harishchandragad

Hotel harishchandragad

 

harishchandragad
harishchandragad

Ashok Bharmal harishchandragad 9404278563

ramnath bharmal 7350791250 harishchandragad

ankush bharmal 9403123608 harishchandragad

पावसाळा म्हटलं तर आपल्या सर्वांसाठी एक पर्वणीच… पहिल्या पावसात भिजण्यापासुन तर
धबधब्याखाली उभे राहून मनसोक्त भिजण्यापर्यंतचा
आनंद काहितरी खासंच असतो,
पावसाळा सुरू झाला की आपली सर्वांचीच ओढ असते ती म्हणजे पावसाळ्यात दिसणा-या निसर्गसौंदर्याचा आविष्कार पाहाण्याची,
आणि तो आविष्कार पाहण्यासाठी आपण कुठे ना कुठे भटकंतीसाठी जात असतो. “चला तर मग “.

भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा
हरिश्चंद्र गड 📌

#harishchandragad
#kokankada
#taramati
#sahyadri
#akole
#ratangad
#kalasubai
#monsoon
#pachanai

This document provides a summary of a trekking trip to the Harishchandragad fort in Maharashtra, India. It describes the route taken from Kurla to Kalyan, passing through Igatpuri, Ghoti, Rajur, and Pachnai. Details are given about reaching the base village of Pachnai, and the 1.5 hour trek to the fort. Points of interest mentioned at the fort include the Harishchandreshwar temple, Kedareshwar Cave, Saptatirtha Pushkarni tank, and the scenic Konkan Kada cliff. The group then returned from Khireshwar to Kalyan via Malshej Ghat

https://www.slideshare.net/slideshow/harishchandragad-maharashtra-forts-shivaji-khireshwar-pachnai-bhandardara-rajur-presentation/904490

Balu Chahadu Rengade 9370996422 / 9637614729
Balu Rengade khireshwar
https://www.facebook.com/balu.chahadurengade
Raja Harishchndra parytak Hotel
Form. Harishchndragad
Camping Activity  /Available Tents
* Guides.           * Lunch and dinner
* jangle safar   *     trekking camping
* local food.                                                                 * breakfast                                                                   * Pimpalgaon Joga Lakeside camping.
Balu Rengade mo. 9370996422/9637614729
बाळु रेंगडे 9370996422/9637614729
रामनाथ भारमल 7350791250

