Loading Events

« All Events

  • This event has passed.

वारसा अभ्यास सहल २०२४. (केळवे माहीम शिरगांव)

November 24, 2024 @ 6:00 am - 10:00 pm

🛕🚩 #महिकावती_राज्यात… 🏝️

वारसा अभ्यास सहल २०२४
केळवे – माहीम – शिरगांव (उत्तर फिरंगाण)

*रविवार, दि. २४ नोव्हेंबर२०२४*

प्राचीन काळापासून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रातील पालघर तालुका हा सागरी व्यापारीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाचा होता. साहजिकच या प्रदेशावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी संरक्षणाच्या दृष्टीने अनेक दुर्ग बांधले. त्यातील बरेच दुर्ग हे सागरी दुर्ग होते.

इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले इथले दुर्ग,
वास्तू, मंदिरे आजही त्या काळाच्या
ऐतिहासिक पाऊलखुणा जपून ठेवत आहेत.

केळवे – माहीम – शिरगांव या परिसरातील अशाच काही दुर्ग,
वास्तू, मंदिरांच्या माध्यमातून त्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

प्रस्थान : खारघर, नवी मुंबई पहाटे ५.३० वा
पिकअप पॉइंट्स : खारघर, ठाणे (कळवा नाका)
पाहण्याची ठिकाणे : शिरगांवचा किल्ला, महिकावती देवी मंदिर, महिमचा किल्ला, केळवे भुईकोट, शितलादेवी मंदिर, केळवे पाणकोट, भवानगड.

*अभ्यास सहल शुल्क : १२००/- ₹*

समाविष्ट :
• खारघर ते खारघर ट्रान्सपोर्ट
• टोल, पार्किंग
• चहा, नाष्टा, दुपारचे जेवण (veg.), १ लिटर पाणी

अभ्यास सहल असल्यामुळे या परिसरातील इतिहास, भूगोल, जैवविविधता, दुर्गस्थापत्य या सगळ्या दृष्टिकोनातून माहिती देण्यासाठी दुर्ग व इतिहास अभ्यासक *श्री. संदीप स. मुळीक सर* ( गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर या पुस्तकाचे लेखक) यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे.

*अधिक माहितीसाठी समूहात सहभागी व्हा:*

*संपर्क:*
तुषार चौक :
9867065326
तुषार दानवे : 9820977081

आपलाच
“वारसा संस्कृतीचा परिवार”
“महाराष्ट्र राज्य”

Details

Organizer

  • वारसा संस्कृतीचा – Varasa Sanskruticha Foundation
  • Email noreply@facebookmail.com

Venue

  • Online event