ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन आयोजित प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियान भीमाशंकर वनविभागाच्या मदतीने येत्या रवीवारी 26 मे रोजी सकाळी ८ ते १२ वेळेत राबवत आहोत. यावेळी जंगलात पर्यटक, भाविक, ट्रेकर्स यांनी फेकलेले प्लॅस्टिक, चपला, बूट, कपडे इत्यादी कचरा गोळा करून जंगल कचरा मुक्त करणार आहोत. सह्याद्रीच्या घनदाट वने, ओढे, नद्या यांत असलेल्या कचऱ्यामुळे तेथील जैवविविधतेवर वन्य प्राणीजीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. याचे गांभीर्य ग्रीन आंब्रेला या मुंबईतील संस्थेने ओळखून गेली २ वर्षे महाराष्ट्रातील विविध जंगलांमध्ये प्लॅस्टिक, कचरामुक्त जंगल अभियान राबविले आहे. येत्या २६ मे रोजी होणाऱ्या अभियानात आपणही एक पर्यावरण प्रेमी नागरिक म्हणून सहभागी होऊ शकता.
भेटण्याचे ठिकाण भिमाशंकर मंदिर, वेळ सकाळी ८ वाजता
संपर्क विक्रम यंदे ९८३३९८८१६६, ९९२०१०४४४४
https://www.facebook.com/events/428916186559653/