माझ्या आय़ुष्यातील एक अवस्मरणीय क्षण….
मित्रांनो माझे नाव बाळु चाहादु रेंगडे मी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असण्या-या खिरेश्वर गावचा रहिवाशी आहे.
माझा जन्म खिरेश्वर गावात झाला असल्यामुळे लहानपणापासुनच हरिश्चंद्रगड पाहत आलो आहे.
मित्रांनो माझ वय २९वर्षे असुन मी हरिश्चंद्रगडावर जेवणाची,राहण्याची,व गाईडची व्यवस्था करतोय.
तो दिवस होता १०जुन २००६ वार शनिवार मी खिरेश्वर गावाच्या खालच्या बाजुला असणा-या नागेश्वर मंदिराच्या पाऊल वाटेवर उभा होतो,समोरुन चार माणसं येत होती,
वाढलेली दाढी,लांब केस,साधरण ५/६फुट उंच आणि त्यांच्या पाठीवर मोठ मोठ्या बँगा होत्या,त्यांच्याकडे पाहुन सुरुवातीला भितीही वाटली होती,पण नंतर लक्षात आलं की ही गडावर जाणारी माणसं असावीत.
तेवढ्यात त्यांनी मला आवाज दिला मित्रा आम्हांला गडावरती जायचं आहे,कुणी वाटाड्या मिळेल का ?
काही वेळ मी त्यांच्या प्रश्नाने सब्ध झालो,कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असावं,त्यातील एक जण परत बोलला की गडावरती घेवुन जाणारा कोणी भेटेल का ?
तेंव्हा मी त्यांना हो मिळेल की साहेब…
त्यातील एक जण बोलला कोण आहे आमच्या सोबत येनार…
मी येतो अस म्हटल्यावर त्यांनी मला नाव विचारलं आणि आम्ही गडाच्या टोलारखिंडीच्या मार्गाने गडावर जाण्यासाठी निघालो.
पण…गंमत म्हणजे मी पावसाळ्यात कधीच गडावर गेलो नव्हतो,गडावर जाण्याचा रस्ता माहीती होता,कारण कधीतरी गडावर जाणं होत होतं.
पावसाळ्यात काय असेल,आेढा असेल का ? रस्ता निसरडा असेल का ? या गोष्टींचा विचार मनात आलाच नाही, कारण
माझ्या आयुष्यातील वाटाड्या (गाईड) म्हनुन हरिश्चंद्रगडावर जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही टोलारखिंडीत पोहचलो, पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे धुक खुप होतं, त्यामळे आता काळोख होईल असं वाटत होत.
मी त्यातील संजय कुलकर्णी सरांना विचारलं सर किती वाजले
तेव्हा त्यांनी मला दोन वाजले असं सांगितलं, तोच माधव सरांनी मला प्रश्न केला बाळु आपल्याला गडावर पोहचायला किती वेळ लागेल.मला माहिती नव्हतं अजुन किती वेळ लागणार पण मी अंदाजे दोन तास बोलुन मोकळा झालो.त्यांना अस वाटावं की मला गडाची सर्व माहीती आहे,
असं दाखवणयाचा प्रयत्न करत होतो,पण मुळात मला काहीच माहीती नव्हतं.तेवढ्यात एक जण टोलारखिंडीतुन पलिकडे जाणा-या वाटेबद्द्ल विचारतो की ही वाट कुठे जाते
मी त्यांना सांगितल की दोन गावांना जाते ही वाट लव्हाळी आणी कोथळे…
काही वेळ आराम करुन आम्ही पुढच्या दिशेने निघालो, तेवढ्यात पाऊस सुरु झाला,आणि आम्ही टोलारखिंडीच्या वरती असणा-या अवघड कातळकड्याच्या पायथ्याला येवुन उभे राहुन वरती दिसणा-या धबधब्याकडे एकटक नजरेने पाहत होतो.कारण लहानपणापासुन दिसणारा धबधबा आज जवळुन पाहत होतो,
चालु असलेला पाऊस आणि कातळकड्यातली वाट पाहुन त्यातील एक जण बोलला बाळु आता कस जायचं.
त्यावर उत्तर दिल की येथुनच वरती जायच आहे,आता त्या चारही माणसांच्या मनात भितीच वातावरण निर्माण झालं होत,आम्ही हळुहळु कातळकडा पार केला,आणि जोरदार पाऊस सुरु झाला.पाऊस ईतका जोराचा होता की आम्हाला व्यवस्थीत चालताही येत नव्हतं,त्यामुळे आम्ही जागेवर थांबण्याचा निर्णय घेतला,१०/२०मिनीटं झाली तरी पाऊस थांबत नव्हता,दिड तासनंतर पाऊस थांबला आणि आम्ही परत चालायला सुरुवात केली,दोन तासानंतर आम्ही गडावर पोहचलो,आपण पोहचलोय याची जाणीव मला झाली पण..
मंदिरच दिसत नव्हतं कारण धुक ईतक होत की समोरची माणस दिसत नव्हती,
आता काय करावं,कुठ जावं,मंदिर कुठे आहे या विचारांनी हैराण झालो.तोच मंदिरातील घंटा वाजला,आम्ही आवाजाच्या दिशेने चालत होतो तोच धुक एकदम गायब…!
समोरच मंदिर होत,आम्ही मंदिरात गेलो दर्शन घेतलं,आणी मंदिराच्या आतमध्ये असणा-या गफेत मुक्काम करण्याचं ठरवलं.मंदिराच्या समोरच भगवान मांमाचं हाँटेल होत,
जेवन बनवण्यासाठी आणलेलं साहित्य भगवान मामांकडे दिल,आणि खिचडी भात बनवायला सांगितला.
गुफेमध्ये आम्हांला लाकडं मिळाली आम्ही शेकोटी लावुन गप्पा मारत बसलो.त्या वेळी मला विचारलं तुझ शिक्षण किती झालं तेंव्हा पाचवी पर्यंतच झालंय सर
तु काय करतोस ?
शेतीची काम करतो,बक-या चारण्याचं काम करतो,
तुझ्या घरी कोण कोण आहे ?
आई – वडील एक भाऊ
भाऊ काय करतोय?
शेतीच…!
संजय सरांनी मला प्रश्न केला बाळु गडाचा इतिहास काय आहे?
तेंव्हा माझ्याकडे सांण्यासाठी काहीच नव्हतं,मी बोललो सर मला माहीती नाही.सरांनी त्यांच्या बँगमधुन दोन तीन कागद काढले व माझ्याकडे देत म्हणाले ही हरिश्चंद्रगडाची माहीती आहे,हि माहीती पाठ कर,शनिवार रवीवार सुट्टीच्या दिवशी शहरातल्या लोकांचा कल गडकिल्ले पाहण्याकडे वळलाय,
शनिवारी रस्त्यावर थांबायचं,येनारी जी माणसं असतात त्यांना विचारायचं सर गाईड पाहिजे का?
त्यांना ही माहीती सांगायची,रस्त्याबद्द्ल माहिती द्यायची,ओढे किती,अवघड कुठे आहे,अवघड असणा-या ठिकाणावरुन जात असताना सर सावकाश या असं बोलायचं,
त्यांच्यासोबत कुठल्या ना कुठल्या विषयावरुन चर्चासत्र चालु ठेवायचं,”केल्याने होत आहे आधी केलं पाहिजे” त्यामुळे काय होईल तर तुला हरिश्चंद्रगड गाईड म्हनुन भरपुर लोक ओळखतील,त्यतुन तुला दोन पैसे भेटतील,तुलाही खर्च करण्यासाठी होतील आणि आई वडीलांनाही मदत होईल.
उदा.आता आम्ही आलो,पुढच्यावेळी आमचे मित्र येनार असतील तर तुझं नाव सांगु..!
आलेल्या पर्यटकांसोबत संवाद कसा करायचा,माहीती कशी द्यायची,हे एकदम सविस्तर पद्धतीने मला समजावुन सांगीतलं होत.आता आमचं चर्चासत्र थांबलं होत. जेवण झालं,आणि झोपलो.
सकाळी नाष्टा करुन आम्ही गुफां,तारामती,कोकणकडा पाहुन परत मंदिराकडे पोहचलो.जेवन करुन परतीचा प्रवास सुरु झाला.रिमझीम पाऊस चालु होता,धुक येत होत,जात होत.
हळुहळु आम्ही सायंकाळी पाच वाजता खिरेश्वरला पोहचलो.
आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि मी घरी आलो.
रात्रीचं जेवन झालं,झोपायला अंथरुन टाकलं,पण झोप येत नव्हती,कारण हरिश्चंद्रगडावर पाहिलेल निसर्गरम्य वातावरण
मला खुणवत होत,परत परत पाहण्यासाठी प्रोत्साहित करत होतं,आणी दुसरी गोष्ट म्हणजे कुलकर्णी सरांनी जे सांगितलं होत त्या गोष्टीने मनात काहोल माजवला होता.
तेव्हा मनात एक विचार आला ,आपल्याला जर तो सुंदर निसर्ग पाहायचा असेल तर कुलकर्णी सरांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.त्यामुळे काय होईल तर निसर्ग पण पाहायला मिळेल,आणी पैसे पण भेटतील.
तेंव्हापासुन मी प्रत्येक शनिवार व सुट्टीच्या दिवशी हरिश्चंद्रगडाच्या रस्त्यावर येवुन थांबयचो,महिण्यातुन दोन तर कधी एक वेळा गडावर जात होतो.
गडावर गेल्यानंतर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहायला मिळायचं,
वर्ष दोन वर्ष उलटली आणी २००८/०९पासुन हरिश्चंद्रगडावर येना-या पर्यटकांची गर्दी वाढली,आता गडावर तीन चार हाँटेल पण झाली होती,त्यात माझा मित्र रामनाथ भारमल याचंही हाँटेल होत,आता जग बदललं होत डीजीटल युग सुरु झाल होत.ओळखी वाढल्या होत्या,त्यामुळे महिण्याच्या प्रत्येक आठवड्यला गडावर जायला मिळत होत.
११मे २००९रोजी हरिश्चंद्रगडावरील आकर्षण इंद्रवज्र पाहायला मिळालं.
आता माझ्याकडे मोबाईल आल्यामुळे गाईडसाठी मला फोन येवु लागले,त्याचवेळी काही जिवाभावाची माणसं भेटली.
गेल्या दहा वर्षामध्ये मी इंटरनेटच्या माध्यमातुन हरिश्चंद्रगडाचा गाईड म्हनुन प्रसिद्धीस आलो.
आता मी रँपलिंग,कँपिंग,जंगल सफारी,व्हँली क्रासिंग,यासारखे छोटोमोठे अँडव्हेंचर ट्रेक करतोय.
भिमाशंकर ते कळसुबाई पर्यंतचा कुठलाही ट्रेक अँरेंज करतोय.
मी कधीच विचार केला नव्हता की मला गावात राहुन कश्याच्या तरी स्वरुपाने पैसे मिळतील म्हनुन…!
आज मी ह्या सह्याद्रीच्या खो-यात खंबीरपणे उभा आहे तो
संजय कुलकर्णी सर सुमेद समर्थ,हर्षद समर्थ, जयेश कांगणे, तेजस पाटरे,दिगंबर पांचाळ,मंदार,किशोर गि-हे, कपिल लांडे,चैतन्य कामत,सुहास सर,कोतकर साहेब, रितेश ढवळे,ओंकार ओक यांसारख्या जिवाभावाच्या माणसांमुळे.
येत्या दहा जुनला माझ्या कारकिर्दीला १४वर्ष होत आहेत
त्यांच्या सहकार्यामुळे मी माझं अस्तित्व निर्माण करु शकलो त्या सर्वांना मनापासुन धन्यवाद.
broken translation by facebook
A memorable moment in my life ….
My friends My name is Belu Chahadu Rangeday, I am a resident of Khirswar village, situated at the foot of Harishchandragad.
Since birth I was born in Khirswar village, I have come here to see Harishchandra Sarda.
Friends, I am 29 years old and I manage to eat, live, and guide on Harishchandra Gadh.
The day was 10th June 2006, on Saturday, I was standing at the foot of the Nageshwar temple on the lower side of the village of Khireshwar, whereas four people came from the side,
increased beard, long hair, 5/6 feet tall, and a large band on their back, looking at them It was scary, but later realized that there should be men on this fort.
In the meantime, they gave me a sound. Friend, we want to go to the grass, who can get the fort?
For some time I was amazed at their question, perhaps they might have realized that one of them said back, who will go to the castle?
Then I’ll get them either … Saheb …
One of them said who is with us. Yanar …
I used to say that when I came, they asked me the name and we went to the fort on the way to tollarkhindi.
