महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम “किल्ले कोथळीगड (पेठ)”
महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम “किल्ले कोथळीगड (पेठ)”
तालुका : कर्जत
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
उंची : ३१०० फूट
दिनांक : ८ मार्च २०२६
“किल्ले कोथळीगड (पेठ)” हा महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित “Ladies Special Trek”.
शिवशौर्य ट्रेकर्सने ६ वर्षांपूर्वी पहिली महिला मोहीम राबवली.
त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ही मोहीम सातत्याने दर वर्षी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक ऐतिहासिक वारशाशी अधिक जवळून नाते जोडण्याच्या उद्देशाने ह्या किल्ल्याची निवड करण्यात आली आहे. किल्ले कोथळीगड हा इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम असून महिला विशेष मोहिमेसाठी तो अत्यंत योग्य ठरतो.
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ किमी अंतरावर आहे. या किल्ल्याला पायथ्याच्या ’पेठ’ या गावामुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथळीगड (कोथळा) असाही आढळतो. लहानशा दिसणार्या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते.
कार्यक्रमाचा तपशील :-
७ मार्चला रात्रौ ११:०० वाजता बसने मुंबईहून कोथळीगडासाठी रवाना. ८ मार्चला रात्रौ २ वाजता आंबिवली मध्ये आगमन. थोड्याश्या विश्रांती नंतर आन्हिकं उरकून कोथळीगडाकडे प्रस्थान. वाटेत पेठ गावा मध्ये चहा नाश्ता घेऊन पुन्हा गड चढाई. पुढील चढाई करून गड माथ्यावर पोहोचणे. गड फिरून, उपस्थितांची ओळख करून गड उतरायी. नंतर खाली उतरुन जेवण आणि मग बसने मुंबईकडे रवाना.
ट्रेक फी :- संपूर्ण खर्च रुपये ५००/- (रुपये पाचशे फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, चहा-नाश्ता व दुपारचे जेवण अंतर्भूत).
१) वर नमूद ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता नम्रता सावंत ९६१९७४५९७५ या क्रमांकावर WhatsApp करावी. त्यानंतरच नावनोंदणी होईल व बसमधील सीट आरक्षित केली जाईल.
२) ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकासाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.
बँक तपशील :-
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
Account No – 60134804616
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
३) फी भरल्या नंतर सदर ट्रेकचा गूगल फॉर्म मोहीम प्रमुखांकडून मागून घ्यावा आणि भरुन पाठवावा.
मोहिमेत सदस्य संख्या ५० इतकीच असल्याने आपली नावे लवकरात लवकर नोंदविणे आणि आपल्या मैत्रिणींनाही पाचारण करणे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२६ असेल किंवा ५० सदस्य पूर्ण झाल्यास नोंदणी वेटिंग लिस्ट मध्ये करण्यात येईल.
नाव नोंदणी रद्द प्रक्रिया :
१) नाव रद्द करायचे झाल्यास शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल.
२) २८ फेब्रुवारी २०२६ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
३) तुम्हाला ट्रेकला येण्यासाठी अडचण असल्यास तुमच्या जागी अन्य दुसऱ्या व्यक्तीला ट्रेकला पाठवू शकता (ती व्यक्ती ट्रेक करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे). परंतु मोहीम प्रमुख किंवा कार्यवाह यांना कळविणे अतिमहत्वाचे आहे.
टीप – चालतांना काठी असणे फायद्याचे आहे.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. गरज असल्यास चालताना काठी, नी-कॅप घ्यावेत (परफ्यूम, बॉडी स्प्रे, भडक रंगाचे कपडे टाळावेत).
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, टोपी, गॉगल, एक्स्ट्रा चप्पल, जरुरी पुरते कपडे, साबण, टॉवेल, टॉर्च.
३) पाण्याची २ लिटर बाटली, स्वतः पुरता सुका खाऊ.
४) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
नियम :-
१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
२) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
५) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
६) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील.
वरील सहा नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – राज्ञी मेंगळे – ९००४० ५७७०७
मोहीम कार्यवाह – नम्रता सावंत / ९६१९७ ४५९७५
नाव नोंदणी झाल्यावर “कोथळीगड महिला विशेष ट्रेक” या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, सूचना आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
मुंबई – संघमित्रा मेंगळे / ९८१९६ ६२२५४
मुंबई – तेजश्री खरपुडे / ९८९२१ ७०६०३
मुंबई – आदिती कातकर / ९०८२३ ००९५४
जोगेश्वरी – गायत्री म्हात्रे / ७२०८५ ३४८१७
डोंबिवली – विशाखा चौधरी / ७५०६९ १७३२१
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट : http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम :
shivashourya_trekkers
शिवशौर्य ट्रेकर्सच्या आगामी मोहिमांच्या माहितीकरिता Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.
📍Join us WhatsApp Group :-
https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0