Arun Sawant dies at konkankada Jan 19th 2020

Arun Sawant (61) who started trekking in 1974 and 29 others were rappelling at Konkan Kada, a point at the fort on a trek. Sawant, who had retired as a deputy manager from MTNL last year, was trekking on the 1,800ft-high Konkan Kada cliff. “He accidentally slipped and fell 550ft below into the valley around 7pm. He had his safety gear,” said Sachin Shinde of Nisarg Mitra who was among the rescuers.

. “Also, he had trained thousands of people. It’s a great loss for the trekkers community,”
Anand Gavde, said, “He was a guru to all of us.”
Read more at:
https://timesofindia.indiatimes.com/city/thane/thane-rappeller-who-discovered-new-trek-route-falls-to-death-from-murbad-fort/articleshow/73404960.cms

https://www.loksatta.com/blogs-news/arun-sawant-trekker-died-while-rock-climbing-from-the-kokan-kada-harishchandragad-in-ahmednagar-pkd-81-2064190/
भावपूर्ण श्रद्धांजली

ट्रेकर्स च्या विश्वातील अत्यंत दुःखद घटना…महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ गिर्यारोहक व नवीन काहीतरी करण्यासाठी सूप्रसिद्ध असलेले 60 वर्षांचे चिरतरुण श्री. अरुण सावंत सर काळाच्या पडद्याआड…

खरंच अजूनही स्वतच्या कानावर व डोळ्यांवर देखील विश्वास बसत नाहीये… सह्याद्री मधील एका तेजस्वी हिरा काळाने हिरावून घेतला… हा आघात पचवायला खुप जड जाणार आहे…अरूण सरांचा खुप जवळचा परिचय होता…अनगड वाटांवर आमची बर्‍याचदा भेट झाली. एक अवलिया, हूरहून्नरी, धाडसी, जिवाभावाचा, हाडाचा गिर्यारोक गमवला. महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रासाठी हा फार मोठा धक्का आहे… गेल्या पस्तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत अरुण सावंत सरांनी सह्याद्री मधील अनेक नवीन ठिकाणं आणि अनेक डोंगरवाटा उजेडात आणल्या तसेच “जायंट स्विंग” ही सांधण व्हॅली मधील त्यांची साहसाची आवड असणाऱ्यांना देलेली सर्वोच्च भेट.

काल संध्याकाळी कानावर बातमी आली की कोकण कड्याला आडवा traverse मारत असताना कड्यावरुन अरुण सावंत बेपत्ता झाले आहेत. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली व माझ्या कानावर रात्री 10 च्या सुमारास आली…ताबडतोब ओंकार ओक ला फोन लावला… सुमारे 20 जणांची रेस्क्यू टीम पुणे, लोणावळा शिवदुर्ग, पनवेल निसर्ग मित्र, नाशिक व इतर ट्रेकर मंडळी निघाली होती. रात्रीचा प्रवास करत पहाटे काही टीम वरून rappelling करत सर्च करत होत्या तर काही जण नळीच्या वाटेने खालून वर चढाई करत जाणार होते. स्थानिकांच्या मदतीनं कमळू, भास्कर असे अनेक जण जिवाच्या आकांताने शोध घेत होते, ओंकार ओक सर्वांशी रात्रीपासून coordinate करत होता…

मन अजूनही सांगत होते की नाही सगळं काही नॉर्मल असेल… नक्की चांगली बातमी येईल… पण काळाला हे मान्य नव्हते.. आज सकाळी 10 च्या सुमारास बातमी आली… “Sir is No more”… या मोहिमीतल इतर सर्व सहभागी सुरक्षित आहेत. त्यातील ११ जणांच्या गटाला नाशिकचे गिर्यारोहक खिरेश्वर येथे घेऊन आलेत. इतरांना खाली आणण्याचे काम सुरू आहे. भयाण शांतता… डोक्यात विचारांचं काहूर माजलं… काय झालं असेल नेमक… फक्त तर्क वितर्क. ….

पण शेवटी निसर्ग हा निसर्गच असतो… चूक कशी झाली या पेक्षा ती कशी टाळावी हा विचार आता प्रत्येक ट्रेक ऑर्गनायझर ला करावा लागणार आहे तसेच सहभागी लोकांची सुद्धा ही जबाबदारी बनते.

कोकण कड्यावरून रँपलींग करताना अरुण सावंत हे ग्रुप लिडर होते. शनिवारी दुपारपासून अरुण सावंत बेपत्ता झाले होते. अरुण सावंत आणि इतर गिर्यारोहकांची टीम असे एकुण 30 जण हरिश्चंद्र गडावर रँपलींगसाठी आले होते. हरिश्चंद्र गडाचा कोकण कडा ते माकड नाळ या हरिश्चंद्र गडावर गडाचाच एक भाग असलेल्या कड्यापर्यंत त्यांची टीम आधी वरुन खाली आणि त्यानंतर traversing करणार होते. कोकण कड्याची एकुण उंची अठराशे फुट असुन जिथून अरुण सावंत नाहीसे झालेत ती उंची जवळपास आठशे फुटांची आहे.

अरुण सरांनी मागील आठवड्यातच ही नवीन वाट शोधली होती… त्यांचे मी फोन करून अभिनंदन देखील केले होते. या मोहिमेचा फेसबुक वर त्यांनी खूप छान लेखही लिहिला होता तो खालील प्रमाणे…..

“कोकणकडा मध्यातून traverse मोहीम” फत्ते झाली … गेल्या कित्येक वर्षांचे माझे स्वप्न पुरे झाले …. बरीच वर्षे ही मोहीम रेंगाळली होती..! मोहीम तशी अवघडच निघाली…त्यामुळे दोन दिवसांच्या ऐवजी तीन दिवस लागले …. सुरक्षिततेच्या दृष्टीने घाई करून चालणार नव्हते. कोकण कडा हा अनेक आडव्या लेजनी विभागला गेला आहे …. पूर्ण खाली न उतरता वरच्या वरच एका टोकावरुन दुसर्‍या टोकाला मध्यातून आपल्याला जाता येईल का हा विचार फार वर्षापूर्वी माझ्या मनात आला होता … त्याप्रमाणे मी पहाणीही करून ठेवली होती … पण मुहूर्त सापडत नव्हता ….! या मोहिमेअंतर्गत कोकण कड्याच्या extreme उजव्या टोकावरून खाली उतरून, अधांतरीच वरच्या वर ट्रॅव्हर्स मारत मारत पूर्ण डाव्या बाजूला असलेल्या *शेंडी* सुळक्यापाशी पोहचायचे आम्ही निश्चित केले … त्याप्रमाणे आम्ही पन्नास, शंभर, दीडशे फुटांचे कडे रॅपलिंग करीत, मधे मधे लांबलचक ट्रॅव्हल्स मारत मारत कोकण कड्याच्या पूर्ण डाव्या शेवटाला असलेल्या शेंडीपाशी जाऊन थडकलो … अगदी शेवट आला पंचवीस फूट कडा चढावा लागला … सूरजने छान चढाई केली.”

आता सह्याद्री मध्ये फिरताना ज्या ज्या ठिकाणी आमची भेट झाली तिथे अरुण सरांची आठवण नक्की होईल.

जर हे एका निष्णात ट्रेकर च्या बाबतीत होऊ शकते तर आपल काय… हा विचार सर्वांनी जरूर करावा आणि आता वेळ आली आहे ती विचारमंथन करण्याची….

मित्रानो ही घटना खूप दुर्दैवी होती पण एकच सांगणे आहे… आयुष्य एकदाच मिळते … साहस करा पण Calculated….

।।ईश्वर त्यांना चिरशांती देवो ही प्रार्थना।।

Anand Kenjale
Explorers treks and tours
https://www.facebook.com/anand.kenjale/posts/10216037913248285

अनाकलनिय आणि अनपेक्षित.
शनिवार 18 जानेवारी ला संध्याकाळ नंतर एक बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्र ती बातमी ऐकून हादरून जावं असंच काहीसं झालं.
“कोकणकड्याच्या मध्य भागून ट्रॅव्हर्स मारताना भवानी धारेकडून उजवीकडे ( शेंडी सुळक्याकडे जाताना) अरुण सावंत सर missing आहेत”. सर्व rescue teams मध्ये बोलणी चालू झाली आणि अतिशय योग्य संपर्क ठेऊन सर्व teams ने जोमाने कामाला सुरवात केली.
‘कोकण कडा म्हणजेच दुसरं नाव देता येईल रौद्र कडा’, अश्या ठिकाणी जाणं म्हणजे team सुद्धा तगडीच असावी आणि मदत करणारे प्रत्येक जण तिथे महत्वाचेच,
actual location वर असलेलया जाणकार माणसाशी बोलणं करून पुढच नियोजन सर्वच टीम ने मिळून केलं.
(सगळ्यात महत्वाची गोष्ट जो पर्यंत एकदम निश्चित बातमी कळत नाही तो पर्यंत अश्या वेळी आशेचे किरण जागेच ठेवले पाहीजेत, कोणत्याही निर्णयावर येण चुकीचं ठरेल).
Team 1 =
निसर्ग मित्र,पनवेल
Vishwesh Mahajan , Dhananjay Madan , Parag Sarode , Hemant Vaidya , Nikhil Patil , Sachin Shinde ).
शैलभ्रमर, मुंबई ( Hitendra More उर्फ गोटू ),
भ्रमंती, मुंबई( Kaivalya Varma ),
Petzl ( Kishor Chavan ),
गिरिप्रेमी ( Krishna Dhokle ),
गिरीविराज ( Pradip Mhatre , दिवाकर दादा, Kishor More ) आणि अजून काही जण,
ही टीम खिरेश्वर मार्गे शेंडी सुळक्याकडे जाणार ( यात साबळे मामा आणि दीपक तिथे राहणारा यांची खूप चांगली साथ मिळाली),
आप्पा खिरेश्वर मधून किंवा मागून काही मदत लागली त्यासाठी थांबले,
तर
Team 2 =
शिवदुर्ग, लोणावळा ( Ganesh Geedh , Rohit Vartak , Tuhin Satarkar , Bhupesh Patil ).
ड्रीफ्टर ट्रेकिंग क्लब ( Siddharth Gaikwad ).
पाचनई गावातील ( Bhaskar Badad हा सुद्धा मदतीसाठी गावातल्या काही जणांना घेऊन शिवदुर्ग सोबत आला होता ).
ही टीम पाचनई मधून नळीच्या वाटेने उतरून कोकणकडा खालच्या बाजूने ट्रॅव्हर्स मारून येणार.
Onkar Oak आणि Sunil Gaikwad , Yash Jage हे बैलपाडा गावात बाकीच्या गोष्टी सांभाळत होते.
सर्व टीम कामाला लागल्या, Team 1 रविवार लवकर सकाळी शेंडी जवळ पोहोचली, तिथे असलेल्या 29 जणांना शेंडी सुळक्याच्या इथे आणायला सुरवात केली ( सर्व जण सुखरूप होते ).
त्यांचा मार्ग शेवटपर्यंत anchored करून, ठरलेल्या पुढच्या महत्वाच्या Search operation साठी गोटू, विश्वेश, दिवाकर, प्रदीप, पराग मिळालेल्या माहिती च्या आधारे पुढे निघालो, अंदाज लावल्या प्रमाणे ट्रॅव्हर्स मारुन गोटू आणि आणि मी अंदाजे 350 ft rappeling केलं, आणि लगेचच जिथे शक्यता वाटत होती तिथे ( भवानी धारेकडे बघताना उजवीकडे ) आम्हाला रविवार सकाळी 11.30 वाजता Body locate झाली,
मागोमाग मदतीसाठी दिवाकर आणि पराग rappeling करून पोहोचले, आणि आम्ही आमची team 2 आमच्या पर्यंत पोहोचण्याची वाट बघत होतो.
कोकणकडा आणि त्यात तिथून एखाद असं काम करणं म्हणजे जोखमीचे आणि कष्टाची परिसीमा ओलांडणारच, ( स्वतः अरुण सरांनी 1986 मध्ये पुढाकार घेऊन त्यावेळी एक कठीण असं rescue operation कोकणकड्यामध्ये केलं होतं ),
Team 2 आमच्या पर्यंत पोहोचताच, पुढच्या कामाला सुरवात केली. गणेश,तुहीन,भुपेश,रोहित,विश्वेश,गोटू, दिवाकर,पराग आणि बाकीचे मदतीला तिथे होतेच, आम्ही सर्वांनी accident location to कोकणकडा base to जवळ जवळ 50% मोरेन ( दगडांची मोठी घळ ) अस टप्या टप्यात zip line set up करून काम केलं , आणि नंतर गावा पर्यंत “सर्वांच्या मदतीने” स्ट्रेचरवर उचलून सर्वांनी काम केलं. आणि शेंडी सुळक्या जवळील टीम कैवल्य वर्मा,किशोर मोरे,किशोर चव्हाण, प्रदीप म्हात्रे,हेमंत वैद्य,निखिल पाटील,सचिन शिंदे आणि अजून काहीजण तिथलं काम संपवून, wind up करून खिरेश्वर ला उतरली.
“यात आम्ही सोडून अनेक जणांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत झालीच आहे, काही trekkers ने ट्रेक करत पाणी आणि खाणं तर आणलंच आणि गावापर्यंत स्ट्रेचर उचलून घेण्यास मदत केली, भास्कर आणि कमळू यांचे आम्ही सर्वजण ऋणी आहोत आणि त्यांच्या सोबत आलेल्या गावकऱ्यांचे ज्यांनी मदत केली, आणि कसलीच अपेक्षा न ठेवता नंतर कमळूने प्रेमाने जेऊ घातलेल्या डाळ भात भाजी यासाठी सुद्धा तुम्हाला शतशः प्रणाम ).
.
.
” Suraj Malusare तू अश्या परिस्थितीत सुद्धा त्या ठिकाणी मदत पोहोचे पर्यंत धीराने परिस्थिती हाताळलीस आणि सोबत असलेलयांना सांभाळस”. 🙏
“हे असंच्या अस घडलेलं आहे”.
.
.
.
“सह्याद्री तितुका मेळवावा, गिर्यारोहण धर्म वाढवावा”.
– विश्वेश महाजन,
– निसर्ग मित्र,पनवेल.
https://www.facebook.com/vishwesh.mahajan.17/posts/2669573016426003

