Loading Events

« All Events

  • This event has passed.

गडवाट शिवजयंती सोहळा २०२५

February 16 @ 8:00 am - 4:00 pm

गडवाट शिवजयंती उत्सव २०२५

यंदाची शिवजयंती
राजियांच्या राजमाचीवर…!

छत्रपती शिवराय म्हणजे आम्हा सर्वांची प्रेरणा. या प्रेरणेतूनच आपण सर्व समाजात वावरताना आपापल्या परीने चांगले, रयतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत असतो.

शिवजयंती तर आपला सण! शिवरायांची जयंती साजरी करतानाही आपण शिवविचार जोपासला पाहिजे. याच भावनेतून आपला गडवाट प्रवास सह्याद्रीचा परिवार समाजाभिमुख शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतो. गडवाट परिवाराने आजवर उपेक्षित, वंचित, समाजप्रवाहापासून दूर गेलेल्या अनाथ मुलांसमवेत शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला. संस्थेने केलेले असे विविध उपक्रम अनेकांनी स्विकारले. अशा पद्धतीने महाराष्ट्रच नव्हे तर जगभर शिवजयंती साजरी होऊ लागली.

याच जाणीवेतून गडवाट परिवारावतीने यावर्षी (१६ फेब्रुवारी) मार्गदर्शक शिवराय हा मुख्य गाभा ठेवून शिवजयंती साजरी करण्याचा मानस आहे.

या उपक्रमात २ महिन्यापर्यंत महाराष्ट्रभरातील काही गरजू आणि दुर्गम भागातील शाळेतील आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना मोफत करियर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि करियर यासबंधी आवश्यक असलेले ज्ञान उपलब्ध होईल.

यावेळी आपण शिवजयंती जरी १६ तारखेला साजरी करणार असलो तरी यावेळचा उपक्रम हा २ महिने विविध शाळांमध्ये राबविणार आहोत. हा करियर मार्गदर्शनाचा उपक्रम आपल्या परिसरातील शाळेत राबवायचा असल्यास नक्की कळवा. शक्य होतील तितक्या शाळेत आपण हा उपक्रम राबवू.

तरी हा आगळीवेगळी शिवजयंतीचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊया.!

या वर्षी आपण किल्ल्यावर आपल्या सर्व गडवाटकरी सभासंदाच्या उपस्थितीत किल्ले राजमाची येथे शिवजयंती साजरी करणार आहोत आपण सर्वांनी सहकुटुंब या शिवजयंती मध्ये सहभागी होऊन आपल्या शिवजयंतीची शोभा वाढवावी 🙏

*शिवजयंतीची रूपरेषा*

* राजमाची गावातील महादेव मंदिर ते भैरोबा मंदिरा पर्यंत शिवरायांची पालखीतून मिरवणूक

* गडवाटकरी इतिहास अभ्यासक अजय दादा जाधवराव व हभप योगेश दादा नागरे यांचे व्याख्यान

* गडकिल्ले संवर्धन आणि रेस्क्यू क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांचे कौतुक

* किल्ले राजमाची गडभ्रमंती

* सस्नेह भोजन

* कार्यक्रमाची सांगता

सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ : राजमाची किल्ला पायथा, लोणावळा (पुणे)
तारीख : १६ फेब्रुवारी २०२५
वेळ : सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत

जय जिजाऊ जय शिवराय

#शिवजयंती_२०२५
#गडवाट_प्रवास_सह्याद्रीचा

Details

Date:
February 16
Time:
8:00 am - 4:00 pm
Event Category:
Website:
https://www.facebook.com/events/668599822340363/

Organizer

गडवाट – प्रवास सह्याद्रीचा
Email
noreply@facebookmail_com

Venue

Rajmachi Fort
RAJMACHI Fort
Pune, IN
+ Google Map