Loading Events

« All Events

  • This event has passed.

किल्ले पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक मोहिम

July 11, 2022 @ 7:00 am

3389 image 281404264 5645560592124097 5866000424443483116 n

Panhala to Pawankhind kolhapur july august 2024

 

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
“किल्ले पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक मोहिम”
तालुका : पन्हाळा आणि शाहूवाडी, जिल्हा : कोल्हापूर.
श्रेणी : मध्यम
एकूण अंतर : ६१ कि.मी.
दिनांक : ११ जुलै ते १४ जुलै २०२२

Historical walk between Fort Panhala to Fort Vishalgad via Pavankhind along with sight-seeing on Panhala with all the facts and a lecture on historical information by Historian Dr. Shridutta Raut.

पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड…नरवीर शिवा काशीद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा त्याग आणि बलिदान वाचून जितक समजल त्यापेक्षा अधिक समजण्यासाठी…..हा ऐतिहासिक ट्रेक करा.

२१ तास उपाशी पोटी धावावे आणि युद्ध करावे, कोणासाठी ? लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे म्हणून टोकाची स्वराज्य निष्ठा समजण्यासाठी…..हा ऐतिहासिक ट्रेक करा.

सलग चार दिवस शेताच्या बांधावरून, कधी कमरेइतक्या ओढ्यातून, कधी गुडघाभर चिखलातून ६१ किलोमीटर तंगडतोड करूनही ताजेतवाने कसं राहता येतं हे अनुभवण्यासाठी…..हा ऐतिहासिक ट्रेक करा.

आणि ज्यांच्या नुसत्या नावाने ऊर अभिमानाने भरून येतो, त्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटेवर चालायचे आहे म्हणून…..हा ऐतिहासिक ट्रेक कराच.

कार्यक्रमाचा तपशील :-
सोमवार दि. ११ जुलै २०२२ सकाळी ७ वा. पन्हाळगडावर आगमन आणि गडावरच मुक्काम. ईत्यंभूत माहितीसह पन्हाळगड दर्शन आणि पन्हाळगडाच्या शेजारी असलेल्या पावनगडाची सफर. सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जमलेल्या सर्व शिव प्रेमींची ओळख होऊन पन्हाळगड ते विशाळगडाच्या ऐतिहासिक रणसंग्रामाची पार्श्वभूमी इतिहास अभ्यासक श्री. श्रीदत्त राऊत कथन करतील. मोहिम कार्यवाह श्री. महेश म्हात्रे आणि मोहिम प्रमुख श्री. अमित मेंगळे दुसर्‍या दिवशी सुरु होणार्‍या ट्रेकची माहिती आणि सूचना देतील.

मंगळवार दि. १२ जुलै २०२२ सकाळी ७.३० वाजता पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नरवीर शिवा काशिद आणि गडावरील नरवीर बाजीप्रभू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेची सुरुवात होईल. आपल्या मोहिमेचे मार्गक्रमण त्याच मार्गावरून होइल ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज निसटले होते. शिवशौर्य ट्रेकर्स सोबत नरवीर बाजीप्रभू यांची सध्याची पिढी मोहिमेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सहभागी होईल. सायंकाळी ६ वाजता आपण माळेवाडी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर विश्रांती.

बुधवार दि. १३ जुलै २०२२ सकाळी ७ वाजता पुढील मुक्काम मालाईवाडा गावाच्या दिशेने ट्रेकला सुरुवात. दुपारी ३ वाजता मालाईवाडा येथे मुक्काम. तसेच श्रीदत्त राऊत यांच्याशी पावनखिंडीच्या इतिहासावर मुक्त चर्चा.
गुरुवार दि. १४ जुलै २०२२ सकाळी ७ वाजता पावनखिंडिकड़े प्रस्थान. रणक्षेत्रावर हौतात्म्य पत्करलेल्या बाजी आणि त्यांच्या शूर बांदलवीरांना श्रद्धांजली अर्पण. श्रीदत्त राऊत यांचे पावनखिंडीच्या इतिहासावर मार्गदर्शन. विशाळगडाकडे प्रस्थान. दुपारी विशाळगडावर मोहिमेची सांगता. आपापल्या मार्गाने परतीचा प्रवास सुरु.

ट्रेक फी : रु. १,५००/- (फक्त मोहिमेचा खर्च पन्हाळगड ते विशाळगड दरम्यान राहणे, चहा, नाश्ता, जेवण खर्च अंतर्भुत).
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. १,४००/- असेल (यात पन्हाळगडावर येण्याचा आणि विशाळगडावरून परतीचा प्रवास खर्च सहभागी सदस्यांनी स्वतः करायचा आहे). पन्हाळगडावर येण्यासाठी ट्रेन आणि बस हे दोन पर्याय उपलब्ध असतील. लवकर ट्रेनचे बुकिंग केल्यास बसच्या तुलनेत किफायतशीर ठरेल. विशाळगडाहून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची सोय असणार आहे. त्याचे शुल्क जुलै महिन्यात सांगितले जाईल. या बाबत आयोजकांशी चर्चा करावी.

नाव नोंदणीची अंतिम तारीख ४ जुलै २०२२. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास ४ जुलै नंतर ट्रेक फी : रु. १,६००/- असेल.

टिप :- सदर मोहिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून होत असल्याने मोहिमेत कसल्याही प्रकारचे व्यसन, गैर बोलू अथवा गैर वागू दिले जाणार नाही ह्याची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी. आपली मोहीम ही मौज मजेसाठी निघालेली सहल नसून शिवप्रेमींची ही “पंढरीची वारीच” आहे. निसर्गवेड्या माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे अनुभवायला मिळणार आहेत. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकावर स्वतःला सावरत चालताना होणारा त्रास इथे शेताच्या बांधावरून चालताना होणार नाही. ओढयातून चालताना पडल्यावर आपल्या नावाने “गणपती बाप्पा मोरयाची” आरोळी पुढील काही दिवस आपल्या कानात घूमत राहतेच पण अनेक वर्ष ट्रेकच्या आठवणींचा हिस्सा होते. इतिहासाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याची “शिवशौर्य ट्रेकर्सची” परंपरा आहे त्यानुसार मुक्कामात शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे शक्य असेल तसे वाटप केले जाते. आपल्यालाही आम्ही आवाहन करीत आहोत की तुमच्या घरी नुसतेच पडून असलेले शैक्षणिक साहित्य उदा. पेन्सिल्स, पेन, वही, चित्रकलेचे साहित्य, खेळणी, गोष्टीची पुस्तके आवर्जून आपल्या ग्रामीण विद्यार्थांसाठी घेऊन या. आपला हा ट्रेक संस्मरणीय असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक (बसमधून मुक्कामाकडे जाणार) आणि १ छोटी सॅक (लंच बॉक्स, पाणी, एक्स्ट्रा चप्पल घेऊन ट्रेक वाटेवर घेऊन चालणे), सामान कमीत कमी आणावे. जरुरी पुरते कपडे, गरज असल्यास चालताना काठी.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, रेनकोट, जरुरी पुरते कपडे (कपड्यांचे फक्त २ सेट), टूथब्रश, टूथ पेस्ट, साबण, टॉवेल.
३) जेवणासाठी ताट, वाटी, पेला, चमचा, पाण्याची १ लिटर बाटली, टिफिन बॉक्स (Pack Lunch घेण्यासाठी). स्वतः पुरता सुका खाऊ
४) अंथरुण, पांघरुण, स्वतःच्या आकाराची प्लास्टिक शीट (ओल्या जमिनीवर अंथरण्यासाठी), टॉर्च, कॅमेरा.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता Whatsapp करावी. आयकार्डसाठी स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल, जन्मदिनांक आणि स्वतःचा फोटो ९८२०४ ७८३३० (महेश म्हात्रे) किंवा ९८६९१ ०९९७० (अमित मेंगळे) या क्रमांकावर Whatsapp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास ४ जुलै २०२२ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. ४ जुलै २०२२ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.

वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहिम प्रमुख – अमित मेंगळे / ९८६९१ ०९९७०
====================
मोहिम कार्यवाह – महेश म्हात्रे / ९८२०४ ७८३३०

नाव नोंदणी झाल्यावर “पन्हाळगड ते विशालगड ट्रेक २०२२” या Whatsapp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६५७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता Whatsapp करावी.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहिमांचे फोटो अल्बम पाहण्यासाठी लिंक :
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट :
http://www.shivashouryatrekkers.org

https://www.facebook.com/events/304594968492684/

Details

Date:
July 11, 2022
Time:
7:00 am
Website:
https://www.facebook.com/events/304594968492684/

Venue

Places Around Pune
Pune, IN + Google Map