But … I have never been in the rain during the rainy season, there was a road to go to the fort, because sometimes it was going to the fort.
What will be in the rainy season? Is the road slippery? The thoughts of these things have not come into mind, because
this was the first time I went to Harishchandragad as a guide in my life.
After an hour’s journey, we reached tollarkhind, there was a rainy day so there was a lot of smoke, then it seemed to be dark now.
When I asked Sanjay Kulkarni Sir about
it, he told me at two o’clock, that same Madhav sir questioned me how long it would take to reach the fort. I did not know how long it would take, but I got out for about two hours. I have all the information about the fort,
so dakhavanayaca was trying, but I basically one toe navhatamtevadhyata no information Arakhindituna learn beyond the vatebaddla ask where this route is
the two villages that I told them there for lavhali and kothale …
After some time we went back to the next direction, the rain started, and we stood by the difficulty of the hard rock on top of the Tolerkhindi and looked at the waterfall visible above the ground. Because the waterfall that was seen from childhood today is very close, the
current rain and After waiting for a piece of paper, one of them said, how is it now?
At that time, the heart of the four people is going to rise above that, the fear of the four quarters was created, we crossed the turmeric kadkalkada, and the rain started. The water was so strong that we could not walk properly, so we decided to stop at the spot, Even after 10-20 minutes, the rain did not stop, after 1½ hours the rain stopped, and we started walking back, If we reached the fort, but you helped me realize that pohacaloya ..
The temple was not visible because there was no smoke in the smoke, it was not visible to the other person,
what to do now, where to go, the temple was defiled. It was the bells of the temple, we were walking towards the voice, the same fog disappeared …!
In front of the temple, we went to the temple, we decided to stay in the gaapa inside the temple. In front of the temple, Lord Maamacha was in the hotel, he asked me to
make the material made for the meal, to make heart, and Khichdi Bhat.
We got the wood in the cave and we sat in a fire and sat talking. Then I asked what happened to your education, how did
you do it till the fifth time ?
Working as a farmer, Buck works as a carpenter,
who is at home?
What is your mother
trying to do?
Agriculture …!
Sanjay Sir asked me what is the history of the fort?
Then I did not have anything to hide, I talked to Sir, I did not know. Sara took out two to three pieces of paper and gave it to me and said, ‘This is Harishchandragad’s reading, after reading this information, on Sunday, on Sunday, people have started looking at the fortunes of people in the city,
stop on the road on Saturdays, People who are human, do they want a guitar?
Tell them this information, to give information about the road, how difficult, where to go, when going from a difficult place, talk like Sir Slow,
Do not put any of them in any visayavaruna current discussions, “should have done before is ” if you know what will Harishchandragad Guide mhanuna lots of people, you find two tyatuna money, to be spent and I will help thee father.
Udaata we come, but our friends next time will be yenara narrate your name ..!
the paryatakansobata how to communicate, inform puffs Give it to me in a very detailed manner, explain the taxi stopped our discussion hotaata. Just meal, and slept.
The breakfast in the morning, we started the walk in the rain jhalarimajhima return journey back to the guest house pohacalojevana gupham, taramati, kokanakada, Blur We were coming,
we were going, we reached Khireshwar at five o’clock in the evening,
we took leave of each other and I came home.

