Loading Events

« All Events

  • This event has passed.

किल्ले निमगिरी – हनुमंतगड ट्रेक

November 12, 2022 @ 12:00 amNovember 13, 2022 @ 8:00 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
किल्ले निमगिरी – हनुमंतगड ट्रेक
गाव – खांडीची वाडी/खंडी पाडा, तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणे
श्रेणी : मध्यम
उंची – ३४६० फूट (अंदाजे)
दिनांक : १३ नोव्हेंबर २०२२

निमगिरी – हनुमंतगड
माळशेज घाट चढून वर आल्यावर लागणारा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका अनेक गिरिदुर्ग व पुरातन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे शहराच्या उत्तरेकडील परिसरात शिवनेरी, चावंड, हडसर, हनुमंतगड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन ही सारी दुर्गसंपदा मोजक्या अंतरावर वसलेली आढळते. पैकी निमगिरी- हनुमंतगड ही सह्याद्रीतील मोजक्या जोडकिल्ल्यांपैकी एक जोडगोळी. हे जोडकिल्ले एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. मूळ गडाच्या एकसंध कातळात खोदून काढलेला पायरीमार्ग हे निमगिरी किल्ल्याचे वैशिष्ट्य. दोन्ही गडांवर विपुल प्रमाणात पाण्याची टाकी खोदलेली आहेत. तसेच किल्ल्यांच्या पायथ्याशी रानात ४२ वीरगळ देखील पहावयास मिळतात. या किल्ल्यांच्या माथ्यावरून जुन्नरमधील सारेच गडकोट स्पष्टपणे न्याहाळता येतात.

कार्यक्रमाचा तपशील :-
शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्रो १२:०० वाजता मुंबईहून बसने जुन्नरकडे प्रयाण. दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ५:०० वाजता खांड्याची वाडी गावात आगमन – थोडी विश्रांती – चहा-नाश्ता आटपून ७:०० वाजता निमगिरी व हनुमंतगडाकडे कुच. साधारण चार ते पाच तासात दोन्ही किल्ल्यांची गडफेरी आटोपून पायथ्यास दाखल. जेवण उरकून परतीचा प्रवास सुरु. अंदाजे रात्री ७.००-८.०० वाजेपर्यंत मुंबईत आगमन.

ट्रेक फी : संपूर्ण खर्च रु. १,०००/- (रुपये एक हजार मात्र) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, नाश्ता व जेवण अंतर्भूत).
मोहीमेत सदस्य संख्या ३० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. ९००/- असेल.

नाव नोंदणीची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२२ असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ छोटी सॅक. सामान कमीत कमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, रेनकोट, जरुरी पुरते कपडे.
३) पाण्याची २ लिटर बाटली.
४) स्वतः पुरता सुका खाऊ.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. तसेच स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल, जन्मदिनांक आणि स्वतःचा फोटो ९०४९०१३६७७ (हार्दिक म्हात्रे) किंवा ९८२०२३७९०५ (श्रीकांत नागावकर) या क्रमांकावर WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहीमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहीमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास ९ नोव्हेंबर २०२२ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. ९ नोव्हेंबर २०२२ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.

वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – हार्दिक म्हात्रे / ९०४९० १३६७७
====================
मोहीम कार्यवाह – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५

नाव नोंदणी झाल्यावर ” किल्ले निमगिरी – हनुमंतगड ट्रेक” या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे – स्वप्निल चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०

Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीमांचे फोटो अल्बम पाहण्यासाठी लिंक :
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट :
http://www.shivashouryatrekkers.org

https://www.facebook.com/events/858093775631257/

Details

Start:
November 12, 2022 @ 12:00 am
End:
November 13, 2022 @ 8:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/858093775631257/

Venue

Rajgad Trek
Rajgad
Pune, 412213 IN
+ Google Map