Loading Events

« All Events

रायगड प्रदक्षिणा

February 1 @ 8:30 pm - 11:30 pm

🚩 *वाइल्ड विंग्स अॅडव्हेंचर्स आयोजित
रायगड प्रदक्षिणा २०२६* 🚩

शिवशाहीचे अधिष्ठान व महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेल्या बलाढ्य, दुर्गम, रौद्र, भीषण अश्या किल्ले रायडगडाच्या टकमकटोक, भवानी व हिरकणी कड्यांच्या पायथ्याकडील पठारावरील खडकाळ व घनदाट जंगलातील वाटेवरुन …अडचणीच्या निसरडया वाघोली खिंडीतून काळकाईच्या चिंचोळया घळीतुन दुर्गदुर्गेश्वर रायगडाची १६ किलोमीटर प्रदक्षिणा..

ह्या वर्षीची ही प्रदक्षिणा समर्पित आहे *स्वराज्याचे 16 व्या शतकातील आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे* ह्यांना, ज्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला.

*रायगड_प्रदक्षिणा_नियोजन*

◆ *दिनांक १ फेब्रुवारी २०२६* रोजी *सकाळी ६:००*
वाजता प्रदक्षिणेला सुरवात होईल.

◆चित्त दरवाजा-रायनाक समाधी-वाघोली खिंड-कोंडेखळीचा खळगा-काळकाई खिंड-हिरकणीवाडी असा प्रदक्षिणेचा मार्ग असेल.

◆प्रदक्षिणा संपन्न झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल त्या नंतर जेवण करुन परतीच्या मार्गावर…!*

◆रायगड प्रदक्षिणे नंतर गडावर जाण्याचे नियोजन आयोजकांकडे नसेल.

*#सोबत_काय_घेऊन_येणार*

१) सैलसर अंग पुर्ण झाकेल अशा प्रकारचा पेहराव अनिर्वाय (हाल्फ पँट टाळा प्रदक्षिणा मार्ग जंगलातून आहे. जंगलातील वनस्पतींची पाने विषारी असतात, धारधार असतात त्याचा शरीराशी संपर्क होऊन एलर्जीची भिती असते)

२) हातातील किंवा हेड टॉर्च अनिवार्य ..

३) *तीन लिटर पाणी अनिवार्य* ( रायगड प्रदक्षिणा मार्गात कुठेही पाण्याचा स्रोत नाही त्यामुळे पाणी घेऊन येणे. तसेच रायगड रहाळ परिसरात पाण्या ची कमतरता आहे त्या मुळे पाणी जपून वापरा)

४) वाटेत पुरेल इतका सुका खाऊ

महत्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्राच्या एका पवित्र तिर्थास प्रदक्षिणा मारतो आहोत. तेव्हा त्या गडकोटांप्रती व मराठ्यांच्या ज्वलंत तेजस इतिहासाप्रती निष्ठा उरात ठेवून या…!

*#हे_टाळावे*

● मौल्यवान वस्तु , हाल्फ स्लीव टीशर्ट आणि 3/4 पैन्ट्स.
(प्रदक्षिणा मार्ग जंगलातून आहे …वाटेत वनस्पती स्पर्शाने खाज येणे किंवा अजून इन्फेक्शन होऊ शकते म्हणून हे टाळावे)

● #दमा, #अस्थमा, किंवा #ह्रुदय_रोग असणाऱ्या लोकांनी ही #प्रदक्षिणा_टाळावी ही विनंती.

*१ फेब्रुवारी 2026 ला सकाळी हिरकणीवाड़ी येथे नाश्ता आणि
चहा
उरकून आपण किल्ले रायगड- चित्त दरवाजा जवळून प्रदक्षिणेला सकाळी ६:०० वाजता सुरुवात करणार आहोत.

तिथे आपणास या प्रदक्षिणे विषयी तसेच
किल्ले
रायगडचा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती दिली जाईल.
ही मोहीम १६ किमी ची आहे आणि जंगल भुभागातुंन आहे, त्यामुळे पाठीवर जितके कमी वजन असेल तितके चांगले. आपण आपल्या सोबत आणलेले जास्तीच सामान आपण आपल्या राहण्याच्या ठिकाणी ठेवून आवश्यक तेवढेच सोबत घेणार आहोत. काळकाई खिंडीत आपल्या मोहीमेची समाप्ती होते . अर्थातच आपल्याला अंदाजे दुपारचे २ वाजतील.

*#सुचना*

१) प्रदक्षिणे दरम्यान कोणतेही व्यसन खपवून घेतले जाणार नाही.

२) रायगड प्रदक्षिणेदरम्यान आयोजकांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

३) कोणत्याही प्रकारची गैर वर्तणूक होणार नाही याची प्रत्येकाने दखल घ्यावी.

४) १० वर्षा वरील मुलांसोबत त्यांचे पालक असणे अनिवार्य आहे.

*#समाविष्ठ_बाबी*

◆ सकाळचा नाश्ता, चहा.
◆ दुपारचे जेवण.
◆ मार्गदर्शक व तांत्रिक सहकार्य.

*#भेटण्याचे_ठिकाण*

◆ सौ.चंदा म्हसे , आशीर्वाद निवास, रोप-वे च्या पुढे , हिरकणीवाडी.

*#प्रवासाचे_नियोजन_स्वतः_करावे*

*जर कोणी ३१ तारखे ला येणार असेल तर राहण्याची व
रात्रीच्या जेवणाची सोय आपण स्वखर्चाने करावी.*

*रायगड प्रदक्षिणा नोंदणी ची शेवटची तारीख :- २६ जानेवारी २०२६*

*#शिवतीर्थ_श्री_रायगड_प्रदक्षिणा_सहभाग_मूल्य – ₹ ३९९/-.*

#संपर्क
मुंबई:-
बबन


9762333148
ओंकार

91469 81684
स्वप्नील –
7276109532

पुणे:-
ॲड प्रतिक – 9049682873
राजेश

– 9923800306

Mumbai

मुंबई:-
बबन


9762333148
ओंकार

91469 81684
स्वप्नील –
7276109532

Details

Organizer

  • WILD WINGS
  • Email noreply@facebookmail.com

Venue