गोष्ट 2006 सालची, ज्येष्ठ गिर्यारोहक निकोलस मायलँडर ह्यांच्या उपस्थितीत सेफ क्लाइंबिंग इनिशिएटीव्ह चा पहिला अँकर रिप्लेसमेंट उपक्रम (प्रोजेक्ट) नागफणी सुळक्याच्या वरच्या 300 फूटात सुरू होता, त्याचबरोबर अरुण सावंत सरांच्या चमूची व्हॅली क्रॉसिंग ऍक्टिव्हिटी चालू होती. आम्ही सर्वजण बोल्टींग पूर्ण करून खाली आलो. अरुण सावंत सरांनी दिलखुलास स्वागत केलं. त्या व्हॅलीत पुरण पोळी जेऊ घातली आणि पहिली 2000 रुपयाची देणगी दिली. सेफ क्लाइंबिंग इनिशिएटीव्हला निकोलस नंतर भारतातून देणगी देणारे अरुण सावंत सर पहिले देणगीदार होते. त्यांनी प्रथम चढाई(ओपन) केलेला नागफणी सुळक्याचा मार्ग(रूट) रिबोल्ट होतोय ह्या त्यांच्या आनंदाची ती पोचपावती होती. नंतरही त्यांनी वेळोवेळी सेफ क्लाइंबिंग इनिशिएटीव्हला आर्थिक मदत केली. कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक पणे पाहणारे ज्येष्ठ गिर्यारोहक, नेहमी स्कि बद्दल विषय निघाला की सांगायचे, काही लोकांच्या वेड्या वाकड्या बोलण्या कडे लक्ष देऊ नका, तुमचं चांगलं काम करत रहा. मागील वर्षी झालेल्या डांग्या सुळक्याच्या अँकर रिप्लेसमेंट उपक्रमात त्यांचा सहभाग होता. त्यांचा पाठिंबा, त्यांचे शब्द वेगळीच प्रेरणा, उमेद देऊन जायचे.

पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग असोसिएशनच्या कोकणकडा मोहिमेतही अरूणसर स्वतःहून हिरीरीने सामील झाले. सगळ्यांना प्रोत्साहन देऊन स्वतः जेवण बनवून खाऊ घालायचे. आज सर आपल्यात नाहीत, ह्यावर विश्वास बसत नाही.

गिर्यारोहण क्षेत्रातील एक अत्यंत मौल्यवान हिरा निखळला, ही पोकळी नभरून निघणारी आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. 🙏🏼
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼
https://www.facebook.com/swanand.joshi.50/posts/2891715224205866

अरुण सरांसोबत कधी विचार जुळले तर कधी जुळले नाहीत. पण असं असूनही त्यांनी कधीच संवाद थांबवला ही नाही… यातूनच त्यांचं मोठेपण कायम अधोरेखित झालं. फोन केला की आमची जुगलबंदीच चालायची…मग तो कोणताही विषय असो.

मी जन्मलो ही नव्हतो त्याच्या आधी अरुण सरांनी अनेक पराक्रम करत एक भक्कम असं स्थान निर्माण केलं होतं. असं असूनही आमच्या सारख्या लहानग्यांचे बोलणे ते आपुलकीने ऐकून घ्यायचे. सह्याद्री इतके अफाट कर्तृत्व करूनही सर अतिशय साधे कसे हा प्रश्न मला कायमच सतावत रहायचा…प्रत्येक मोहिमे नंतर त्यांची त्याबद्दलची मते जाणून घ्यायला नक्की आवडायची. कधी काही चुकलेच तर आवर्जून कान उपटणारे, काही चांगलं झालं तर पाठीवर शाबासकीची थाप देणारे अरुण सर… या सगळ्या सोबत त्यांच्या काळातील आठवणींचा पट उलगडून दाखवायचे… त्यांच्या ते अनुभव ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन जायचो…

पण आता हे सारं अरुण सरांच्या जाण्यामुळे थांबलं आहे…हे स्वीकारणं कठीण आहे…पण स्वीकारणं क्रमप्राप्त ही आहेच… पण तुम्ही दिलेली साहस जोपासण्याची ऊर्जा कायम आमच्यासोबत असेल. आपण कितीही मोठे झालो तरी सह्याद्री समोर आपण नेहमीच खुजे आहोत. मग ते म्हणून जुने जाणकार असतो व नवीन उत्साही गिर्यारोहक. प्रत्येकाने सुरक्षित राहून मोहिमा आखायला हव्यात, हेच या दुर्दैवी घटनेतून शिकण्यासारखे आहे.

https://www.facebook.com/divakar.satam/videos/10221618347347964/

तोच त्याचा ध्यास होता….

