शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
किल्ले रामशेज – मार्कंड्या – सप्तशृंगी गड (वणी) मोहीम
तालुका : कळवण, जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
दिनांक : १० आणि ११ डिसेंबर २०२२
किल्ले रामशेज हा जसा प्रभू रामचंद्रांनी इथे विश्रांती घेतली म्हणून रामशेज नाव धारण करून प्रसिद्ध आहे तसेच हा किल्ला संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी मुघल सैन्याशी तब्बल साडे पाच वर्ष केलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे. त्या चिवट इतिहासाला नमन करूयात. सात चिरंजींवींपैकी एक असलेल्या मार्कंडेय ऋषींच्या तपस्येने पवित्र असलेला मार्कंड्या पर्वत आजही मार्कंडेय ऋषींच्या सहवासाची प्रचिती देतो. एका गूढ पौराणिक स्थळावर मुक्काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे. वणीच्या देवीला अर्थात सप्तशृंगी गडावर गाडी रस्त्याने न जाता मार्कंड्या पर्वताच्या धारेवरून ट्रेक करत जाणे म्हणजे साहसी पायपीट आहे. तर अश्या या ३ वेगळ्या स्थळ माहात्म्याने प्रसिद्ध असलेली मोहीम म्हणजे दुग्ध-शर्करा-केशर योग आहे.
कार्यक्रमाचा तपशील :-
शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ सकाळी ५ वाजता छ.शि.म.ट येथून सुटणारी कसारा ट्रेन मध्य रेल्वेच्या आपल्या जवळच्या स्थानकाहून पकडणे आणि शेवटच्या म्हणजेच कसारा स्थानकात जमणे. जीपने रामशेज किल्ल्याकडे प्रस्थान. किल्ल्याची चढाई साधारण ३० मिनिटांची आहे. किल्ला फिरून परत पायथ्याशी येऊन जीपने प्रवास सुरु. वाटेत दुपारचे जेवण करून मार्कंड्या पर्वताकडे प्रस्थान. सर्व सामानासहित मुक्कामासाठी मार्कंड्या पर्वत साधारण १ तास चढून एका आश्रमात मुक्काम. थोडी विश्रांती व चहा घेऊन १ तासाच्या चढाईनंतर गडाच्या शिखरावरील मार्कंडेय ऋषींचे मंदिर दर्शन. सूर्यास्ताच्या वेळेस आश्रमात परत येऊन विश्रांती. एकत्र जमून गप्पा टप्पा आणि रात्री ८ वाजता जेवण आणि दिवसाची समाप्ती.
रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ सकाळी ६ वाजता उठून आन्हिकं उरकून चहा नाश्ता आटपून डोंगर धारेवरूनच थोड्या दमछाक होणाऱ्या वाटेने सप्तशृंगी गडाकडे कूच. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेली गडावरील वणीची देवी, महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी आहे. देवीचे दर्शन आणि मंदिर प्रसादाचे भोजन करून आपल्या दोन दिवसीय मोहिमेची सांगता. जीपने कसाऱ्याच्या दिशेने रवाना.
ट्रेक फी : रु. १,५००/- (रुपये एक हजार पाचशे फक्त) प्रति व्यक्ती (कसारा ते कसारा प्रवास, रहाणे, चहा, नाश्ता, जेवण अंतर्भुत)
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. १,४००/- असेल.
(“आजीव सदस्य ओळखपत्र” मोहिमेत बाळगणे बंधनकारक, ओळखपत्र असेल तरच सवलत मिळेल).
मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. नाव नोंदणीची अंतिम तारीख ४ डिसेंबर २०२२ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास ४ डिसेंबर २०२२ नंतर ट्रेक फी : रु. १,६००/- असेल. तेही जागा उपलब्ध असल्यास नोंदणी होईल.
आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक. सामान कमीत कमी आणावे (प्रत्येकाने स्वतःची सॅक स्वतः घेऊनच मार्कंड्या आणि सप्तशृंगी गड सर करायचा आहे).
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, गरज असल्यास चालताना काठी, रेनकोट, जरुरी पुरते कपडे, टूथब्रश, टूथ पेस्ट, साबण, टॉवेल.
३) २ लिटर पाणी, स्वतः पुरता सुका खाऊ.
४) अंथरुण, पांघरुण, टॉर्च, कॅमेरा.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून अवकाळी आलेल्या पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.
नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखांचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास ४ डिसेंबर २०२२ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. ४ डिसेंबर २०२२ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – अमित मेंगळे / ९८६९१ ०९९७०
====================
मोहीम कार्यवाह – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
नाव नोंदणी झाल्यावर “रामशेज-मार्कंडेय-वणी मोहीम” या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या ७ दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्निल चव्हाण / ७७९८३ ९६६६४
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०
Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहिमांचे फोटो अल्बम पाहण्यासाठी लिंक :
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/…
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट :
http://www.shivashouryatrekkers.org
https://www.facebook.com/events/1129661887894831/