Ba Raigad Bhatkanti Katta 9 – Saad Himalayachi Tuesday, June 18, 2019

बा रायगड भटकंती कट्टा ९ – साद हिमालयाची

|| बा रायगड भटकंती कट्टा मुंबई : ९||*

विषय: *साद हिमालयाची*

वक्ते: श्री. वसंत लिमये

दिनांक : *मंगळवार १८ जून, २०१९*

वेळ : सायंकाळी ७ ते ९

स्थळ : *मामा काणे हॉटेल हॉल , दादर (पश्चिम), मुंबई २८*

हिमालयातील वाढता ओघ अन त्यातील अपघात यासंदर्भात मार्गदर्शन व्याख्यान योजिले आहे. सर्व सह्यभटके जे भविष्यात हिम शिखरे सर करु इच्छितात त्यांच्यासाठी हा कट्टा उपयुक्त ठरणारा आहे.

कट्ट्यानंतर इतिहास आणि सह्याद्रीतील किल्ल्यांविषयी ची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.

सर्व भटक्यांची उपस्थिती प्रार्थनीय राहील…
https://www.facebook.com/events/1038962506300105/

पहिलीच वेळ होती माझी कट्टयाला जाण्याची! मुळात आज भटकंती क्षेत्रात बा रायगड आणि असे वेगवेगळे ग्रुप्स मार्गदर्शनासाठी असे तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान भरवतात हिचं किती मोलाची गोष्ट आहे! बा रायगड परिवाराने ‘साद हिमालयाची’ हा विषय चर्चेसाठी निवडला होता. मला सह्याद्री आणि हिमालय भटकंती मधला फरक जाणून घ्यायचा होता म्हणून मी माझ्या ओळखीच्या सह्यभटक्यांसोबत कट्टयाला गेली. व्याख्याते होते श्री.वसंत वसंत लिमये. तुम्ही ओळखत असालचं. गेली 45 वर्ष ते सह्याद्री अन हिमालयात भटकंती करत आहेत, सोबत फोटोग्राफी(ज्याची त्यांनी प्रदर्शने ही भरवली आहेत ) आणि लिखाण( 2018 ला त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे ‘साद हिमालयाची, जरूर वाचा, you tube वर videos सुद्धा आहेत). त्यांनी महाराष्ट्रातल्या कड्याना ही मिठी मारली अन हिमालयामधली आतापर्यंत बारा शिखरे सर केली(2018 साली 8 आठवडे लिमये हिमयात्रा मोहीम फतेह केली). वसंत सरांची मुलाखत घेण्यासाठी होते पराग लिमये- इतिहास, दुर्ग अभ्यासक, मार्गदर्शक ज्यांनी आतापर्यंत 300 किल्ले बघितलेत, अनुभवलेत अन लोकांना मार्गदर्शन केलंय असे लिमये सर. रायगड अभ्यास दौऱ्यात ते प्रमुख मार्गदर्शक असतात.

वसंत सर स्वतःचा अनुभव सांगत होते, कस त्यांनी IIT मध्ये असताना गिर्यारोहन चालू केल अन ते कसे हिमालयापर्यंत पोहचले. त्यांनी 1985 साली भैरवगडावरून कोकणकड्याचा फोटो काढून, अत्यल्प सोईसुविधा असूनसुद्धा कस दोर टाकून कोकणकडा सर केलेला ह्याच वर्णन केल! त्यांचं mountaineering चं प्रशिक्षण आणि हिमालय दौऱ्यात असताना ओढवलेली संकटे सांगितली. हिमालय आणि सह्याद्रीतल्या भटकंतीमधलं फरक म्हणजेच दोन्हीकडचं हवामान, शिखरांची उंची, वेग वेगळी आव्हाने ह्यांच्यातील फरक समजावून दिला. ते एक महत्वाचं बोलले हिमालयात खूप थंडी मग सहज हिवताप वगरे अशी खूप आव्हाने असतात पण आपला सह्याद्री प्रेमळ आहे पण आपण सह्याद्रीत भटकंती करताना निष्काळजीपणा करतो, गृहीत धरतो आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. सह्याद्री असुदे किव्हा हिमालयात, बेभान होऊन नाही चालत, संयमाने चढाई करायची असते. बाहेरच्या देशातल्या तंत्रज्ञान प्रगत आहे ते तंत्रज्ञानाच्या जोरावर यशस्वीरित्या हिमालयात चढाई करतात, आपल्याकडे मात्र ती उणीव भासवते. हिमालय मिलाप आहे यात्रा, पराक्रम, तपोभूमी ह्याच! मग त्यांनी त्यांच्या हिमालयीन दौऱ्याचे व्हिडिओज दाखवले अन आम्ही virtual हिमालय भटकंती करून आलो.