भटकंतीला सुरवात होऊन साधारणतः ५ वर्षानंतर मी Cave Explorers च्या माध्यमातून अरूणच्या सहवासात आलो.
ते १९८५ चं वर्ष असेल. केव्ह च्या पहिल्या Rock climbing cum Adventure camp ची बातमी पेपर मध्ये होती. त्या बातमीच्या आधारे मी तो पहिला लोकल कॅम्प कान्हेरी येथे केला आणि मग एकापाठी एक मोहीमा होत गेल्या.
Caveचीच दुसरी (पहिली नाही)नागफणी, लिंगाणा, पाचलिंगी यांच्या चढाई मोहिमा, कोकणकडा रॅपलिंग अशा भन्नाट मोहीम झाल्या. या साऱ्या मोहिमेतून अरुण सह मी Cave मधील अनेकांना (दत्ता फोपे, रॉकी, बिभास आमोणकर, सतीश आंबेरकर, प्रदीप पोतदार, संजय रांगणेकर असे अनेक ) पाहत होतो, भेटत राहिलो.
त्यावेळी या साऱ्यांना धरून ठेवणारा व नवनवीन कल्पना मांडून सतत कार्यरत राहणारा हा अरुण होता.
एखादी मोहीम संपण्याआधीच त्याच्या मनात पुढील मोहिमेचे प्लॅन्स सुरु होतं, किंवा एकाच मोहिमेतून पुढील दुसऱ्या मोहिमेचे बीज रोवले जाई.
कोणत्याही लेज वर, कड्यावर वा अरुंद वाटेवर वावरताना त्याच्या डोळ्यात कधीच साशंक भाव दिसायचे नाहीत. ड्रॉप कितीही खोल असला तरी त्याच वावरणं अगदी सहज असायचे. त्याचा तो निडरपणा पाहून तेव्हा खूप भन्नाट वाटायचं. सह्याद्रीच्या कडे-कपारीतून वावरताना हा असा विश्वास अरुणनेच दिला.
पुढे केव्ह ने नागफणीला काही रॅपलिंगची शिबिरं घेतली. त्यावेळी अनेकदा मी duty करून रात्री अडीच-तीन ला एकटाच तिथे पोहचायचो तेव्हा कॅम्प साईट वर अरुण वाट पहात असायचा. तो लगेचच टेंट मधून बाहेर यायचा. हे एवढं पुरेसं असायचं माझ्यासाठी.
अव्वल चित्रकाराला चित्र काढताना पाहावं तसं अरुणला डोंगरात वावरताना पाहावं. अक्खा डोंगराचा आवाका अरुण नीट न्याहाळून घ्यायचा-काटेकोर निरीक्षण करायचा. आणि एकदा पाहिलं की सर्व खाचा-खोचा त्याच्या सदोदित लक्षात रहायच्या.
अरुण तेव्हा प्रभादेवीच्या आदर्शनगर मध्ये राहायचा. मी अनेकदा त्याच्या या घरी जायचो, अरुण क्वचितच घरी भेटायचा पण त्याची आई व भाऊ विनोद असायचा. भेट टळली की अरुणचे पोस्टकार्ड याचंच, त्यातुन पुढील मोहिमेविषयी कळवलेलं असायचं. अनेकांना डोंगर दऱ्यांकडे वळवण्याचा त्याने वसाच घेतला होता जणू.
पुढे केव्ह च्या मोहिमा कमी होत गेल्या पण माझी डोंगर भटकण्याची ओढ कायमच राहिली. कधी डोंगरात, कधी प्रदर्शनात तर कधी एखादया संमेलनातून तो भेटत असायचा आणि त्याच उत्साहाने नवीन भन्नाट कल्पना मांडायचा, यायचा आग्रह करायचा.
याच सुमारास यशवंती हायकर्स च्या साहाय्याने आम्ही निसर्गमित्र ला आकार देत गेलो. निसर्गमित्रच्या कॅम्प व मोहिमांना तो सवड काढून यायचा, थोडक्यात डोंगरात जायला त्याला कारणच लागायचे.
अनेकांना माहिती नसेल पण अरुण पक्का विज्ञानवादी होता. प्रत्येक गोष्ट करताना त्याचा अगदी सूक्ष्म विचार करायचा. तसंच काटेकोर नियोजन करायचा. घड्याळाच्या काट्याबरोबर तो धावत असे. वेळेचं महत्व त्याला चांगलंच ठाऊक होतं.
मी निवृत्त (job) झालो त्या दिवशी अरुण केव्ह मधील काही मित्र-मैत्रिणींसह अगदी अचानक ठाकला, ती आठवण अविस्मरणीय असली तरी असं अचानक जाण याची त्याला ओढ असावी का?
परवा त्याच्या देहाचे अंतिम फोटो पाहिले. हार्नेस, खूप कॅराबिनर्स, पेग्स, वॉकी-टॉकी आणि ड्रिल मशीन अशी गिर्यारोहणाची सारी आयुधं त्याचं शरीरावर होती.
एखादा योद्धा बंदूक, शिरस्त्राण ई.सह रणांगणावर धारातीर्थी पडावा तसा तो पडला होता-गिर्यारोहणाची सारी आयुधं अंगावर ठेऊनच त्याने अखेरचा श्वास घेतला. तोच त्याचा ध्यास होता!!!

– धनंजय मदन.
निसर्गमित्र, पनवेल.
https://www.facebook.com/prisiliya.madan.04/posts/2553157748344593

भावपूर्ण आदरांजली Arun Sawant सर.. आपण कायम भटक्यांच्या स्मरणात राहाल.. आपली दुर्दम्य इच्छाशक्ती भटक्यांना नवीन करण्याची प्रेरणा देत राहील.. 🙏🙏


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “Arun Sawant dies at konkankada Jan 19th 2020”

  1. kapila birje Avatar

    Surly its a big loss…. RIP……