Loading Events

« All Events

  • This event has passed.

ज्येष्ठ नागरिक मोहीम घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी)

October 27 @ 7:30 am10:30 am

 Save as PDF

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित – “ज्येष्ठ नागरिक मोहीम घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी)”
मोहीम क्रमांक – १४३
गाव – घारापुरी, जिल्हा – रायगड
श्रेणी : सोपी
दिनांक : २७ ऑक्टोबर २०२४

अवघ्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या एलिफंटा लेणी या महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर घारपुरी द्वीपावर आहेत याला घारापुरी लेणी म्हणून सुद्धा संबोधले जाते. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या गुफांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती आपल्याला पहायला मिळतात. भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि महत्वांच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या या भव्य लेण्या दोन वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या लेण्यांच्या एका भागात हिंदू धर्माशी जोडल्या गेलेल्या लेण्या असून अन्य भागात बौद्ध धर्माशी संबंधित लेण्या आढळतात. या घारापुरी लेण्यांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन १९८७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या लेण्यांची नोंद केली आहे.
एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३०० च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ह्या लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्याकाळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या, याला कुठेच तोड नाही. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादवनी मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले आणि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले. या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात.

कार्यक्रमाचा तपशील :-
रविवार २७ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७:३० वाजे पर्यंत गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचणे. नंतर बोटीने घारापुरी बेटाकडे प्रवास सुरू. सकाळचा नाश्ता बोटीत करणे (आपण सोबत आणलेला). अंदाजे ९:३०/१०वा. बेटावर पोहचल्यावर चहापान, नंतर अंदाजे १०० पायऱ्या चढुन दोन मोठ्या तोफा पाहून पुढे लेणी पाहायला सुरुवात. संबंधीत माहिती घेऊन छायाचित्रे काढून परत उतरण्यास सुरुवात. अंदाजे २ तासांनी ठरलेल्या ठिकाणी जेवण करून पायथ्याशी आगमन आणि बोटीने गेटवेच्या दिशेने रवाना.

ट्रेक फी : संपूर्ण खर्च रु. ७००/- (रुपये सातशे फक्त) प्रती व्यक्ती (गेटवे ते गेटवे प्रवास जेवण, १ चहा अंतर्भूत).
मोहिमेत सदस्य संख्या २५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. ६००/- असेल.

नाव नोंदणीची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२४ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास २१ ऑक्टोबर २०२४ नंतर ट्रेक फी : रु. ८००/- असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) स्वत:सकाळचा नाष्टा घेवून यावा.
२) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ छोटी सॅक. सामान कमीत कमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
३) चांगल्या प्रतीचे बूट किंवा चप्पल/फ्लोटर्स, रेनकोट/छत्री, जरुरी पुरते कपडे.
३) पाण्याची २ लिटर बाटली.
४) स्वतः पुरता सुका खाऊ.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल, जन्मदिनांक आणि स्वतःचा फोटो (प्रभाकर पाटील ९९७०६५१८२३ किंवा श्रीनिवास कऱ्हाडकर ९८२०३२४६४७ या क्रमांकावर ) WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास २१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २१ ऑक्टोबर २०२४ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) थोडीफार चालण्याची सवय असणाऱ्यांनीच नाव नोंदणी करावी.

वरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – प्रभाकर पाटील / ९९७०६ ५१८२३
=======================================
मोहीम कार्यवाह – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७

नाव नोंदणी झाल्यावर “ज्येष्ठ नागरिक मोहीम – घारापुरी लेणी ट्रेक २०२४” या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८२५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

Visited 1 times, 1 visit(s) today

Details

Date:
October 27
Time:
7:30 am – 10:30 am
Website:
https://www.facebook.com/events/1067026194802057/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

घारापुरी
घारापुरी + Google Map