधा :
भास्कर मानोजी +91 76780 99878
सूचना :
१. नियोजन तासभर पुढे मागे होऊ शकेल. त्यातील सर्व प्रकारच्या बदलांचे सर्वाअधिकार आयोजकांकडेच रहातील.
२. वर नमूद न केलेल्या कोणत्याही गोष्टी सफर फी मध्ये समाविष्ट नसतील.
३. सफरीदरम्यान धुम्रपान तथा मद्यपान निषिद्ध असल्याने कोणीही व्यक्ती असे गैरप्रकार करताना आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.
४. सदर सफर ही पर्यावरणपूरक असल्याने प्रत्येकाने प्लास्टिक तथा इतर कचऱ्याची योग्य ती सोय लावावी.
– लोपामुद्रा
कला I साहित्य I मनोरंजन
https://www.facebook.com/events/700155084878446/