गडवाटची यंदाची शिवजयंती
ऐतिहासिक रणभूमीवर 🚩
आपल्याला महाराजांच्या लढाईचा इतिहास म्हंटले की आठवते ते फक्त अफझलखान वध, शाहिस्तेखानाची बोटे, पावनखिंड रणसंग्राम, उंबरखिंडीची लढाई..
पण या व्यतिरिक्त ही दुर्लक्षित राहिलेले एक लढाई आहे ज्यात महाराज स्वतः मैदानात हातात पट्टे घालून १० हजार फौजेनिशी लढले आहेत ती लढाई म्हणजे १७ ऑक्टोबर १६७० साली नाशिक जिल्ह्यातील कांचन मांचन किल्ल्याच्या पायथ्याशी कांचनबारीची लढाई 🚩
या लढाई चे वर्णन करताना सभासद म्हणतो की…..
“खासा राजा घोड्यावर बसून, बख्तर घुगी घालून, हाती पट्टे चढवून मालमत्ता घोडी, पाईंचे लोक पुढे रवाना करून आपण दाहा हजार स्वारानिशी सडे सडे राऊत उभे राहिले.”
शिवरायांनी स्वतः नेतृत्व केलेल्या निर्णायक लढायांपैकी ही अत्युच्च दर्जाची लढाई आहे.
तर मित्रांनो याच दुर्लक्षित लढाईचे स्मरण करण्यासाठी तसेच या लढाई ला उजाळा देण्यासाठी गडवाट संस्था यंदाची शिवजयंती कांचन व मांचन किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या कांचनबारी, कानमंडाळे या गावात करत आहेत 🙏
अवघे अवघे या 🚩
आयोजक
गडवाट प्रवास सह्याद्रीचा संस्था ( महाराष्ट्र )
समस्त गावकरी कानमंडाळे, कांचनबारी ( नाशिक )
https://www.facebook.com/events/722117732870147/