Loading Events

« All Events

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित ‘दारमा व्हॅली ट्रेक – भटकंती अनगड उत्तराखंडची’

May 2, 2026 @ 1:00 am - May 8, 2026 @ 4:00 am

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
‘दारमा व्हॅली ट्रेक – भटकंती अनगड उत्तराखंडची’
वैशिष्ट्ये : पंचाचुली बेस कॅम्प / सिपू – भगवान शंकरांचे व भारतातील अखेरचे गाव
श्रेणी : मध्यम
पिठोरागड, उत्तराखंड

२ मे
२०२६

हिमालयीन मोहिमांमध्ये देखील अगदीच OFFBEAT मोहिमा आयोजित करणे हि शिवशौर्य ट्रेकर्सची कायमच खासियत…शिवशौयने १६० पेक्षा जास्त मोहिमा आयोजित करून यशस्वी केल्या आहेत त्यात सारपास, चादर ट्रेक, चंद्रखणी आणि बेदनी बुग्याल, काश्मीर ग्रेटलेकची मोहीम या हिमालयन ट्रेक्स, जंगल सफारी आणि सह्याद्रीतील गडकिल्ले यांचा समावेश आहे. शिवशौर्य ट्रेकर्स समाजाच्या सर्व स्तरातील सर्व वयोगटातील सर्वांनाच दऱ्या-खोऱ्यात, सोप्या-बिकट वाटांवरून सुखरुप फिरवत आली आहे. यंदा आपण उत्तराखंडमधील , कुमाऊ हिमालयाच्या दारमा खोऱ्यात मोहीम आयोजित केली आहे…अगदीच अनगड अशी वाट…सहसा कोणी करत नाही अशी मोहीम… अगदी भारताच्या शेवटच्या सिपू गावात.. खुद्द भगवान शंकरांच्या गावात… जेथे पांडवांनी स्वर्गारोहण करताना ज्या शिखरांवर वास्तव्य केले.. अश्या पंचाचूली बेस कॅम्पला … आपली OFFBEAT मोहीम असणार आहे. या गावांमधील वास्तव्यात आपण या दुर्गम भागाची वैशिट्ये जाणून घेणार आहोत… मोहीम अगदी कोणीही न चुकविण्यासारखी.. ‘दारमा व्हॅली ट्रेक – भटकंती अनगड उत्तराखंडची’

ट्रेकचा दिनक्रम :
दिवस १
२ मे
काठगोदाम येथे ट्रेनने आगमन.. काठगोदाम ते पिठोरागड येथे वाहनाने प्रवास (६ ते ८ तास )..पिठोरागड येथे निवास
ट्रेक विषयी माहिती / मार्गदर्शन.

दिवस २
३ मे
पिठोरागड ते दूगतू गाव येथे वाहनाने प्रवास.. (६ ते ८ तास )..
नितांत सुंदर दारमा व्हॅलीत प्रवेश…दूगतू गाव येथे निवास.. ९००० फूट

दिवस ३
४ मे
दूगतू गाव ते पंचाचुली बेस कॅम्प ट्रेक व परत दूगतू गाव येथे निवास.. १२,८०० फूट (८ किमी, ६-७ तास)

दिवस ४
५ मे
दूगतू गाव ते सिपू गाव येथे ट्रेक..
सिपू गाव येथे मुक्काम… ११,२०० फूट (१२ किमी, ८ तास)

दिवस ५
६ मे
सिपू ते मालतीबाई लेक व मारचा गाव येथे मुक्काम…
११,८५० फूट (८ किमी, ७ तास)

दिवस ६
७ मे
मारचा गाव ते दूगतू गाव.. ११,२०० फूट (६ किमी, ३ तास)… जालना हिल स्टेशन येथे मुक्कामासाठी प्रयाण… (८ तास वाहनाने प्रवास )

दिवस ७
८ मे
जालना हिल स्टेशन ते काठगोदामसाठी परतीचा प्रवास..

ट्रेक मधील अंतर्भूत गोष्टी :
१. काठगोदाम ते काठगोदाम प्रवास राहणे खाणे (दिनांक २ मे २०२६

०८ मे २०२६ )
२. रात्री झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग
३. ट्रेक दरम्यान सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे शाकाहारी जेवण, चहा
४. स्थानिक सरकारी सर्व परवानग्या आणि शुल्क
५. प्राथमिक उपचार औषधे, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिमीटर (गाईड कडे उपलब्ध)
६. वैयक्तिक विमा

अंतर्भूत नसलेल्या गोष्टी :
१. आपापल्या शहरातून येण्या जाण्याचा प्रवास खर्च अंतर्भूत नाही
२. ट्रेक व्यतिरिक्तचे जेवण, चहा-पाणी, वैयक्तिक खरेदी ट्रेक शुल्कात अंतर्भूत नाही
३. ट्रेक मध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्याची जबाबदारी स्वतः ट्रेकरची राहील. वाटेत कोणत्याही कारणास्तव ट्रेक अपूर्ण सोडून बेसकॅम्पला परतायचे झाल्यास त्याचा खर्च वैयक्तिक असेल.
४. स्वतःसाठी पोर्टरची गरज वाटल्यास, पोर्टरची सोय करण्यात संस्था मदत करेल, परंतु पोर्टरचा संपूर्ण खर्च आणि जबाबदारी वैयक्तिक असेल.
५. ट्रेक सोडून बेसकॅम्पला राहण्याचा किंवा आपापल्या ठिकाणी नियोजित वेळेआधी जाण्याचा खर्च आणि जबाबदारी ट्रेक सदस्याची असेल. तरी, अशा आपत्कालीन वेळेसाठी पुरेशी रोख रक्कम ट्रेकमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्याने स्वतःच्या जबाबदारीवर आपल्यासोबत बाळगावी.
६. वरील कार्यक्रमात काही तत्कालीन परिस्थितीनुसार काही बदल करावयाचा असेल तर ते सर्व अधिकार मोहीम प्रमुखाकडे असतील व तो निर्णय मोहिमे मधील सदस्यांना बंधनकारक असेल

सर्वात आधी खालील मुद्यांवर मोहीम प्रमुखांशी बोलून घ्या :-
शिवशौर्य ट्रेकर्स रेल्वेचे आणि विमानाचे रिझर्व्हेशन बाबत मार्गदर्शन करेल. त्यासाठी मोहीम प्रमुखांशी फोन वर किंवा वैयक्तिक संपर्क साधावा.
मोहीम प्रमुख व बरीचशी मंडळी जाताना रेल्वेने व येताना विमानाने प्रवास करण्यास इच्छुक आहेत. जेवढे लवकर नियोजन कराल तेवढे सर्वांसोबत आणि विना त्रास आपल्या बेस कॅम्प वर पोहोचणे होईल तसेच परतीचा प्रवास सुद्धा सर्वांसोबत होईल. विमानाचे बुकिंग शक्य तितक्या आधी केले तर प्रवास भाडे स्वस्त पडते. त्यामुळे दिवस / खर्च वाचेल. मात्र विमानाची भाडी apex fare नुसार वाढत असल्यानं ही भाडी फार काळ तशीच राहणार नाहीत, म्हणून लवकर निर्णय घेतला, तरच हा फायदा मिळेल).कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त स्थलदर्शन व इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था मात्र (त्याची शिवशौर्य ट्रेकर्स संस्थेला आगाऊ कल्पना देऊन) स्वतः करायची आहे.

अटी – नियम :-
१) आपली सॅक अकारण जड होणार नाही, काळजी घ्यावी. (8-10 किलो पेक्षा जास्त नसावी).
२) MBBS डॉक्टरचे सर्टिफिकेट (होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक नाही) भरून आपण या ट्रेकसाठी फिट आहोत याची खात्री करून ते सर्टिफिकेट मोहीम प्रमुख यांच्याकडे ट्रेकपूर्वी किमान 15 दिवस आधी सुपूर्द करायचे आहे (सॉफ्टकॉपी चालेल). Trek application form आणि medical certificate form सहभागी सदस्यांना शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे पाठविण्यात येतील. ते भरून द्यायचे असतील.वय वर्ष 45 पुढील सदस्यांनी ECG काढणे आवश्यक आहे.
३) आयोजकांकडे Emergency मेडिकल किट आहे. तरी, प्रत्येक सदस्याने वैयक्तिक औषधे आणायची आहेत. हिमालयात प्राणवायूची कमतरता असल्याने सोबत कापूर बाळगावा.
४) ट्रेकमध्ये कोणत्याही प्रकारचे कोणत्याही कारणास्तव व्यसन करू दिले जाणार नाही. तसे आढळल्यास ट्रेकमधून बडतर्फ करण्याचे हक्क मोहीम प्रमुख व पर्यायाने शिवशौर्य ट्रेकर्स कडे असतील.
५) ट्रेक सदस्याने आपली Haversack स्वतः आणावी. तसेच, आपले अतिरिक्त सामान बेसकॅम्प मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र, या सामानात कुठल्याही मौल्यवान वस्तू नसाव्यात, त्या असल्यास त्यांची जबाबदारी स्वतः सदस्यांची असेल. कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स त्याला जबाबदार राहणार नाही.
६) हिमालयात चालतील असे चांगल्या प्रतीचे बर्फात चालतील असे ankle length waterproof shoes ट्रेक सदस्याने ट्रेकसाठी घालायचे आहेत. बर्फात चालताना शक्यतो snow hand gloves वापरावेत.
७) हिमालयात मे महिन्यात रात्रीसुद्धा खूप प्रचंड गारठा असल्याने गरम कपडे ज्याने त्याने आपापल्या सोयी आणि गरजेनुसार आणायचे आहेत (किमान 1 thermals). तसेच, ट्रेक मध्ये ते स्वतः घेऊन चालायचे देखील आहे. (कानाला लागणारा मफलर, माकडटोपी, thermals, रात्री झोपताना woolen hand gloves, वूलन पायमोजे, windcheater, स्वेटर, ट्रेक करताना व रात्रीही पूर्ण बाह्यांचा (full sleeves शर्टच घालावेत). चालताना मोज्यांचे 4-5 अतिरिक्त जोड बाळगावेत. बर्फ़ामुळे एक जोड ओला झाला तरीही पंचाईत होणार नाही.
८) वरील भागात कधीही पावसाची शक्यता असते तरीही आपले कपडे प्लास्टिक मध्ये व्यवस्थित बांधून घ्यावेत.. तसेच रेनकोट आवश्यक असणार आहे…
९) Sunscreen लोशन, टोपी/ hat /cap व goggle (compulsory) टूथपेस्ट, टूथब्रश, रेनकोट, टॉर्च, batteries (+ extra cells) अशा वैयक्तिक गरजेच्या गोष्टी. बर्फावर सूर्यप्रकाश परावर्तित होऊन डोळ्यांना त्रास होऊन अंधत्व येऊ शकतं म्हणून गॉगल्सना पर्याय नाही. चष्मा लावणाऱ्यांनी किमान photochromatic चष्मा वापरावा. ह्या गोष्टी न आणल्यास ट्रेक सदस्याचीच खूप पंचाईत होणार आहे. ताट, मग, Pack lunch साठी tiffin box, चमचा व पाण्याची बाटली, गरम कपडे स्वतःच आणावे.
१०) मोहीम प्रमुखांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात कोणताही बदल करायचा झाल्यास त्याचे सर्वाधिकार मोहीम प्रमुखांकडे राहतील.
११) मोहिमेत Guide किंवा मोहीम प्रमुखांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालणे बंधनकारक असेल.
१२) शिवशौर्य ट्रेकर्स निसर्गाचे संगोपन करण्यास कटिबद्ध आहे. तरी, chocolate किंवा गोळ्यांचे wrappers वाटेत टाकू नयेत.
१३) ट्रेकचे संपूर्ण शुल्क प्रत्येक सदस्याकडून आगाऊ घेतले जाईल. ०२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नाव रद्द करायचे झाल्यास भरलेल्या संपूर्ण रकमेच्या ५०% रक्कम कापून उरलेली रक्कम सदस्यास परत केली जाईल. आणि त्यानंतर १००% कापली जाईल (कोणत्याही कारणास्तव refund मिळणार नाही).

ट्रेक फी: रु.१५,७००/- (फक्त काठगोदाम ते काठगोदाम पर्यंतचा खर्च अंतर्भूत).

आपण आपली ट्रेक फी पुढील बँकेत भरू शकता.
Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS

बँकेत शुल्क भरल्यावर त्वरित ९९६७४९३५३२ या क्रमांकावर कळवावे.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.

संपर्क :
शार्दूल खरपुडे (मोहीम प्रमुख) ९९६७४९३५३२
==================================
नम्रता सावंत (मोहीम कार्यवाह) ९६१९७४५९७५

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई – / ९३२०७ ५५५३९
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
वसई/पालघर – हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर/ ९८१९५ ६६१२०

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

Details

Organizer

  • Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
  • Email noreply@facebookmail_com

Venue

  • उत्तराखंड
  • उत्तराखंड + Google Map