Loading Events

« All Events

  • This event has passed.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीम

November 22, 2024 @ 5:30 am8:30 am

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीम
गाव : साम्रद आणि पाचनई, जिल्हा – अहमदनगर
श्रेणी – सोपी ते मध्यम
दिनांक – २२ ते २४ नोव्हेंबर २०२४
मोहीम प्रमुख – भूषण कुलकर्णी
मोहीम कार्यवाह – महेश म्हात्रे

रतनगड हा महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून १९७ किमी तर पुण्यापासून १८३ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. नाशिक जिल्ह्यात घनचक्कर रांगेत, प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला हा किल्ला आहे. भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदर्‍याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरन्य परिसर आहे. किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत.

एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु त्याच प्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे (आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील) होते. इंग्रजांनी १८१८ मध्ये हा किल्ला जिंकला. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.

तर अश्या या दोन ऐतिहासिक किल्ल्यांच्या मधील अंतर चालताना निसर्गाचे विविध रूप बघायला मिळतात तसेच घाट-वाटा देखील बघायला मिळतात तर चला असा हा ऐतिहासिक रेंज ट्रेक करूया.

कार्यक्रमाचा तपशील:-
गुरुवार दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कसाराकडे ट्रेनने प्रवास. कसारा येथून खाजगी गाडीने साम्रद गावात येऊन थोडी विश्रांती.

शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सुर्योदयापूर्वी ट्रेकला सुरुवात. रतनगडावर न्याहरी करून गड उतरायला सुरुवात करणे. गड उतरून थोडे अंतर चालून नदी-ओढ्याच्या जवळ जेवण. हरिश्चंद्रगडाच्या दिशेने वाटचाल करत नदी काठीच मुक्काम.

शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सूर्योदयाच्या आधी नाश्ता करून हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पोहचून बैल घाटाच्या मार्गे गड चढण्यास सुरुवात. कोकण कड्यावर आगमन व दुपारचे जेवण. मंदिर दर्शन अणि बालेकिल्ला दर्शन करून रात्रीचे जेवण तसेच तिथेच मुक्काम.

रविवार दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी उठून न्याहरी करून ताराबाई शिखर चढण्यास सुरुवात. शिखर उतरून लगेचच कोकण कड्यावरून हरिश्चंद्र गडाच्या पायथ्यापाशी पाचनई मार्गे उतरण्यास सुरुवात. गड उतरल्यावर जेवण व ट्रेक चा समारोप करून कसारा रेल्वे स्थानकाच्या दिशेने खाजगी गाडीने प्रस्थान.

ट्रेक फी २,७००/- (रुपये दोन हजार सातशे फक्त)
दोन नाश्ता, पाच जेवण, कसारा रेल्वे स्थानक ते साम्रद तसेच पाचनई ते कसारा स्थानक असा प्रवास, मार्गदर्शक आणि तंबू या सर्वाचा खर्च अंतर्भूत).

मोहिमेत सदस्य संख्या ३० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.
आजीव सभासदांना ट्रेक फी २,६०० रुपये असेल ((रुपये दोन हजार सातशे फक्त).
नाव नोंदणीची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२४ असेल, त्यानंतर जागा शिल्लक असल्यास ट्रेक मध्ये घेतले जाईल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) २२ नोव्हेंबर २०२४ रोजीचा सकाळचा नाष्टा स्वत: घेवून येणे.
२) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ सॅक. सामान कमीत कमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी आणि नीकॅप.
३) चांगल्या प्रतीचे बूट किंवा चप्पल/फ्लोटर्स, रेनकोट/छत्री, जरुरी पुरते कपडे.
३) पाण्याची २ लिटर बाटली.
४) स्वतः पुरता सुका खाऊ.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल, जन्मदिनांक आणि स्वतःचा फोटो मोहीम प्रमुख श्री. भूषण कुलकर्णी ९८९२४५८९४९ किंवा मोहीम कार्यवाह श्री. महेश म्हात्रे ९८२०४७८३३० वर WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास १८ नोव्हेंबर २०२४ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. १८ नोव्हेंबर २०२४ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) चालण्याची सवय असणाऱ्यांनीच नाव नोंदणी करावी.

वरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – भूषण कुलकर्णी / ९८९२४ ५८९४९
===================================
मोहीम कार्यवाह – महेश म्हात्रे / ९८२०४ ७८३३०

नाव नोंदणी झाल्यावर “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीम या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

Details

Date:
November 22, 2024
Time:
5:30 am – 8:30 am
Website:
https://www.facebook.com/events/1130465958409248/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

साम्रद
साम्रद + Google Map