Night was eaten , slept but slept but did not sleep, because the scenic atmosphere on Harishchandragad was hitting me, encouraging me to see it back, and the second thing was that Kulkarni Sir had told me that things were happening.
Then there was a thought in mind, if you want to see the beautiful nature, then you have to apply the path that Kulkarni Sir has to say. So what will happen if you see nature and see money.
From then on, I used to stop on Harishchandragarh road every Saturday and on holiday, two times a month and sometimes one went to the fort.
Every time something went wrong on the fort,
Two years have passed and from 2008/09, there was a crowd of tourists visiting Harishchandra Gada; Now, there were three to four hotels on the fort, in which my friend Ramnath Bharmal was also a hotel, now the world was changed, the digital era was started. Each week, they got to the fort.
Indrajeer got a glimpse of Harishchandragad on 11th May 2009.
Now when I got a mobile phone, I got a phone call for the guides, while at the same time some of the kindred people met.
In the last ten years, I came to be known as the guide of Harishchandragad, through the internet.
Now I’m trekking upstream adventure like ripping, camping, jungle safari, valley crossing.
Any kind of Trek Orange caring from Bhimashankar to Kalsubai.
I had never thought that I would get money in the form of some kind of living in the village.
Today, I stand firm in this Sahyadri’s Kho-
jan, Sanjay Kulkarni Sir Sumed Samarth, Harshad Samarth, Jayesh Kangane, Tejas Patre, Digambar Panchal, Mandar, Kishore Gi-He, Kapil Lande, Chaitanya Kamat, Suhas Sir, Kotkar Saheb, Ritesh Dhavale , Because of people suffering from eczema like Omkar Oak Thanks to all those people who have been able to create my existence
because of
their support for the coming ten years of my tenure in 14 years .