मोफत ट्रेक
किल्ले सरसगड – बाल मोहीम २०२४
वयोमर्यादा वर्ष ५ ते १४ (इयत्ता १ ली ते १० वी)
दिनांक – १० नोव्हेंबर २०२४
सामाजिक बांधिलकी म्हणून शिवशौर्यने मोहिमांच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले. आताही हीच जाणीव कायम ठेवत लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून निःशुल्क बालमोहिम आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे रायगड जिल्ह्यातील “किल्ले सरसगड”.
रविवार दिनांक १० नोव्हेंबर
२०२४ रोजी वर्ष ५ ते १४ (इयत्ता १ ली ते १० वी) या वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत ट्रेक आयोजित केला आहे. मोहिमेत लहान मुलांची सदस्य संख्या फक्त ४० इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा तपशील :-
रविवार दि. १० नोव्हेंबर
२०२४ सकाळी ५.४५ वाजता प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेरून खाजगी बसने सरसगड किल्ल्याकडे रवाना.
सायंकाळी अंदाजे १० वाजता प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेर मोहिमेची सांगता होईल.
सकाळचा नाश्ता, १ लिटर पाण्याची बाटली, टोपी, सुका खाऊ (तेलकट नसलेला), बूट या सर्व वस्तू आणणे अत्यंत आवश्यक आहे, या सर्व वस्तू दोन्ही खांद्यावर घेता येईल अश्या बॅगेत भरून आणाव्या. दुपारचे जेवण आणि सायंकाळी सर्वांना चहा नाश्ता दिला जाईल.
पालकांचा WhatsApp क्रमांक द्यावा.
विशेष सूचना :-
जर काही कारणास्तव नाव नोंदणी करून आपल्या मुलांना पाठविणे शक्य नसल्यास त्याची त्वरित पूर्व कल्पना आम्हाला द्यावी. जेणे करून इतर मुलांना या ट्रेकचा लाभ घेता येईल.
श्रीहान सावंत – ९६१९७ ४५९७५ (मोहीम प्रमुख)
तेजश्री खरपुडे – ९८९२१ ७०६०३ (मोहीम कार्यवाह)
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums