Loading Events

« All Events

  • This event has passed.

महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम “शिखर कळसुबाई”

March 4, 2023 @ 11:30 pmMarch 5, 2023 @ 3:30 pm

महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम “शिखर कळसुबाई”
गाव : बारी, तालुका : अकोले, जिल्हा : अहमदनगर
श्रेणी : मध्यम
उंची – ५४०० फूट
दिनांक : ५ मार्च २०२३

मागू नको आधार, शोध तुझं तु दार,
घालू नको तु साद कुणाला |
तुझ्या हाती रं दोर, जरा लागु दे जोर,
तुझा दिसु दे रंग जगाला ||

८ मार्च…जागतिक महिला दिवस…!!!

रोजच्या रामरगाडयातून थोडी उसंत घेऊन…जबाबदारीचे ओझे बाजूला ठेवून…स्त्री कर्तृत्वचा जागर करत…सर्वोच्च सह्य-शिखर गाठून…कळसुआईला वंदन करूया…आणि थोडं स्वतः साठी जगूया…चला सख्यांनो शिखर सर करूया…

२०२० पासून सुरू झालेल्या “महिला स्पेशल” ट्रेकच्या यशानंतर शिवशौर्य ट्रेकर्स पुन्हा वेगळी वाट चोखाळत घेऊन येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिखर कळसुबाई हा महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित “Ladies Special Trek”.

कार्यक्रमाचा तपशील :-
४ मार्चला रात्रौ ९ वाजता बसने कळसुबाईकडे रवाना. ५ मार्चला पहाटे ४ वाजता बारी गावात आगमन. आन्हिकं उरकुन कळसुबाई शिखराकडे प्रस्थान. ८ वाजता कळसूबाई मंदिराजवळ पोहोचणे. देवीची पुजा करुन नाश्ता करुन थोडा आराम करणे. नंतर खाली उतरुन गावात जेवण. बसने मुंबईकडे रवाना. अंदाजे र‍ात्रौ ९ वाजेपर्यंत मुंबईत परतणे.

ट्रेक फी :- ऐच्छिक. महिला दिनानिमित्त महिलांसाठी ट्रेक आहे, त्यामुळे ट्रेकची फी सुद्धा तिच्या इच्छेनेच !

मोहीमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे नोंदविणे.

नाव नोंदणीची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी २०२३ असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. गरज असल्यास चालताना काठी, नी -कॅप घ्यावेत.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, टोपी, गॉगल, एक्स्ट्रा चप्पल, जरुरी पुरते कपडे, साबण, टॉवेल.
३) पाण्याची २ लिटर बाटली, स्वतः पुरता सुका खाऊ.
४) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.

नियम :-
१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
२) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
५) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
६) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील.

वरील सहा नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – आदिती कातकर / ९०८२३ ००९५४
मोहीम कार्यवाह – नम्रता सावंत / ९६१९७ ४५९७५

नाव नोंदणी झाल्यावर “कळसुबाई महिला विशेष ट्रेक” या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, सूचना आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
मुंबई – संघमित्रा मेंगळे / ९८१९६ ६२२५४
मुंबई – तेजश्री खरपुडे / ९८९२१ ७०६०३
जोगेश्वरी – गायत्री म्हात्रे / ७२०८५ ३४८१७
डोंबिवली – विशाखा चौधरी / ७५०६९ १७३२१

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहिमांचे फोटो अल्बम पाहण्यासाठी लिंक :-
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट :-
http://www.shivashouryatrekkers.org

https://www.facebook.com/events/1388821535276960/

Details

Start:
March 4, 2023 @ 11:30 pm
End:
March 5, 2023 @ 3:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/1388821535276960/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

Akole अकोले
Akole अकोले + Google Map