Loading Events

« All Events

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले मिरगड (सोनगिरी)”

July 19 @ 9:30 am - 12:30 pm

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले मिरगड (सोनगिरी)”
मोहीम क्रमांक – १७४
गाव – झापडी, तालुका – पेण, जिल्हा – रायगड
श्रेणी – सोपी
दिनांक – १९ जुलै २०२६

१६६२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीत मोघल सैन्याचा दारुण पराभव केला तेव्हा मोघल सरदार नामदार खान याने पळून जाण्याचा बेत केला, मात्र महाराजांनी मीरा डोंगरावर नाकेबंदी केली. हि माहिती खानास कळताच नामदार खान कसाबसा नागोठणे बंदरावर आला तेथून त्याने पेण गाठले व तेथून कल्याणमार्गे पळून गेला. हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या रणनीतिक कौशल्याची साक्ष देतो आणि मिरगडाच्या महत्वावर प्रकाश टाकतो.
तसेच महाराजांनी कल्याण सुभ्याचा खजिना स्वराज्यात आणला तो याच प्रदेशात.

चला तर मग मोहीम आखूया, छत्रपतींच्या तात्कालीन ऐतिहासिक घडामोडीचा महत्वपूर्ण साक्षीदार असलेल्या दुर्गाची.

कार्यक्रमाचा तपशील :-
रविवार १९ जुलै २०२६ रोजी परळ / भारतमाता येथून सकाळी ०६:०० वाजता खाजगी बसने झापडी गावाकडे मार्गस्थ.
साधारण
०९:०० वाजे पर्यंत झापडी गावात आगमन. फ्रेश होऊन उपस्थितांची ओळख करून साधारण ०९:३० वाजता किल्ल्याकडे मार्गस्थ होणे, साधारण 1 तासात गडाच्या माथ्यावर पोहोचणे. दुर्ग भ्रमंती करून गड उतरण्यास सुरुवात. गावात आगमन झाल्यावर थोड्या विश्रांतीनंतर दुपारचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना.

ट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये ९००/- (रुपये नऊशे फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, चहा-नाश्ता, दुपारचे जेवण अंतर्भूत).

मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये ८००/- (रुपये आठशे फक्त) असेल.
नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२६ असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर जरुरी पुरते सामान नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) वन्य प्राण्यांचा वावर असल्याने परफ्यूम, बॉडी स्प्रे, भडक रंगाचे कपडे टाळावेत.
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, रेनकोट, जरुरी पुरते कपडे.
४) पाण्याची २-३ लिटर बाटली अति आवश्यक.
५) स्वतः पुरता सुका खाऊ.
६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
७) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे व्यवस्थित राहतील.

नियम :-
१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
२) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
५) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
६) ट्रेक करताना इतर सभासदांसोबत राहावे. आपला ग्रुप सोडून गडाच्या कड्यावर, आड वाटेला एकटे जाऊ नये. लघु शंका किंवा तत्सम महत्वाचे कारण असल्यास मोहीम प्रमुखांना सांगून जावे. एकटे कुठेही जाणे हे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
७) मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.
८) अनुकूल परिस्थिती होते ती सहल असते आणि प्रतिकुल परिस्थितीत होतो त्याला ट्रेक म्हणतात. सदर मोहिम/ट्रेक केवळ मौज मजेसाठी आयोजित केलेली सहल नसून ट्रेकिंग संस्कृती रुजावी, वाढावी, गडकिल्यांचे महत्व. इतिहासाचे अवलोकन हा आमच्या आयोजनाचा हेतू आहे. त्यामुळे सहलीत मिळणारी Luxurious Treatment, सोई सुविधा या मोहिमेत मिळणार नाहीत. शहरी लोकांना उघड्यावर शौचास बसणे, पाणी पुरवून वापरणे, जेवणाची वेळ मागे पुढे होणे, खडबडीत जमिनीवर झोपणे याची सवय नसते. या अश्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेतलेत तर ट्रेक Enjoy कराल, अन्यथा पदरी निराशाच पडेल.

नाव नोंदणी प्रक्रिया :
१) नाव नोंदणी करण्या आधी मोहीम प्रमुखांशी ९५०३१ ७२८४२ / ७७३८२ ६५८८९ या क्रमांकावर मोहिमेत जागा आहे/नाही हे विचारून घ्या. नाव नोंदणीची अंतिम तारीख बुधवार दि. १५ जुलै २०२६ असेल किंवा ३५ सदस्य संख्या पूर्ण झाल्यास नोंदणी बंद करण्यात येईल व प्रतिक्षा यादी (Waiting List) चालू होईल. त्यानंतर दुसऱ्या वाहनाचा विचार करण्यात येईल.
२) वर नमूद ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता “९५०३१ ७२८४२ / ७७३८२ ६५८८९” या क्रमांकावर WhatsApp करावी.

बँक तपशील :-
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
Account No – 60134804616
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318

३) फी भरल्या नंतर सदर ट्रेकचा गूगल फॉर्म मोहीम प्रमुखांकडून मागून घ्यावा आणि इंग्रजी मध्ये भरुन पाठवावा.
4) इच्छुक सदस्यांना “किल्ले मिरगड” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
5) अंतिम दिनांक उलटून गेल्या नंतर आणि जर ट्रेक मध्ये जागा शिल्लक असेल तर ट्रेक फी वाढीव रुपये १००/- अधिक भरावी लागेल.

नाव नोंदणी रद्द प्रक्रिया :
१) नाव रद्द करायचे झाल्यास गुरुवार १६ जुलै २०२६ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल.
२) गुरुवार १६ जुलै २०२६ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
३) तुम्हाला ट्रेकला येण्यासाठी अडचण असल्यास तुमच्या जागी अन्य दुसऱ्या व्यक्तीला ट्रेकला पाठवू शकता (ती व्यक्ती ट्रेक करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे).

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख – शुभम भोळे / ९५०३१७२८४२
==============================
मोहीम कार्यवाह – विजय हरचंदे / ७७३८२६५८८९

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई- /९३२०७ ५५५३९
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
वसई/पालघर – हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२०

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट :
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम : shivashourya_trekkers

शिवशौर्य ट्रेकर्सच्या आगामी मोहिमांच्या माहितीकरिता Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.

📍Join us WhatsApp Group :-
https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0

Details

Organizer

  • Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स – 24 November 2022
  • Email noreply@facebookmail_com

Venue