गोप्याघाट वरंधघाट ट्रेक
*पुणे माऊंटेनियर्स सह्याद्री ट्रेक्स*
१/जानेवारी २०२६.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या वर्षीचा हा आपला पहिलाच ट्रेक.
यापूर्वी आपण गोप्याघाट पावसाळ्यात केला होता आणि शिवथर घळी मध्ये ट्रेक संपविला होता.
यावर्षी आपण शिवथर घळ येथे श्री दासबोध जन्मोत्सव बघणार आहोत.
शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी आपण पुण्यातून निघून केळद येथे जाणार आहोत.
बोपे गावातून आपण गोप्या घाट मार्गे शिवथर घळीमध्ये उतरणार आहोत.
शिवथर घळ येथे जेवण आणि रात्रीचा मुक्काम करून आपण दिनांक २४ जानेवारीचे कार्यक्रम आणि दिनांक २५ जानेवारी रोजीची काकड आरती करणार आहोत.
दिनांक २५ रोजी सकाळी चहा आणि नाश्ता करून आपण वरंध घाटातून परत पुण्याकडे येण्यासाठी निघणार आहोत.
वरंध घाटात आपण कावळा किल्ला, वाघजाई मंदिर नीरा नदीचे उगमस्थान तसेच वरंध घाटातील सृष्टी सौंदर्य पाहून दुपारी भोर जवळ जेवण करून सायंकाळ पर्यंत पुण्यात पोहोचणार आहोत.
वरंध घाट म्हणजे महाराष्ट्राची गोल्ड व्हॅली आहे.
एल थॉम्पसन ग्रेगरी पेक आणि ओमर शरीफ जर भारतात जन्माला आले असते तर त्यांनी मेकॅनाज गोल्डच्या शूटिंग साठी शंभर टक्के वरंध घाटाचीच साईट निवडली असती याची मला खात्री आहे.
महाराष्ट्राची कॉलोराडो व्हॅली असे त्या व्हॅलीला नांव दिले तरी अतिशयोक्ती होणार नाही, असे मला वाटते.
रायगडाच्या डोंगर रांगांमध्ये अतिशय निबीड ठिकाणी बसून समर्थांनी दासबोध लिहिला आहे.
पक्ष्यांच्या मधुर संगीता शिवाय
तसेच पाण्याच्या खळखळाटा व्यतिरिक्त तिथे फक्त आपल्या मनाचाच आवाज ऐकता येतो.
कावळा किल्ल्याचा डोंगर कापून काढून त्यामधून वरंध घाट काढलेला आहे, त्यामुळे कावळा किल्ला बघण्यासाठी आपल्याला दोन ठिकाणी जावे लागते.
एका बाजूला कावळा किल्ला आहे तर एका बाजूला पांडव कालीन पाण्याची टाकी आणि वाघजाई मंदिर आहे तसेच कावळ्याच्या आकाराचा बुरुजही तिथेच आहे.
निसर्ग अध्यात्म पर्यावरण याने ओत:प्रोत भरलेला हा ट्रेक आहे.
सर्वांनी २४ आणि २५ जानेवारीचे शनिवार आणि रविवार राखून ठेवावे ही नम्र विनंती.
या ट्रेकची ट्रेक फी आणि डिटेल शेड्युल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
पुणे माऊंटेनियर्स
सुधीर खेडकर
विनय भालेराव.