शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
रडतोंडी घाट – पार घाट – प्रतापगड – मधुमकरंदगड
मोहीम क्रमांक १४८
श्रेणी : सोपी ते मध्यम
जिल्हा : सातारा, डोंगररांग : महाबळेश्वर
दिनांक : २५ आणि २६ जानेवारी २०२५
मोहीम प्रमुख- हार्दिक म्हात्रे
मोहीम कार्यवाह – नम्रता सावंत
अफजलखान वध हे शिवचरित्रातील एक महत्वाचं आणि रोमहर्षक प्रकरण आहे. जावळीच्या घनदाट खोऱ्याच्या नैसर्गिक अन् भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर वापर करून महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याची ही रणभूमी गाजवली.
या हातघाईच्या लढाईमधील बराचसा भूगोल हा प्रतापगड, पारघाट आणि रडतोंडीचा घाट या तीन जागांभोवती गुंफलेला आहे. शिवशौर्यच्या या मोहिमेत आपण या तीनही स्थळांची भटकंती करणार आहोत.
महाबळेश्र्वरमधील मुंबई पॉइंटवरून सूर्यास्त पाहताना सूर्य घोड्याच्या पाठीवरील खोगिरीसारख्या दिसणाऱ्या डोंगरामागे गुडूप होतो. हा डोंगर म्हणजेच मधुमकरंदगड. यातील पूर्वेकडील शिखरावर मकरंदगड आणि पश्चिमेकडील शिखरावर मधुगड आहे.
कार्यक्रमाचा तपशील:-
शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी रात्री खाजगी बसने प्रभादेवी, मुंबईहून प्रस्थान.
शनिवार दि. २५ जानेवारी २०२५, सकाळी मेटतळे गावात आगमन. फ्रेश होऊन रडतोंडी घाट उतरून पार गावात उतराई. नाश्ता करून पार गावातील शिवकालीन पूल पाहून पार घाटाने गड चढाईस सुरुवात. दुपारपर्यंत प्रतापगडावर दाखल. गडदर्शन करून दुपारचे जेवण. बसने चतुर्बेट गावाकडे प्रस्थान. सर्व सामान घेऊन पुढे दीड – दोन तासांच्या चालीने गडपायथ्याच्या घोणसपूर गावात आगमन. गावात रात्रीचा मुक्काम.
रविवार दि. २६ जानेवारी २०२५, सकाळी नाश्ता करून मकरंदगड चढाई, गडदर्शन व ध्वजवंदन करून खाली गावात उतरण्यास सुरुवात. परतीच्या प्रवासाला सुरुवात. वाटेत दुपारचे भोजन.
ट्रेक फी १,७५०/- रुपये
मुंबई ते मुंबई असा प्रवास, दोन नाश्ता, तीन जेवणे, रात्रीचा मुक्काम आणि मार्गदर्शक या सर्वाचा खर्च अंतर्भूत.
मोहिमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.
आजीव सभासदांना ट्रेक फी १,६५०/- रुपये असेल.
नाव नोंदणीची शेवटची तारीख २० जानेवारी २०२५ असेल त्या नंतर जागा शिल्लक असल्यास ट्रेक मध्ये घेतले जाईल.
ट्रेकसाठी अत्यावश्यक साहित्य :-
१) स्वतः पुरता नाश्ता व जेवण सोबत घेता येऊ शकेल असे २ रिकामी डबे.
२) शनिवारी रात्री मुक्कामासाठी लागणारे अंथरूण व पांघरूण. तसेच थंडीसाठीचे कपडे. फार थंडी असल्याने प्रत्येकाने आपल्यापुरता हे सोबत आणणे अत्यावश्यक.
इतर महत्वाचे साहित्य :
३)दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ सॅक. सामान कमीत कमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
४) चांगल्या प्रतीचे बूट किंवा चप्पल/फ्लोटर्स, जरुरी पुरते कपडे.
५) पाण्याची २ लिटर बाटली.
६) स्वतः पुरता सुका खाऊ.
७) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल, जन्मदिनांक आणि स्वतःचा फोटो हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७ अथवा नम्रता सावंत / ९६१९७४५९७५ यांना WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘अत्यावश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास २० जानेवारी २०२५ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २० जानेवारी २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
ट्रेक फी भरल्याच्या क्रमानुसार बसमध्ये पुढून मागे अशा क्रमाने जागा दिली जाईल.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) चालण्याची सवय असणाऱ्यांनीच नाव नोंदणी करावी.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७
=======================================
मोहीम कार्यवाह – नम्रता सावंत / ९६१९७४५९७५
नाव नोंदणी झाल्यावर ‘भटकंती जावळीची’ या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०
Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शुल्क प्राप्त झाल्याचे लगेचच कळवले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/…
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers