Loading Events

« All Events

  • This event has passed.

किल्ले पन्हाळगड – पावनखिंड – विशाळगड ऐतिहासिक मोहीम

July 19 @ 7:00 amJuly 22 @ 4:00 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले पन्हाळगड – पावनखिंड – विशाळगड ऐतिहासिक मोहीम”
तालुका – पन्हाळा आणि शाहूवाडी, जिह्वा – कोल्हापूर
श्रेणी – मध्यम
दिनांक – १९ ते २२ जुलै २०२४

पन्हाळगड, विशाळगड हे दोन्ही ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिक काळ वास्तव्य असलेले किल्ले. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातल्यानंतर सिद्धीच्या हातावर तुरी देऊन महाराज निसटून विशाळगडावर पोहोचले, त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेले हे दोन महत्त्वाचे किल्ले आणि त्या प्रवासाची तितकीच महत्वता.

पाहण्यासारखी ठिकाणे – पन्हाळगडाला लागून असलेला पावनगड, पराशर ऋषींची गुहा, तीन दरवाजा, सज्जा कोठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, वीर शिवा काशिद यांचे स्मारक, पुसाटी बुरुज, पावनखिंड, विशाळगड, पुरातन महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आणि मुंडा दरवाजा.

“पन्हाळगड – पावनखिंड ते विशाळगड” एक ऐतिहासिक ट्रेक”

नरवीर शिवा काशीद आणि नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांचा त्याग आणि बलिदान वाचून जितका समजला त्यापेक्षा अधिक समजण्यासाठी हा ऐतिहासिक ट्रेक करा.
२१ तास उपाशी पोटी धावावे आणि युद्ध करावे, कोणासाठी ? लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे म्हणून ही टोकाची स्वराज्य निष्ठा समजण्यासाठी हा ऐतिहासिक ट्रेक करा.
सलग चार दिवस शेताच्या बांधावरून, कधी कमरेइतक्या ओढ्यातून, कधी गुडघाभर चिखलातून ७० किलोमीटर तंगडतोड करूनही ताजेतवाने कसं राहता येतं हे अनुभवण्यासाठी हा ऐतिहासिक ट्रेक करा आणि ज्यांच्या नुसत्या नावाने ऊर अभिमानाने भरून येतो, त्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटेवर चालायचे आहे म्हणून हा ऐतिहासिक ट्रेक कराच.

कार्यक्रमाचा तपशील :-
शुक्रवार दि. १९ जुलै २०२४ सकाळी ७:०० वाजता पन्हाळगडावर आगमन आणि गडावरच मुक्काम. इतंभूत माहितीसह पन्हाळगड दर्शन आणि पन्हाळगडाच्या शेजारील पावनगडाचे दर्शन. सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जमलेल्या सर्व शिवप्रेमींची ओळख होऊन पन्हाळगड ते विशाळगडाच्या ऐतिहासिक रणसंग्रामाची पार्श्वभूमी इतिहास अभ्यासक श्री. श्रीदत्त राऊत कथन करतील. मोहीम प्रमुख, मोहीम कार्यवाह / संस्थेचे सदस्य दुस-या दिवशी सुरु होणा-या ट्रेकची माहिती आणि सुचना देतील.

शनिवार दि. २० जुलै २०२४ सकाळी ८:३० वाजता पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नरवीर शिवा काशिद आणि गडावरील नरवीर बाजीप्रभू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेची सुरुवात होईल. आपल्या मोहिमेचे मार्गक्रमण त्याच मार्गावरून होईल ज्या मार्गाने शिवाजी महाराज निसटले होते. शिवशौर्य ट्रेकर्स सोबत नरवीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभु यांची सध्याची पिढी मोहिमेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहभागी होईल. सायंकाळी ५:०० वाजता आपण करपेवाडी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर विश्रांती. तसेच श्री. श्रीदत्त राऊत यांच्याशी पावनखिंडीच्या इतिहासावर मुक्त चर्चा.

रविवार दि. २१ जुलै २०२४ सकाळी ७:०० वाजता पुढील मुक्कामाच्या दिशेने ट्रेकला सुरुवात. संध्याकाळी ५:०० वाजता पांढरपाणी मुक्काम.

सोमवार दि. २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता पावनखिंडिकडे प्रस्थान. रणक्षेत्रावर हौतात्म्य पत्करलेल्या बाजी आणि त्यांच्या शूर बांदलवीरांना श्रद्धांजली अर्पण करून विशाळगडाकडे प्रस्थान. पावनखिंडीत डॉ. श्रीदत्त राऊत यांचे पावनखिंडीतील रणसंग्रामाच्या इतिहासावर मार्गदर्शन होईल. संध्याकाळी साधारण ४:०० वाजेपर्यंत विशाळगडावर मोहिमेची सांगता करून आपापल्या मार्गाने परतीचा प्रवास सुरु.

ट्रेक फी : रु. २,०००/- (रुपये दोन हजार फक्त) प्रति व्यक्ती (पन्हाळगड ते विशाळगड दरम्यान राहणे, चहा, नाश्ता, जेवण, तज्ञांचे मार्गदर्शन खर्च अंतर्भुत).

आजीव सदस्यांना ट्रेक फी :- रु. १,९००/- (रुपये एक हजार नऊशे फक्त) असेल.
मोहिमेतील कोणत्याही १५ वर्षाखालील दोन विद्यार्थीनींना शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे २५% सवलत असेल.
मुंबई येथून सहभागी होणाऱ्या सदस्यांसाठी पन्हाळगडापर्यंत येण्यासाठी तसेच विशाळगडाहून परतीच्या प्रवासाची सोय असणार आहे. त्याचे शुल्क आणि नियोजन याबाबत आयोजकांशी चर्चा करावी.
नाव नोंदणीची अंतिम तारीख ७ जुलै २०२४
मोहिमेत जागा शिल्लक असल्यास ७ जुलै २०२४ नंतर ट्रेक फी : रु. २,१००/- (रुपये दोन हजार शंभर फक्त) असेल.

टिप :- सदर मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याने मोहिमेत कसल्याही प्रकारचे व्यसन, गैर बोलू अथवा गैर वागू दिले जाणार नाही याची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी. आपली मोहीम ही मौज मजेसाठी निघालेली सहल नसून शिवप्रेमींची ही “पंढरीची वारीच” आहे. निसर्गवेड्या माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे अनुभवायला मिळणार आहेत. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकावर स्वतःला सावरत चालताना होणारा त्रास इथे शेताच्या बांधावरून चालताना होणार नाही. ओढयातून चालताना पडल्यावर आपल्या नावाने “गणपती बाप्पा मोरया” ची आरोळी पुढील काही दिवस आपल्या कानात घुमत राहतेच पण अनेक वर्ष ट्रेकच्या आठवणींचा हिस्सा होते.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक (टेम्पो मधून मुक्कामाकडे जाणार) आणि १ छोटी सॅक (लंच बॉक्स, पाणी, एक्स्ट्रा चप्पल घेऊन ट्रेक वाटेवर घेऊन चालणे), सामान कमीत कमी आणावे. जरुरी पुरते कपडे, गरज असल्यास चालताना काठी.
२) चांगल्या प्रतीचे ट्रेकिंग बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, रेनकोट, जरुरी पुरते कपडे (कपड्यांचे फक्त २ सेट), टूथब्रश टूथ पेस्ट, साबण, टॉवेल.
३) जेवणासाठी ताट, वाटी, पेला, चमचा, पाण्याची १ लिटर बाटली, टिफिन बॉक्स (Pack Lunch घेण्यासाठी). स्वतः पुरता सुका खाऊ.
४) अंथरुण, पांघरुण, स्वतःच्या आकाराची प्लास्टिक शीट (ओल्या जमिनीवर अंथरण्यासाठी), टॉर्च, कॅमेरा.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेकट्रोल पाकीट अतिआवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची रिसीट न विसरता whatsapp करावी.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास ७ जुलै २०२४ पूर्वी रद्द करून भरलेली पूर्ण फी परत मिळेल. ७ जुलै २०२४ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास रु. २,०००/- कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाहीत.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील.

वरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपला नम्र :-
मोहीम प्रमुख – कुणाल राणे / ८१६९४ ९०१६७
मोहीम कार्यवाह – सचिन कातकर / ९३२०७ ५५५३९
—————————————————————————–

नाव नोंदणी झाल्यावर “पन्हाळगड ते विशाळगड ट्रेक २०२४” या WhatsApp ग्रुप मध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
मुंबई – शार्दूल (९९६७४९३५३२) / अमित (९३२०७५५५३९) / गुरुनाथ (९८६९०८४९१२)
पुणे – स्वप्निल चव्हाण / ७७९८३९६६६४
डोंबिवली – प्रथमेश म्हात्रे / ९९३०४ ५११७८
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६

Bank Details : – Bank of Maharashtra (Prabhadevi Branch)
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची रिसीट न विसरता WhatsApp करावी.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

https://www.facebook.com/events/434603526054883/

Details

Start:
July 19 @ 7:00 am
End:
July 22 @ 4:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/434603526054883/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

पन्हाळा
पन्हाळा + Google Map