- This event has passed.
Ahilyanagar (Ahmednagar) : The Hidden Gem of Deccan Heritage ( One Day Heritage Tour) – 9 November 2025
? अहिल्यानगर (अहमदनगर) : दख्खनच्या वारशातील लपलेले रत्न
? एक दिवसीय वारसा सहल
दिनांक : रविवार, ९ नोव्हेंबर २०२५
तज्ञ मार्गदर्शक : श्री. भूषण देशमुख सर
(ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, अहिल्यानगर)
नोंदणी शुल्क :
रु. १,८९९/-
पुणे ते पुणे प्रवासखर्च , चहा – नाश्ता, दुपारचे जेवण (शाका.), संध्याकाळचा चहा -स्नॅक्स, मार्गदर्शक शुल्क, वारसा स्थळ प्रवेश शुल्क समाविष्ट असेल
रु.
७५०/ –
या सहलीसाठी ज्याना स्वतःच्या गाडीने अहिल्यानगर येथे थेट जॉईन व्हायचे असेल त्यांच्यासाठी ही विशेष योजना आहे. यात फक्त “तज्ञ मार्गदर्शक शुल्क, दुपारचे जेवण, वारसा स्थळ प्रवेश शुल्क, संध्याकाळी चहा -स्नॅक्स समाविष्ट असेल”.
✨ सहलीचा परिचय
मित्रांनो,
अहिल्यानगर (अहमदनगर) परिसर प्रागैतिहासिक काळापासून यादवकाळापर्यंतचा समृद्ध इतिहास जपून ठेवणारे ठिकाण आहे. परंतु अहिल्यानगर (अहमदनगर)
शहराचे खरे ऐतिहासिक महत्त्व निजामशाही स्थापनेपासून (१५वे शतक) अधिक वाढले.
इ.स. १४९० मध्ये मलिक अहमद निजामशहा प्रथम यांनी बहमनी सत्तेपासून स्वतंत्र होऊन अहमदनगर सल्तनत स्थापली, आणि त्यावरून या शहराला “अहमदनगर” हे नाव प्राप्त झाले.
या वारसा सहलीत आपण अनुभवणार आहोत — निजामशाही स्थापत्यकला, पाण्याच्या अद्भुत प्रणाली, शौर्यकथा, आणि स्वातंत्र्यसंग्रामातील तेजस्वी अध्याय!
_________
? प्रमुख वारसा स्थळे
? अहमदनगर भुईकोट दुर्ग
निजामशाही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना!
इथेच पं. जवाहरलाल नेहरूंनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हा ग्रंथ कैदेत असताना पूर्ण केला. स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक नेत्यांचा हा साक्षीदार दुर्ग आजही पर्यटकांना प्रेरणा देतो.
? हत्ती बारव
निजामशाही काळातील भूमिगत पाणीपुरवठा प्रणाली (करेझ) — हत्तींच्या साहाय्याने पाणी उचलून राजवाड्यापर्यंत पोहोचविण्याचा अद्भुत नमुना.
⛪ सलाबतखान मकबरा
तीन मजली अष्टकोनी रचना — सुंदर दृष्टीकोन आणि वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध. येथे उभे राहून देवगिरी किल्ला दिसत असल्याची आख्यायिका.
?️ फराहबख्क्ष महाल
पर्शियन स्थापत्यकलेचा भव्य नमुना — सुंदर कमानी, थंडावा देणारी रचना आणि फवारे.
असे म्हणतात की शाहजहानला ताजमहालाच्या रचनेची प्रेरणा याच महालातून मिळाली!
? दमडी मशीद
सुंदर दगडी मशीद — सूक्ष्म नक्षीकाम आणि सुलेखनासाठी प्रसिद्ध. कामगारांच्या “दमडी” मजुरीतून उभारलेली ही कला आणि श्रद्धेची संगमस्थळ.
? रणगाडा संग्रहालय
आशियातील आपल्या प्रकारातील एकमेव संग्रहालय (स्थापना १९९४).
सुमारे ५० जुन्या बख्तरबंद युद्ध वाहनांचे प्रदर्शन, ज्यामध्ये “सिल्व्हर घोस्ट” रोल्स रॉइस हे सर्वात जुने वाहन विशेष आकर्षण आहे!
_____________
?️ सहलीचा दिनक्रम
सकाळी प्रस्थान : ५.०० (सिंहगड रोड, पुणे)*
मार्ग : चांदणी चौक – कोथरुड – डेक्कन – संचेती – विश्रांतवाडी – विमाननगर – खराडी
☕ ७.३० ते ८.०० : सुप्रसिद्ध सरदवाडी (रांजणगाव)
मिसळपावचा स्वादिष्ट नाश्ता
? अहिल्यानगर आगमन : सकाळी ९.००
वेळ स्थळ
९.०० भुईकोट किल्ला
११.३० फराहबख्क्ष महाल
१२.३० रणगाडा संग्रहालय
१.३० भोजन
२.३० सलाबतखान मकबरा
३.३० दमडी मशीद
४.३० ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय
६.०० मेहेराबाद
७.३० स्नेहालयाचा स्नेहांकुर प्रकल्प भेट
८.०० पुण्याकडे प्रस्थान
९.३०–१०.०० पुणे आगमन अपेक्षित
?️ रात्रीचे जेवण ऐच्छिक (स्वखर्चाने)
_____________
? नोंदणी प्रक्रिया
इच्छुक सदस्यांनी सहलीचे शुल्क खालीलपैकी कोणत्याही क्रमांकावर GPay करून भरण्याचा स्क्रीनशॉट, नाव, संपर्क क्रमांक, राहण्याचे ठिकाण, आणि पिकअप पॉइंट ही माहिती पाठवावी.
_____________
? वसुंधरा वारसा पर्यटन
“शाश्वत आणि जबाबदार पर्यटन”
? प्रविण सानप : ९१७५९ ०९८६४
? विवेक पोटे : ७०३८७ ५४०३९
? वृषाली बोने : ९८९०० ५३२०४
? वैभव भिसे : ९०६७३ ४७९२१
#ahilyanagar#heritage#weekendvibes#weekendgetaway#artandarchitecture#naturelovers#HistoryUncovered#historylovers#PuneWeekendGetaway#ahemdnagarcity#exploremarathwada#exploreahmednagar#weekendheritage#heritagetourism#MaharashtraHeritage#maharashtratourism