शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित कोळेश्वर पठार – रायरेश्वर – केंजळगड मोहीम २०२६
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
कोळेश्वर
पठार – रायरेश्वर – केंजळगड मोहीम २०२६
ता. वाई-भोर, जि. सातारा-पुणे
मोहीम क्रमांक – १७२
श्रेणी – मध्यम
दोन शंभू महादेवांची तीर्थे, आपल्या शिवशंभूने घेतलेली स्वराज्याची शपथ, माणसांच्या कोलाहलापासून untouched कोळेश्वरचे निसर्गरम्य पठार आणि घनदाट जंगल. आणि किल्ले केंजळगड असा हा अनोखा संगम. अशी या ट्रेकची ओळख आहे.
कार्यक्रम तपशील :-
शुक्रवार दि. २६-६-२०२६
रात्रौ ९ वाजता मुंबई येथून वाई कडे खाजगी बसने प्रस्थान.
शनिवार दि. २७-६-२०२६
सकाळी ७ वाजता वाई तालुक्यातील जोर गावात आगमन. फ्रेश होऊन, चहा-नाश्ता करून, कोळेश्वर पठाराची चढण चढून कोळेश्वरच्या पठारावर दुपारचे जेवण. कोळेश्वर पठाराचे जंगल उतरून जांभळी गावात आगमन. जांभळी गावातून रायरेश्वरच्या पायथ्या पर्यंत बसने प्रवास. रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी पोहचून ट्रेकला सुरुवात. ४५ मिनिटे शिडीवाट चढून पठारावर दिवसाच्या ट्रेकची समाप्ती आणि मुक्काम. चहापान आणि आराम. रात्री जेवण, गप्पा-टप्पा
रविवार २८-६-२०२६
फ्रेश होऊन, चहा-नाश्ता करून रायरेश्वर मंदिर दर्शन. रायरेश्वर पठारावर भटकंती. रायरेश्वर पठार उतरून बसने केंजळगडा कडे रवाना, केंजळगड दर्शन करून मुंबईकडे रवाना.
ट्रेक फी :-
संपूर्ण खर्च रु. २,०००/- (रुपये दोन हजार फक्त)
प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई पर्यंतचा बस प्रवास, शनिवार दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि शनिवार सायंकाळी चहा बिस्कीट, रविवार चहा-नाश्ता, दुपारचे जेवण अंतर्भूत).
फक्त शनिवार सकाळचा नाश्ता स्वतः आणणे.
आजीव सदस्यांना ट्रेक फि रु. १,९००/- इतकी असेल.
नोंदणीची अंतिम तारीख :-
गुरूवार, १८
जून
२०२६
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर नाश्ता, पाणी बाटली नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) मधमाशांचा वावर असल्याने परफ्यूम, बॉडी स्प्रे वापरू नये
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, रेनकोट, जरुरी पुरते कपडे.
४) पाण्याची १ लिटर बाटली.
५) स्वतः पुरता सुका खाऊ.
६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
७) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे पाऊस पाण्यात व्यवस्थित राहतील.
नियम :-
१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
२) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
५) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
६) ट्रेक करताना इतर सभासदांसोबत राहावे. आपला ग्रुप सोडून गडाच्या कड्यावर, आड वाटेला एकटे जाऊ नये. लघु शंका किंवा तत्सम महत्वाचे कारण असल्यास मोहीम प्रमुखांना सांगून जावे. एकटे कुठेही जाणे हे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
७) मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.*
८) अनुकूल परिस्थिती होते ती सहल असते आणि प्रतिकुल परिस्थितीत होतो त्याला ट्रेक म्हणतात. सदर मोहिम/ट्रेक केवळ मौज मजेसाठी आयोजित केलेली सहल नसून ट्रेकिंग संस्कृती रुजावी, वाढावी, गडकिल्यांचे महत्व, इतिहासाचे अवलोकन हा आमच्या आयोजनाचा हेतू आहे. त्यामुळे सहलीत मिळणारी Luxurious Treatment, सोई सुविधा या मोहिमेत मिळणार नाहीत. शहरी लोकांना उघड्यावर शौचास बसणे, पाणी पुरवून वापरणे, जेवणाची वेळ मागे पुढे होणे, खडबडीत जमिनीवर झोपणे याची सवय नसते. या अश्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेतलेत तर ट्रेक Enjoy कराल, अन्यथा पदरी निराशाच पडेल.
नाव नोंदणी प्रक्रिया :
१) नाव नोंदणी करण्या आधी मोहीम प्रमुखांशी 93241 85622 / 93207 55539 या क्रमांकावर मोहिमेत जागा आहे/नाही आणि ट्रेक बाबत विचारून घ्या.
नाव नोंदणीची अंतिम तारीख गुरूवार, १८
जून
२०२६ असेल किंवा ३५ सदस्य संख्या पूर्ण झाल्यास नोंदणी बंद करण्यात येईल व प्रतिक्षा यादी (waiting List) चालू होईल.
२) वर नमूद ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता “शिवशौर्य ट्रेकर्स – 9320755539 ” या क्रमांकावर WhatsApp करावी.
बँक तपशील :-
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
Account No – 60134804616
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
३) फी भरल्या नंतर सदर ट्रेकचा गूगल फॉर्म मोहीम प्रमुखांकडून मागून घ्यावा आणि इंग्रजी मध्ये भरुन पाठवावा.
4) इच्छुक सदस्यांना “कोळेश्वर – रायरेश्वर – केंजळगड मोहीम २०२६” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
5) अंतिम दिनांक उलटून गेल्या नंतर आणि जर ट्रेक मध्ये जागा शिल्लक असेल तर ट्रेक फी वाढीव रुपये १००/- अधिक भरावी लागेल.
नाव नोंदणी रद्द प्रक्रिया :
१) नाव रद्द करायचे झाल्यास गुरूवार, १८
जून
२०२६
पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल.
२) गुरूवार, १८
जून
२०२६
नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
३) तुम्हाला ट्रेकला येण्यासाठी अडचण असल्यास तुमच्या जागी अन्य दुसऱ्या व्यक्तीला ट्रेकला पाठवू शकता (ती व्यक्ती ट्रेक करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे)
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – ओम देवळेकर
/ 93241 85622
मोहीम कार्यवाह – अमित मेंगळे / 9320755539
=================
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
मुंबई – अजित नर / ९८१९५६६१२०
विरार – हार्दिक म्हात्रे / ९०४९० १३६७७
नवी मुंबई – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक : https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/…
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट : http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम : shivashourya_trekkers
शिवशौर्य ट्रेकर्सच्या आगामी मोहिमांच्या माहितीकरिता Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.
Join us Whatsapp Group :- https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0