Loading Events

« All Events

  • This event has passed.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले वासोटा आणि स्वयंभू नागेश्वर देवस्थान”

December 14, 2024 @ 8:00 am7:00 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले वासोटा आणि स्वयंभू नागेश्वर देवस्थान”
गाव – बामणोली व चोरवणे
तालुका – जावळी व खेड
जिल्हा – सातारा व रत्नागिरी
श्रेणी – मध्यम ते कठीण
दिनांक – १४ डिसेंबर २०२४
मोहीम प्रमुख – गायत्री म्हात्रे
/ ७२०८५३४८१७
मोहीम कार्यवाह – विजय हरचंदे
/ ७७३८२६५८८९

निसर्ग संपन्न वातावरणात पसरलेला आणि थरारक असा भौगोलिक रचना प्राप्त झालेला जावळीच्या जंगलातील कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला एक वनदुर्ग म्हणजे “वासोटा किल्ला”. या वासोटा किल्ल्याची भ्रमंती करताना न चुकवता पहावे असे ठिकाण म्हणजे “स्वयंभू नागेश्वर देवस्थान”. जिथे बाराही महिने शिवलिंगावर डोंगराच्या भेगेतून/चीरेतून पाण्याच्या थेंबाचा अभिषेक होत असतो. अशी या देवस्थानाची खासियत आहे.
चला तर मग मोहीम आखूया या ऐतिहासिक वैभव संपन्न लाभलेल्या वनदुर्गाची आणि वैशिष्ट्यपूर्ण अश्या नागेश्वराची.

कार्यक्रमाचा तपशील :-
शुक्रवारी १३ डिसेंबर २०२४ रोजी प्रभादेवी / परळ पश्चिमेकडून (एल्फिस्टन flyover) येथून रात्रौ ९ वाजता खाजगी बसने बामणोली गावाकडे मार्गस्थ.
शनिवार १४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी बामणोली गावात आगमन, सकाळचे विधी आटपून तयार होणे. चहा-नाश्ता, उपस्थितांची ओळख करून साधारण ८:०० वाजता बोटीने वासोटा किल्ल्याकडे मार्गस्थ होणे, दुर्ग भ्रमंती करून दुपारचे जेवण गडावरच करून नागेश्वर गुहेकडे प्रस्थान करणे. साधारण ३ वाजे पर्यंत गुहेत पोहोचून नागेश्वराचे दर्शन घेऊन पलीकडे कोकणात चोरवणे गावात उतरणे. गावात आगमन झाल्यावर थोड्या विश्रांतीनंतर रात्रीचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना.

ट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये २,४००/- (रुपये दोन हजार चारशे फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, चहा-नाश्ता, जेवण अंतर्भूत).

मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये २,३००/- (रुपये दोन हजार तीनशे फक्त) असेल.
नाव नोंदणीची अंतिम तारीख ०८ डिसेंबर २०२४ असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर जरुरी पुरते सामान नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी. थंडीची शक्यता असल्याने उबदार कपडे.
२) वन्य प्राण्यांचा वावर असल्याने परफ्यूम, बॉडी स्प्रे, भडक रंगाचे कपडे टाळावेत.
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, जरुरी पुरते कपडे आणि हेड टॉर्च compulsory.
४) पॅक लंच साठी डबे, ताट, वाटी, चमचा.
५) पाण्याची २-३ लिटर बाटली अति आवश्यक.
६) स्वतः पुरता सुका खाऊ.
७) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अतिआवश्यक.
८) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे व्यवस्थित राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल आणि जन्मदिनांक (विजय हरचंदे) ७७३८२६५८८९ किंवा (गायत्री म्हात्रे) ७२०८५३४८१७ या क्रमांकावर WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास ०८ डिसेंबर २०२४ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. ०८ डिसेंबर २०२४ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.

वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – गायत्री म्हात्रे
/ ७२०८५३४८१७
==============================
मोहीम कार्यवाह – विजय हरचंदे
/ ७७३८२६५८८९

नाव नोंदणी झाल्यावर “वासोटा-नागेश्वर मोहीम” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट : http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम : shivashourya_trekkers

शिवशौर्य ट्रेकर्सच्या आगामी मोहिमांच्या माहितीकरिता Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.

📍Join us WhatsApp Group:-
https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0

Details

Date:
December 14, 2024
Time:
8:00 am – 7:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/1273112557153546/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

बामणोली
बामणोली + Google Map