Loading Events

« All Events

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “सागरी किल्ले सिंधुदुर्ग मोहीम”

April 25 @ 8:30 pmApril 27 @ 5:00 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “सागरी किल्ले सिंधुदुर्ग मोहीम”
तालुका : देवगड – मालवण, जिल्हा : सिंधुदुर्ग
श्रेणी : सोपी
दिनांक : २५ ते २७ एप्रिल २०२५

मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावरील खडक, मोक्याची जागा व गोड्या पाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली; “या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौर्‍याऎंशी बंदरी ऐशी जागा नाही” आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्‍याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.

कार्यक्रमाचा तपशील :-
पहिला दिवस – २५ एप्रिल २०२५
सकाळी कणकवली स्टेशनवर आगमन. फ्रेश होऊन नाश्ता करून विजयदुर्ग किल्याकडे प्रस्थान. विजयदुर्ग किल्ला पाहणी केल्यानंतर देवगड किल्ल्याला भेट आणि दुपारचे जेवण. रामगड किल्ल्याची सफर. पाणखोल जुवा बेटावर रात्रीचे जेवण आणि मुक्काम.

दुसरा दिवस – २६ एप्रिल २०२५
कांदळवन सफारीचा अनुभव. भरतगड आणि भगवानगड किल्ल्यांना भेट. दुपारचे जेवण बांदिवडे येथे होईल. संध्याकाळी मालवणला पोहोचून रात्रीचे जेवण आणि मुक्काम.

तिसरा दिवस – २७ एप्रिल २०२५
सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्यता अनुभवणे. निवती किल्ला पाहणी. मालवणी पद्धतीचे दुपारचे जेवण. संध्याकाळी ५ च्या सुमारास कुडाळ स्टेशनकडे प्रस्थान.

इच्छुक सदस्यांनी मुबंई वरून जाताना मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस (२०१११) किंवा मंगळूरू एक्सप्रेस (१२१३३) आणि कुडाळ वरून येताना सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस (११००४) किंवा मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस (२०११२) यापैकी गाड्यांचे आगाऊ आरक्षण स्वतः करणे आणि मोहीम प्रमुख किंवा मोहीम कार्यवाह यांना कळविणे. इच्छुक सदस्यांनी २५ एप्रिल २०२५ ला सकाळी ७:०० पर्यंत कणकवली स्थानकात जमणे बंधनकारक असेल.

ट्रेक फी : रु. ३,९५०/- (रुपये तीन हजार नऊशे पन्नास फक्त) प्रति व्यक्ती (कणकवली ते कुडाळ प्रवास, रहाणे, चहा, नाश्ता, जेवण अंतर्भुत)
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. ३,८५०/- (रुपये तीन हजार आठशे पन्नास फक्त) प्रति व्यक्ती असेल.
(“आजीव सदस्य ओळखपत्र” मोहिमेत बाळगणे बंधनकारक, ओळखपत्र असेल तरच सवलत मिळेल).
मोहिमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२५ असेल.

आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक. सामान कमीत कमी आणावे.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, गरज असल्यास चालताना काठी, रेनकोट, जरुरी पुरते कपडे, टूथब्रश, टूथ पेस्ट, साबण, टॉवेल.
३) २ लिटर पाणी, स्वतः पुरता सुका खाऊ.
४) अंथरुण, पांघरुण, टोपी, टॉर्च, कॅमेरा.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून अवकाळी आलेल्या पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखांचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास १० एप्रिल २०२५ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. १० एप्रिल २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.

वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – गुरुनाथ मयेकर / ९८६९० ८४९१२
==================================
मोहीम कार्यवाह – अजित नर / ९८१९५ ६६१२०

नाव नोंदणी झाल्यावर “सागरी किल्ले सिंधुदुर्ग सफर” या WhatsApp ग्रुपमध्ये ट्समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

Details

Start:
April 25 @ 8:30 pm
End:
April 27 @ 5:00 pm
Event Category:
Website:
https://www.facebook.com/events/978690730789242/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग + Google Map