व्याख्याना दरम्यान दोन्ही लिमये सरांचे विचार, अनुभव ऐकून कधी हास्याचे पडसाद उमटत होते तर कधी भटकंतीच्या सद्यपरिस्थितीवर ऐकून मन विषन्न होत होत. त्यातलचं एक हिमालयात आणि सह्याद्रीमध्ये होणारी ट्रॅफिक! मागे राजमाचीला 3500 यात्रीक होते, मुंबई आणि पुणे, दोन्हीकडून जवळ. खरच निसर्गाची किती नुकसानी होत असेल, ते गाव तरी एवढ्या जणांना जेवण, सुविधा देण्यासाठी capable आहे का? आज पैसा आहे, google वर माहिती उपलब्ध आहे मग जो तो उटसूट जातो. काही लोकांना तर माहित ही नसतं कुठे जातोय, त्या मागचा इतिहास काय आहे, दुसरे जातात म्हणून आपण ही. आपण जातो पण खरच तेवढी नम्रता असते का आपल्याठायी? खरचं तेवढं महत्व माहिते का आपल्याला त्याच? त्याच थोडं फार तरी प्रशिक्षण असत का आपल्याला? आज किती व्यावसायिकीकरणं झालं आहे भटकंती क्षेत्राच पण आपण त्या गडकिल्ल्यांच, निसर्गाचं संवर्धन करायला सरसावतो का?

हे लेख लिहण्यामागचा हेतू हाच की आपण ह्या शिखरांवर प्रेम करावं, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळावं पण त्यांना काही हानी न पोहचवता. सर्वांना आवड आहे डोंगरयात्रेची पण आपलं पर्यटन प्रगत नाही, नाही सरकार नीट लक्ष घालत मग आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे स्वतःची काळजी घेण्याची, निसर्गाला धोका न पोहचवण्याची. कारण आपला जीव ही परत नाही येणार आणि नाही नैसर्गिक संपदा! निसर्गासमोर, ह्या गडकिल्ल्यांसमोर नतमस्तक व्हायला हवं, त्यांची नासधूस नको. हा सह्याद्री, हिमालय निसर्गाने दिलेली वरदान आहेत आपल्याला, त्यांच्या साक्षीने आपला भव्यदिव्य इतिहास आहे ज्याचा आपण अभिमान मिरवत असतो, मग ह्या गिरिशिखरांच, गडकिल्ल्यांच पावित्र्य राखण हे आपलं कर्तव्य आहे. विचार व्हावा!
-अंजुश्री नलावडे
https://www.facebook.com/photo.php?fbid=2339439359665226&set=a.1379683282307510&type=3

नमस्कार,

*बा रायगड भटकंती कट्टा- मुंबई -९*

मित्रहो…

आतापर्यंत आपण अनेक कट्टे पाहिले,ऐकले,ज्ञान ग्रहण केलं..पण यावेळेसच्या कट्टयाला एक आगळी वेगळी रंगत येणार आहे बरं!!

हा कट्टा विशेष असण्याचं कारण म्हणजे आताच्या कट्ट्याला सह्याद्रीची साद हिमालायाला असणार आहे…आश्चर्य?? हो! हो! महाराष्ट्रात ट्रेकिंग ची संकल्पना राबवणारे *श्री.वसंत वसंत लिमये* सरांची प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहेत इतिहास अभ्यासक *श्री.पराग लिमये* सर..

आता ह्या आगळ्या वेगळ्या सहयाद्री आणि हिमालयाच्या गुजगोष्टी आणि सह्याद्रीची हिमालयाला कशी साद पोहचते?ते याची देही याची डोळा अनुभवण्यास अवघे अवघे या!!

*स्थळ:- मामाकाणे सभागृह दादर स्टेशनजवळ दादर(प.)*

*वेळ:- सायंकाळी ७ ते ९*

तेव्हा वेळ चुकवू नका…

अवघे अवघेचि या! सर्व भटक्यांना व दुर्गप्रेमी तसेच हिमालयप्रेमींना आमंत्रण…

*या आगळ्या वेगळ्या कट्ट्याचे प्रत्यक्ष साक्षीदार व्हा!!*😊😊💐💐💐

धन्यवाद!

आपलाच,

*बा रायगड परिवार*

————-google translated below ————-

 || BA Raigad Bhatkatti Katta Mumbai: 9 || *

Subject: * Saad Himalayas *

Speakers: Mr. Vasant Limaye

Date: * Tuesday 18th June, 2019 *

Time: 7 to 9 pm

: * Mama Kaane Hotel Hall, Dadar (west), Mumbai 28 *

Himalayas, and a guidance lecture has been organized for the accident. It is useful for all the supporters who want to get rid of the snow peaks in the future.

After harvest, books of history and Sahyadri fort for sale will be available for sale.

The presence of all wanders will be awaited …


Posted

in

by

Tags: